श्वासविज्ञान सोप्या शब्दांत ..

 प्रत्येक सजीव प्राण्यामध्ये सर्वात महत्वाचा घटक कोणता? त्याचा श्वास ! श्वास चालू आहे तोपर्यंत शरीराला अर्थ आहे. अन्यथा निर्जीव शरीराला काहीही अर्थ नाही. शरीरातील प्रत्येक अवयवावर उपचार करणारे डॉक्टर आहेत, रुग्णालये आहेत. श्वास हा शरीराचा अवयव नाही, तरीही सर्वात महत्वाचा आहे. अशा श्वासाबद्दल जेवढा विचार व्हायला हवा तेवढा होत नाही. किंबहुना या ‘आपोआप’ चालणाऱ्या प्रक्रियेकडे आपले लक्षच जात नाही. एकदम आजारी पडलो अथवा (कोविडसारख्या) आजारात श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला तर याकडे आपले लक्ष जाते. नाहीतर नाकाने घ्या अथवा तोंडाने घ्या श्वास तो श्वासच, त्यात काय, असा विचार आपण करतो. खूप सर्दी झाल्यावर नाक चोंदते तेव्हा आपोआप तोंडाने श्वास घेतला जातो हे खरे असले तरी तोंडाने श्वास घेणे हे काही खरे नाही.

श्वास या विषयावर सखोल अभ्यास करावा, शेकडो डॉक्टरना / विविध क्षेत्रातील लोकांना भेटून माहिती गोळा करावी आणि हा अभ्यास पुस्तकरूपाने लोकांसमोर आणावा हे काम पत्रकार जेम्स नेस्टर यांनी केले. किमान दहा वर्षे त्याचा पूर्ण अभ्यास त्यांनी केला. त्यातूनच ‘Breath  – The New  science  of  lost  art  ‘ हे जगप्रसिद्ध पुस्तक जन्माला आले.  त्याचे बहुतेक परदेशी भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत. हिंदीत झाल्यावर आता नवजात शिशु व मुलांचे आरोग्यतज्ज्ञ असणाऱ्या आणि मुंबईत ४५ वर्षांचा अनुभव असणाऱ्या डॉ. शशिकांत वैद्य यांनी हे पुस्तक मराठीत आणले आहे. डॉ. वैद्य यांनी ‘Breath  – The New  science  of  lost  art  ‘चे भाषांतर ‘विस्मृतीत गेलेल्या श्वासाचे विज्ञान’ असे सुंदर केले आहे. पुस्तकाचे प्रकाशक आहेत मनोज अंबिके यांचे मायमिररर पब्लिशिंग हाऊस (पुणे). असे वेगळे पण आवश्यक पुस्तक काढायचा निर्णय त्यांनी घेतला याबद्दल त्यांचे अभिनंदन. डॉ. वैद्य यांनी मूळ इंग्रजी भाषेतील पुस्तकाचा अनुवाद केला असला तरी तो इतका सरस झालाय की हे पुस्तक मूळ मराठीतच लिहिले आहे असे वाटावे. मराठी माध्यमातून शालेय शिक्षण घेतल्याचा हा एक फायदा असे ते म्हणतात. पुस्तकाचा विषय वैद्यकीय असूनही ते कुठेही कंटाळवाणे होणार नाही, वैद्यकीय क्षेत्राबाहेरील सामान्य माणसालाही वाचता / समजून घेता येईल असे झाले आहे, याचे श्रेय डॉ. वैद्य यांना द्यायला हवे.
श्वास याबाबत डॉ. वैद्य म्हणतात – ”श्वास या विषयावरचे भारतीयत्व तर जगन्मान्य आहेच व प्राचीन काळापासून, अगदी ऋषीमुनींपासून ते आजच्या पिढीपर्यंत आपल्यालाही ते अवगत आहे. तसे उल्लेखही या पुस्तकात जागोजागी आहेत. या विषयाचा सार्वत्रिक- जागतिक आढावा एकत्रितपणे प्रयोगात्मक पद्धतीने उलगडणारे हे पुस्तक आहे. श्वास म्हणजे एक नुसतीच दैनंदिन क्रिया नसून तिच्यामागचा विचार, त्यातील शास्त्र, त्याचा विविध मार्गांनी केलेला अभ्यास यातून जन्माला आलेले हे पुस्तक आहे. श्वास घेणे व श्वास सोडणे एवढ्यापुरतेच हे विज्ञान मर्यादित आहे का ? की त्याच्याही पलिकडे जाऊन श्वासकलेतील विस्मृतीत गेलेल्या विज्ञानात डोकावून पाहावे, हा विचार या पुस्तकात केला आहे. वाचकांना हे रंजक वाटेल ही खात्री वाटते.”
मूळ लेखक जेम्स नेस्टर म्हणतात – ”तुम्ही काय खात आहात, तुम्ही किती व्यायाम करता, तुम्ही किती स्लिम आहात किंवा तरुण आहात किंवा स्मार्ट आहात याने काहीही फरक पडत नाही. जर तुम्ही नीट श्वास घेत नसाल तर यापैकी कशाचाही फायदा होणार नाही. ”. पुस्तकात असंख्य डॉक्टर, मानववंशशास्त्रज्ञ , रुग्ण, खेळाडू, विविध क्षेत्रातील लोक यांचे अनुभव आहेत. मोठ्या प्रगत देशातच नव्हे तर भारतातही स्लीप अप्निया (झोपेतील श्वासावरोध) हा आजार वाढतो आहे. तो हाताबाहेर गेल्यास गंभीर परिणाम होऊ शकतात. त्याबरोबरच चुकीच्या श्वास घेण्याच्या पद्धतीमुळे आणखी काही आजार होऊ शकतात. सामान्यतः माणूस यांचा विचार करत नाही. हे पुस्तक वाचल्यावर तो करतील अशी अपेक्षा आहे.
सोबत मुद्दाम पुस्तकातील दोन प्रकरणे देत आहे. पहिले आहे प्रस्तावनेचे.  दुसरे थेट समारोपाचे. (समारोपाचे प्रकरण संपादित स्वरूपात आहे. ) पुस्तकात या दोन्हीच्या मधले बरेच काही आहे. ते संपूर्ण वाचण्याची उत्सुकता वाचकाला निश्चित वाटेल यात शंका नाही. (पुस्तकासाठी संपर्क – ०२०२४२२६४३२ आणि ९४२२३१६६८९.)

