वास्तव
‘ रिस्पॉन्सिबल नेटिझम’ ही संस्था गेली आठ वर्ष शालेय / महाविद्यालयीन मुले, सायबर सिक्युरिटी तज्ज्ञ मानसोपचार तज्ज्ञ, शिक्षक आणि इतर अनेक लोकांबरोबर काम करत आहे. सायबर सिक्युरिटीचे धडे या सर्वांना देत आहे अथवा त्यांची मदत घेऊन या क्षेत्रात भरीव काम करत आहे. गेल्या आठ वर्षात या संस्थेने किमान दहा लाख मुलांना सायबर सिक्युरिटी विषयी जागृत केले आहे आणि हे काम अव्याहतपणे अजून चालू आहे आपण, मुले इंटरनेट खूप वापरतात असे म्हणत असतो आणि सध्याच्या lockdown काळामध्ये तर मुलांना वेळ घालवायला इंटरनेटशिवाय दुसरे काहीच साधन नाही, असेही आपण म्हणतो. काही शाळांनी ऑनलाईन धडे सुरुवात केली आहे त्या धड्यांचा या मुलांना फायदा होतो आहे आणि या ऑनलाईन राहण्यामुळे मुले अधिक स्क्रीनजवळ जात असली तरी तो इंटरनेटचा सकारात्मक वापर आहे असे म्हणायला हवे. तरीही एकंदरीत ही मुले इंटरनेटवर नेहमी काय करतात, त्याचा कसा वापर करतात याचा एक तपशीलवार आढावा रिस्पॉन्सिबल नेटिझमने नुकताच घेतला. सायबर पीस फाउंडेशन या संस्थेची मदत त्यांना मिळाली. त्याचबरोबर एम एस सी ई आर टी आणि इतर स...