समाजमाध्यमांवरचा वैधानिक इशारा काय कामाचा ?
स माजमाध्यमांचा अतिवापर ही बाब फक्त भारतापुरती काळजीची बाब उरलेली नाही. ती समस्या जगभरची आहे. अगदी लहान वयापासून मुलांचे या समाजमाध्यमांच्या आहारी जाणे त्यांच्या मानसिक / शारीरिक / सामाजिक वाढीसाठी हानिकारक ठरत आहे, हे अनेक वेळा सिद्ध झाले आहे. मुले समाजमाध्यमांपासून दूर राहावीत म्हणून आधी पालकांनी प्रयत्न करायला हवेत. परंतु तेच मुलांच्या हाती फार लवकर मोबाईल सोपवत असल्याचे बघायला मिळते. मोबाईल अथवा समाजमाध्यमे आजच्या काळात पूर्णतः बाजूला करता येणार नाहीत हे खरे असले तरी त्याचा अतिवापर धोक्याचा ठरत आहे हे दिसतेच आहे. अमेरिकेच्या सर्जन जनरल यांनी वर्षभरापूर्वी जाहीर इशारा दिला होता आणि मुलांकडून समाजमाध्यमांचा अतिवापर होणार नाही याची काळजी घेण्यास सांगितले होते. परंतु परिस्थिती सुधारली नाहीच. आता सर्जन जनरल डॉ विवेक मूर्ती यांनी सोमवारी अमेरिकेच्या न्यू यॉर्क टाइम्समध्ये एक लेख लिहून पुन्हा जाहीर इशारा दिला आहे. आता या संदर्भातली आणीबाणीची परिस्थिती आहे, असे त्यांनी म्हटले आहे. तरुण मुलांचे मानसिक आरोग्य वेळीच सुधारा असे सांगताना समाजमाध्यमांवर ठळकपणे (सिगारेटच्या पाकिटावर असतो तस...