प्रस्तावना 

ऑमिटीव्हीलेच्या* (परिकथेतील भयसदृश जागा) बाह्यदृश्यासारखी ती जागा दिसत होतीरंग उखडलेल्या भिंतीधुळकट खिडक्याचंद्रप्रकाशात धडकी भरेल अशा सावल्या – फाटक उघडून मी आत शिरलोकरकर वाजणार्या पायर्या चढल्यानंतर मी दरवाजा ठोठावला

दरवाजा उघडल्यावर एका तिशीतल्या महिलेने माझं स्वागत केलं  मला आत बोलावलंदाट भुवया  मोठाल्या शुभ्र दंतपंक्ती असलेल्या त्या स्त्रीने मला बूट काढायला सांगितले  मला ती गुहेसारख्या एका दालनात घेऊन गेलीत्या दालनाचे छत निळसर आकाशी अस्पष्ट ढगासारखे होतेखडखडाट करणार्या खिडकीजवळ मी बसलो  त्या पिवळसर प्रकाशात मी काही माणसे आत येताना पाहिलीत्यातल्या एकाचे डोळे कैद्यासारखे दिसत होतेतर एकाची चर्या जेरी लुईससारखी करारी होतीत्यात एक गोरी महिला होतीतिची कपाळावरची बिंदी मध्यापासून सरकली होतीत्यांची एकमेकांना अभिवादन करतानाची कुजबूज  एकमेकांना घासणार्या पायांची सरसर ऐकू येत होतीमधूनच एक रोज जाणारा ट्रक – कागदी विमानांसारखा आवाज करत बाहेरून मार्ग काढत गेलामी माझा कमरेचा पट्टा काढलाजीनपँटीचे वरचे बटण ढिले केले  शांतपणे बसून राहिलो.

मी इथे माझ्या डॉक्टरांच्या शिफारशीमुळे आलो होतोडॉक्टर म्हणाले होते – ब्रीदिंग क्लासचा तुला उपयोग होईलमाझी निकामी होऊ लागलेली फुप्फुसे पुनरुज्जीवित झाली होतीमाझं थिजलेलं मन शांत होईलमला एक नवीन दृष्टी मिळेल.

