ब्लॉग असा करा सुरू !
अलीकडच्या काळात ब्लॉगलेखन हा प्रकार खूप वाढला आहे. वर्डप्रेससारख्या व्यावसायिक प्लॅटफॉर्मवर जाण्याआधी गुगलच्या ब्लॉगस्पॉटवर ब्लॉग सुरु करून बघा. इथे वर्डप्रेसपेक्षा कमी सुविधा असल्या तरी बऱ्यापैकी चांगला ब्लॉग करता येतो, तुम्ही जीमेल वापरत असाल तर ब्लॉगस्पॉटवर ब्लॉग सुरु करणे अगदी सोपे आहे. जीमेल ओपन करा, वर उजव्या बाजूला सेटिंगच्या बाजूला नऊ ठिपक्यांचा एक चौकोन दिसेल. त्यावर क्लिक करा. पुढील चित्रात दिसते तसे दिसेल. इथे गूगलचे सगळे अँप दिसतील. त्यातील ब्लॉगर या अँपवर क्लिक करा. आता पुढील चित्रात दाखवलेल्या arrow वर क्लिक करा. तो circle करून दाखवला आहे. त्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला कोणत्या नावाने ब्लॉग सुरु करायचा आहे ते विचारले जाईल. ते नाव द्या. मग पुढे ब्लॉगचा 'पत्ता' द्यावा लागेल. इथे ब्लॉगचेच नाव देऊ शकता अथवा ते उपलब्ध नसल्यास नवीन द्यावे लागेल. मग नाव.ब्लॉगस्पॉट.कॉम या नावाने ब्लॉग सुरु होईल. इतके सोपे आहे हे. लिहायला लागा आणि इतरांना शेअर करा. त्यांना नाव.ब्लॉगस्पॉट.कॉम हा पत्ता एकदा कळवा आणि follow करण्याची विनंती करा. ब्लॉग कोणत्या...