Posts

Showing posts from December, 2023

समाधी संजीवन ...

Image
(डॉ. आनंदीबाई जोशी यांच्या समाधीचा शोध कसा घेतला आणि ती समाधी प्रत्यक्ष पाहिल्यावर काय भावना मनात आल्या हे नेमके मांडणारा विद्या हर्डीकर सप्रे यांचा हा लेख. ) ब राच वेळ नकाशातून वाट काढत काढत  मी आणि अशोक (माझा नवरा)  एका दफन भूमीच्या दारात पोहोचलो. मला पहाताच समोरची बाई चटपटीतपणे पुढे आली आणि हसतमुखाने विचारती झाली, “ Are  you  here   for  Dr  Joshi ?”   मी चकितच झाले. “ How do you know ?” मी विचारले.. तिन सांगितलं की ,” तू भारतीय  दिसते आहेस. इथे खूप भारतीय येतात डॉ. जोशींच्या समाधीला भेट द्यायला.! खरं तर   या दफन भूमीत सर्वात  जास्त  भेट दिली जाणारी .. सर्वात लोकप्रिय समाधी आहे ही ! “ आणि आमच्या वॉकिंग टूर मध्ये आम्ही या समाधीचाही सामावेश केलाआहे.” हे ऐकून मला अभिमानानं भरून आलं ! त्या स्वागतिकेन मला दफनभूमीचा नकाशा दिला. ‘कार्पेन्टर/ Eighmie  लॉट’ कुठे आहे त्याची खूण  नकाशावर केली आणि तिथे जायचा मार्गही दाखवला.  आमचे  मिशन ‘ए २१६’ सुरु कझाले ! ( Eighmie हे कार्पेन्टर मावशीच्या माहेरचे नाव. ) मी  त्यांच्या नोंदणीपत्रकात मोठ्या अभिमानाने आमची नाव नोंदवली आणि आम्ही मार्गस्थ झालो. कार...