गेले काही महिने माझ्या आयुष्याचा खडतर प्रवास चालू होताव्यवसायाची चिंता तर होतीचपण माझे 130 वर्षांचे जुने घरही पडायला आले होतेनुकताच मी न्यूमोनियातून बाहेर येत होतोतसं तर मला गतवर्षी  त्या आधीच्या वर्षीही न्यूमोनिया होऊन गेला होताश्वासाला धाप लागलेली असतानाही काम करण्यात माझा सर्व वेळ जात होताएक एक आठवडा मी जुनेच वर्तमानपत्र वाचत होतोत्याच त्याच वाडग्यातून मी दिवसभरात तीन तीन वेळा जेवत होतो.

 मानसिकशारीरिक अशा चाकोरीयुक्त रगाड्यातून मी चाललो होतोअसं आयुष्य काही महिने घालवल्यानंतर मी डॉक्टरांचा सल्ला घेतला होता आणि मग श्वासप्रक्रियेचं शिक्षण देणारा अभ्यासक्रम मी निवडला होतात्याचं नाव होतं ‘सुदर्शनक्रिया’.

सायंकाळी 7 वाजता एका दाट भुवया असलेल्या महिलेने पुढचं दार बंद केलं  ती आमच्या घोळक्यामध्ये येऊन बसलीएका ध्वनिवर्धक खोक्यामध्ये तिने एक कॅसेट टेप घातली  बटण दाबून चालू केलीआम्हाला तिने डोळे बंद करण्यास सांगितलेएका खरखरणार्या आवाजामधून एका भारतीय उच्चारातील पुरुषाचा आवाज येऊ लागलाआनंदमयीसुश्राव्यएखाद्या हास्यचित्रातून यावा असात्याने आम्हाला हळुवारपणे नाकातून श्वास आत घेण्यास सांगितले  नंतर श्वासावर मन केंद्रित करून श्वास संथपणे बाहेर सोडण्यास सांगितले.

आम्ही काही मिनिटांसाठी उजळणी केलीथंडगार खिडकीखाली ठेवलेल्या घोंगडीच्या ढिगातली एक घोंगडी काढून मी पायाखाली घेतलीमी श्वास घेत राहिलो पण काहीच घडलं नाहीमला शांतता लाभली नाही की माझ्या आखडलेल्या स्नायूंना शिथिलता आली नाही

दहा ते वीस मिनिटे झाली असतीलमी थोडा वैतागलोच होतोधुळीने माखलेल्या जुन्या व्हिक्टोरियन घराच्या फरशीवर माझी संध्याकाळ घालवल्याचा मला खेद वाटू लागलाडोळे उघडून मी आजूबाजूला पाहिलंकैद्याचे डोळे झोपाळलेले होतेजेरी लुईस थकून गेला होताबिंदीची चर्या थिजल्यासारखी दिसत होती  चेहर्यावर चेशायर मांजरीसारखं कृत्रिम हास्य होतंमला उठून जावंसं वाटत होतं पण ते अशिष्ट दिसलं असतंहे सत्र निःशुल्क होतंशिकवणार्याला पैसे मिळणार नव्हतेत्या उपकाराचा मला आदर करायचा होतामी डोळे मिटलेघोंगडे करकचून लपेटून घेतले आणि श्वास घेऊ लागलो.

त्यानंतर काहीच घडलं नाहीकाही बदल होण्यासाठी मी जागरूक नव्हतोमी निवांतही झालो नव्हतोमाझ्या मनातील कष्टप्रद विचारही गेले नव्हतेपण मला जाणवू लागलं कीएका जागेपासून निघून दुसरीकडे नेला जात होतोहे सर्व क्षणार्धात घडलं.

टेप वाजणं बंद झालं आणि मी डोळे उघडलेमाझ्या डोक्यावरचा भाग मला ओलसर जाणवू लागलातो पुसण्यासाठी मी हात फिरवला तेव्हा जाणवलं कीमाझे केसही ओले झाले होतेमी चेहर्यावरून हात फिरवलाडोक्यालाही खारटपणा आला होतामी खाली शरीराकडे पाहिलंमाझा स्वेटरजीनही घामाने डबडबले होतेत्या थंडगार खिडकीखालचं खोलीचं तापमान 68 डिग्री होतंप्रत्येकाने गरम राहण्यासाठी टोपी असलेलं जॅकेट घातलं होतंमी मात्र मॅरेथॉन पळून आल्यासारखा घामाने थबथबलो होतो.

इन्स्ट्रक्टर माझ्याजवळ येऊन विचारपूस करू लागलीमी आजारी तर नाही नामला ताप तर नाही ना याची चौकशी करू लागलीमी अगदी ठीक असल्याचं तिला सांगितलंनंतर तिने मला शरीरातील उष्णतेबद्दल काहीसं सांगितलं  प्रत्येक आत घेतलेल्या श्वासागणिक नवीन ऊर्जा कशी मिळते  उच्छ्वासातून साठलेली ऊर्जा कशी बाहेर पडते हे समजावलंमी समजून घेण्याचा प्रयत्न केला पण एकाग्र होऊ शकलो नाहीमाझ्या डोक्यात वेगळेच विचार घोंगावत होतेमी माझ्या भिजलेल्या कपड्यातून माझी सायकल घेऊन तीन मैल हॅट ते ॅशबेरी कसा जाणार होतो?

दुसर्या दिवशी मला जरा बरं वाटू लागलंजाहिरातीतील उल्लेखाप्रमाणे मला शांतहलकं वाटत होतंहा अनुभव मला खूप काळानंतर आला होतामला छान झोप लागली होतीछोट्या छोट्या गोष्टींचं दडपण मला इतकंसं येत नव्हतंमाझ्या खांद्यावरचं ओझं कमी वाटत होतंकाही दिवस हा अनुभव येत राहिला.

असं नक्की काय झालं होतंत्या जुनाट घरातदुमडलेल्या पायाने घेतलेल्या एका तासाच्या श्वास घेण्याने असा काय खोलवर परिणाम झाला होता?

पुढच्या आठवड्यात मी ब्रीदिंग क्लासमध्ये परत गेलोपुन्हा तोच अनुभवपण ओलसरपणाचा अनुभव कमी झाला होतामी माझ्या घरातील मंडळींना किंवा मित्रांना याबाबत सांगितलं नव्हतंपण मी मात्र काय काय होत होतं याचा अभ्यास येणार्या काळात करत राहिलो.

त्या काही काळात मी माझं घर सावरलंमाझ्या विवंचना मागे टाकल्याश्वासाबाबतीतल्या काही प्रश्नांची उकल करू लागलोया दरम्यान मी ग्रीसला गेलोएका श्वासागणिक पाण्याखाली शेकडो फूट कसं जायचं याचं ज्ञान देणारा लेख मी लिहिलामुक्तपणे पोहण्याची विचारपद्धती मी लिहिलीसहजपणे पाण्यात बुडी मारणार्या कुशल जलतरणपटूंच्या मी मुलाखती घेतल्याका आणि कसं हे विचारलंआपल्या शरीराला 12-12 मिनिटं श्वास  घेता राहण्याचं प्रशिक्षण घेतलेली माणसं मी निवडलीत्याबाबतची जिज्ञासा शास्त्रज्ञांनाही नव्हतीफारशी प्रसिद्धी नसणार्या या माणसांमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियरजाहिराततज्ज्ञजीवशास्त्रज्ञवैद्यकशास्त्रज्ञ यांचा समावेश होता.

बहुतेक जण पोहताना पाण्याखाली गेल्यावर दहा फुटातच परत वर येतातत्यांचे कान वाजू लागतातमुक्तपणे डुबकी मारणार्या जलतरणपटूंचा अनुभवही हाच होतात्यांच्यातला बदल हा सरावामुळे झालात्यांनी त्यांच्या फुप्फुसांना तयार केलंश्वासप्रक्रियेवर नियंत्रण ठेवलंबाकीचे जण इथेच दुर्लक्ष करतातसामान्य प्रकृतीची कुणीही व्यक्ती शंभरदोनशेच काय पण अगदी ३००  फुटापर्यंतही बुडी मारू शकतेतुमचं वय कितीही असोवजन कितीही असोआनुवंशिक स्थिती काहीही असोफ्री डाईव्हींग करण्यासाठी तुम्हाला श्वासाचं तंत्र आत्मसात केलं पाहिजेत्यांच्यासाठी श्वास ही एक सहज नैसर्गिक प्रक्रिया होतीत्यांना मिळालेली ही ऊर्जा एक दृष्टी– एक प्रतिक्रिया – एक उपचार होतात्यामुळेच त्यांना हे अतिमानवी बळ येत होतं

जेवढे जेवणाचे प्रकार तेवढे श्वास घेण्याचे प्रकार’ असं एक महिला इन्स्ट्रक्टर म्हणालीतिने चक्क श्वास रोखून दाखवला होता  एकदा तर ३०० फूट खोल बुडी मारली होतीती असंही म्हणाली की, ‘‘प्रत्येक वेळा घेतलेल्या श्वासाचा शरीरावर वेगवेगळा परिणाम होतोएका डायव्हरने सांगितलं कीश्वास घेण्याच्या काही प्रकारांमुळे मेंदूला चालना मिळते तर काहींमुळे मेंदूपेशींना इजा होतेकाही प्रकार आपल्याला निरोगी बनवताततर काही प्रकारांमुळे अकाली मृत्यूही संभवतो.’’ 

त्यांनी अशा काही अद्भुत गोष्टी सांगितल्या कीज्या श्वासपद्धतीमुळे त्यांच्या फुप्फुसाचा विस्तार 30 टक्क्यांपेक्षा जास्त झालाफक्त श्वास घेण्याची प्रक्रिया बदलण्याने एका भारतीय डॉक्टरने आपलं वजन कित्येक पौंड कमी केल्याचं सांगितलंएकाने तर लेश्रळ नावाच्या जंतूंचं इंजेक्शन टोचून घेतलं  नंतर एकलय पद्धतीने श्वास घेऊन आपली प्रतिकारशक्ती वाढवली  काही मिनिटांतच त्या तयार झालेल्या विषारी द्रव्याचा नाश केलाएका स्त्रीने आपला कॅन्सर उलटवल्याचं सांगितलंकाही भिक्षूंनी आपल्या शरीराभोवतालचे बर्फाचे घेरे काही तासांतच वितळल्याचं सांगितलंमला मात्र हे अतिरंजित वाटलं.

अंडरवॉटर या विषयावर शोधकार्य करताना मी ढीगभर साहित्य डोळ्याखालून घातलंजाणीवपूर्वक केलेल्या श्वासक्रियेचा एखाद्या नवख्या नाविकावर होणारा परिणाम कुणीतरी अभ्यासला असेलचपाण्याच्या आत जाऊन पोहणार्यांच्या अद्भुत गोष्टी कुणीतरी संकलित केल्या असतीलच की ज्या पोहण्याने वजन कमी होईलदीर्घायुषी आरोग्य लाभेल.

मला एक ग्रंथालय भरेल एवढे संदर्भ मिळालेप्रश्न होता कीहे जुने संदर्भ शेकडोहजारोंच्या संख्येने होते.

सुमारे४०० BCE पूर्वीची चीनी टाओची सात पुस्तके होतीजी पूर्णपणे श्वासाविषयी होतीही क्रिया कशाप्रकारे केली की ज्याने स्वास्थ लाभेल किंवा कदाचित नाशाप्रत नेईल याचा उल्लेख होताश्वासावर नियंत्रण कसं ठेवावंतो संथ कसा करावारोखून कसा धरावाघशावाटे आत कसा घ्यावा याचं विचारपूर्वक वर्णन होतंप्राचीन काळातील हिंदूंनीसुद्धा श्वास आणि आत्मा यांच्यातील एकवाक्यता सांगताना श्वासावरील नियंत्रणाने मानसिक  शारीरिक संतुलनाबद्दल सांगितलं होतंत्यानंतरच्या काळात बुद्धसमुदायाने श्वासाचा उपयोग फक्त आयुर्मर्यादा वाढवण्यापुरता मर्यादित  ठेवता संवेदनक्षमता वाढवण्यासाठी करावा असं सांगितलंया वेगवेगळ्या संस्कृतींमधील लोकांसाठी श्वासप्रक्रिया हे एक प्रकारचं औषध होतं.

आपलं आयुष्य श्वासावर केंद्रित करणारा विद्वानस्वच्छ श्वास घेऊ शकतोहे टाओने सांगितलेलं तत्त्व खरं नाही काय?

या दाव्यांच्या सत्यतेसाठी मी श्वसनक्रियाविषयक वैद्यकीय संदर्भाचा  शोधकार्याचा अभ्यास केलापण माझा भ्रमनिरास झालामग एवढंच कळलं कीश्वास घेण्याची कला ही महत्त्वाची नाहीबर्याच डॉक्टरांनी  शोधकार्य करणार्या शास्त्रज्ञांनीसुद्धा अशीच मुलाखत दिलीतोंडाने श्वास घ्या किंवा नाकाने घ्यामिनिटाला २० वेळा घ्या किंवा १० वेळा घ्यासगळं सारखंचएकदा श्वास आत घेतला की पुढचं सगळं शरीर बघून घेईल.

श्वास म्हणजे काय हे पाहण्यासाठी आधुनिक वैद्यकतज्ज्ञाने तुमची केलेली चिकित्सा आठवून पाहाअसं शक्य आहे कीतुमच्या डॉक्टरांनी तुमचा रक्तदाबनाडीचे ठोकेतापमान तपासलं  नंतर तुमचं हृदय  फुप्फुसे तपासण्यासाठी छातीवर स्टेथॉस्कोप ठेवलाकदाचित तिने तुमचा आहारतुम्ही घेत असलेली व्हिटॅमिन्सतुमचा कामावर असलेला ताण याची विचारपूस केली असेलतुमचा आहारनिद्रा याची चौकशी केली असेलतुमच्या ॅलर्जीदमाडोकेदुखी याबद्दल विचारलं असेल.

पण तिने नक्कीच श्वासाची गती मोजली नाहीतिने रक्तातील ऑक्सिजन  कार्बनडायऑक्साईडची पातळी मोजली नाहीतुम्ही श्वास कसा घेता  त्या श्वासाची गुणवत्ता काय हे पाहिलं नाही.

तरीही जर मुक्तपणे पोहणारे वा प्राचीन ग्रंथ यावर विश्वास ठेवायचा म्हटलं तर आपण कसा श्वास घेतो यावरच सर्व अवलंबून असतंमग हे कसं कीएकाच वेळी हे महत्त्वाचं आहेही आणि नाहीही?

मी अधिकाधिक खोलवर जाऊन माहिती घेऊ लागलो आणि मग मला उलगडा होऊ लागलाअसे प्रश्न विचारणारा या काळातला मी एकटाच नव्हतोमी मूळ ग्रंथ उलगडत होतो  फ्री डाईव्हर आणि श्वासावर नियंत्रण ठेवणार्यांच्या मुलाखती घेत होतो तेव्हा तेव्हा हार्वर्डस्टेनफोर्ड  यांसारख्या इतर संस्थाही काही काही अद्भुत अनुभवांवर शिक्कामोर्तब करीत होत्यापण त्यांचं काम श्वसनसंस्थेवरील प्रयोगशाळेत होत नव्हतंश्वसनदोषावरील तज्ज्ञ फक्त फुप्फुसांच्या रोगावर काम करीत असं माझ्या लक्षात आलं – जसं कीकॅन्सरफुप्फुसे निकामी होणारे रोगआम्ही अशाच गंभीर समस्या हाताळतो असं त्या विकारातील तज्ज्ञांनी सांगितलंया विषयावरील संशोधन सूक्ष्मपणे अभ्यास करणार्या प्रयोगशाळेत चालू नव्हतं.

काही शास्त्रज्ञांनी श्वासक्रियेचा अभ्यास सुरू केलामानवी उत्क्रांतीनंतर आपली श्वासाची क्षमता बदलत चालली आहे हे त्यांच्या ध्यानी आलंऔद्योगिक क्रांतीनंतर आपली श्वासपद्धती घातकदृष्ट्या वाईट झाली आहे या निर्णयाप्रत ते आलेतुमच्यामाझ्यासारखे ९०  टक्केकिंबहुना आपण सगळेच चुकीच्या पद्धतीने श्वास घेत आहोत  त्यामुळे आपले दीर्घकालीन चालणारे रोग बळावत चालले आहेत.

आणखी एक आशादायक गोष्ट या संशोधनातून कळली ती म्हणजेआजच्या आधुनिक रोगांना परतवण्याची किंवा त्याची तीव्रता कमी करण्याची क्षमता आपल्या केवळ योग्यप्रकारे श्वास आत घेणे  बाहेर सोडणे या प्रक्रियेतून वाढू शकतेया विकारात दमाचिंताएकाग्रतेचा अभाव आणि चिडचिड – सोरीयासिस आणि अशा अनेक व्याधींचा समावेश होतो.

पाश्चिमात्य वैद्यकीय शास्त्राच्या विचारसरणीसाठी हा अभ्यास एक पलटवार होताहोहे खरं आहे की श्वासक्रियेच्या वेगवेगळ्या प्रकारांमुळे आपलं वजन  एकंदर स्वास्थ्यावर परिणाम घडू शकतोहेही खरं आहे कीफुप्फुसाचा आकार  कार्यक्षमताही बदलू शकतेत्यामुळे आपली मज्जासंस्थाप्रतिकारशक्ती  स्वास्थ्य यावर नियंत्रण ठेवता येतंआपण कसा श्वास घेतो यावरून आपण दीर्घायुषी होऊ शकतो हे एक सत्य आहे.

आपला आहार काहीही असोव्यायाम कितीही करत असाआपली गुणसूत्रेजीन्स कितीही लवचीक असोआपली अंगयष्टी बारीक असो की तरुण असोआपण बुद्धिमान असा किंवा नसाजोपर्यंत तुम्ही श्वास योग्य पद्धतीने घेत नाही तोपर्यंत या सार्याला काही महत्त्व नाहीया तत्त्वाचा मागोवा या संशोधकांनी घेतलाआपल्या सुस्वास्थ्यातील हरवलेला स्तंभ म्हणजे श्वाससुरुवात तर तिथूनच होते.

आपल्याकडून आजवर निसटलेल्या श्वासाची कला  विज्ञान या विषयावर हे पुस्तक आहेसर्वसाधारणपणे १.३ सेकंदात आपल्या श्वास आणि उच्छ्वासात होणारा शारीरिक बदल उलगडत जाणारे हे पुस्तक आहेप्रत्येक श्वासागणिक शरीरात असलेले अब्जावधी रेणूतुमची हाडेस्नायूरक्तमेंदू  इतर अवयव पोषित असतातहे अतिसूक्ष्म रेणू उद्याचेच काय पण आयुष्यभराचे स्वास्थ्य ठरवत असतात.

मी याला हरवलेली कला म्हणतोय खरंपण या गोष्टी अजिबात नवीन नाहीतमी सांगणार असणार्या बर्याच गोष्टी वर्षानुवर्षे अस्तित्वात आहेतकाळाच्या ओघात त्या अस्तित्वात येऊन त्यावर शिक्कामोर्तब होऊनसुद्धा त्या विसरल्या गेल्याआणि कुठल्याशा वेगळ्या संस्कृतीत येऊन पुन्हा लुप्त झाल्याहे वर्षानुवर्षं चालू राहिलं.

या शास्त्राचे पुष्कळसे मूळ शोधक हे स्वतः शास्त्रज्ञ नव्हतेकाही तर ठग होतेमी त्यांना ‘पल्मोनॉट’ म्हणतोत्यांच्यात यादवी युद्धखोर होतेफ्रेंच केशभूषाकार होतेऑपेरा सिंगर होतेभारतीय गूढवादी होतेजलतरण शिक्षक होतेझेकोस्लोव्हाकियाचे ऑलिम्पिकपटू होतेनॉर्थ कॅरोलिनातील गायकवृंद होते.

यातील काही ‘पल्मोनॉटनी ते जिवंत असेपर्यंत खूप मानमरातब मिळवलापण त्यांच्या मृत्युनंतर मात्र त्यांचं संशोधन गाडलं गेलं किंवा विखुरलं गेलंगेल्या काही वर्षांत त्या तंत्रांचा पुन्हा अभ्यास करून ती तंत्रे शास्त्रीयदृष्ट्या तपासली गेली  सिद्ध केली गेलीएकेकाळच्या वरवर वाटणार्या  विस्मृतीत गेलेल्या संशोधनाला उपयुक्त अशी झळाळी मिळाली.

पण मग मी श्वास कसा घ्यावा हे नव्याने का शिकावंमी तर आयुष्यभर श्वास घेतोच आहे की.’’

तुम्ही विचारत असलेला हा प्रश्न माझ्याही मनात संशोधनाच्या सुरुवातीपासूनच डोकावत आहेआपली चुकीची धारणा आहे कीश्वसनक्रिया ही एक सहजक्रिया आहेश्वास चालू असणं म्हणजे जगणं आणि बंद झाला की मरणं अशा दोन तत्त्वांत बसणारी ही क्रिया नाहीमी जसजसं या विषयाचं मंथन करू लागलो आणि व्यक्तिशः लक्ष घालू लागलो तसतसं मला या मूळ सत्यामध्ये तुम्हालाही सहभागी करावंसं वाटलं.

अनेक प्रौढांप्रमाणेच मी पण श्वासविचारांनी पछाडलो आहेम्हणूनच मी वर्षभरापूर्वी ब्रीदिंग क्लासमध्ये आलोआणि अनेकांप्रमाणे माझ्याही लक्षात आलं कीॅलर्जीची औषधंइनहेलरआहारपूरक मिश्रणे यांनी फार काही चांगलं होत नाहीनवीन पिढीच्या पल्मोनॉटनी मला बरंच काही देऊ केलं  बरं होण्याचा मार्गही दाखविला.

हे पुस्तक शेवटपर्यंत वाचताना सुमारे १०,०००  श्वास होतातमाझं लिखाण जर योग्य रितीने मांडलं असेल तर अथपासून इतिपर्यंत वाचताना तुम्हाला श्वासाचं शास्त्र प्रत्येक श्वासागणिक उलगडत जाऊ शकेलश्वास एका मिनिटाला वीस वेळा घ्या किंवा १०  वेळा घ्या – तोंडावाटे घ्या किंवा नाकावाटे घ्याकिंवा श्वासमार्गात घातलेल्या नळीने घ्या – हे सर्व प्रकार सारखे नसतातआपण श्वास कसा घेतो याला महत्त्व आहे.

आधुनिक मानव ही एकमेव प्रजाती आहे जिला वाकडेतिकडे दात असतात  त्याचा श्वासाशी संबंध असतोतुमच्या लक्षात येईल कीश्वासाच्या बाबतीत दिवसेंदिवस आपली अधोगतीच होत आहेगुहेतील मानवांना घोरणं ठाऊक नव्हतंस्टॅनफोर्ड विद्यापीठातील एका अभ्यासावरून असा निष्कर्ष आला कीआपण जो नाकातून किंवा तोंडावाटे श्वास घेतो त्यात विसंगती आहेविशेषतः तुम्ही जर घोरत असाल तर तुमच्याच दिवसरात्री बिघडून जातातआता तुमच्या पुढील श्वासांसाठी तुम्हाला उपचार सापडतील.

तुमच्या ३०००  व्या श्वासाला तुम्हाला आरोग्यवर्धक श्वासाबद्दल मूलभूत माहिती मिळेलहे श्वसनाचे संथ  विलंबित प्रकार सर्वांनाच खुले आहेतवयोवृद्ध असा की तरुण – आजारी असा की निरोगी – श्रीमंत असा  गरीबहे प्रकार हिंदूधर्मातबौद्ध धर्मातख्रिश्चन धर्मात आणि अशा अनेक धर्मांत हजारो वर्षं प्रचलित आहेतपण आत्ता आत्ताच आपल्याला कळून आलं आहे कीत्यामुळे रक्तदाब कमी होऊ शकतोखेळात प्रावीण्य मिळू शकतंआणि मज्जासंस्थेचं संतुलन होऊ शकतं.

 तुमच्या ६०००  व्या श्वासाला तुम्ही महत्त्वाच्या जाणीवपूर्वक श्वासापर्यंत पोचला असालतुम्ही नाकतोंड यांच्या पलीकडे फुप्फुसापर्यंत पोचला असालतेव्हा तुम्ही भेटाल मध्ययुगीन ‘पल्मोनॉटला ज्यांनी दुसर्या महायुद्धात फुप्फुसांचे रोग झालेल्या वयोवृद्ध सैनिकांना बरं केलं होतंआणि ऑलिम्पिकसाठी धावणार्या धावपटूंना सुवर्णपदकासाठी तयार केलं होतंहे सर्व फक्त श्वास बाहेर सोडण्याच्या पद्धतीमुळे

८०००  व्या श्वासापर्यंत तुम्ही शरीराच्या सर्व भागांना स्पर्श केला असेलसर्वात महत्त्वाच्या मज्जासंस्थेला दीर्घश्वसन पद्धतीच्या शक्तीची जाणीव तुम्हाला होऊ लागेलवक्र झालेले मणकेक्षीण झालेली प्रतिकार शक्ती यावर मात करणार्या ‘पल्मोनॉटना तुम्ही भेटालशून्याखाली गेलेल्या तापमानात उष्णता निर्माण करणं शक्य होईलअशक्य आता शक्य होऊ शकेलयाच्या बरोबरीनेच मी पण शिकत असेन की त्या जुनाट व्हिक्टोरियन घरातदशकापूर्वी असं काय घडलं होतं

तुमच्या १०,०००  व्या श्वासापर्यंत म्हणजे जेव्हा तुम्ही पुस्तकाच्या अखेरीपर्यंत आला असाल तेव्हा माझ्या ध्यानात येईल कीतुमच्या फुप्फुसात गेलेली हवा तुमच्या आयुष्याची प्रत्येक क्रिया कशी प्रभावित करू शकली असेल आणि शेवटच्या श्वासापर्यंत कशी पूर्ण विकसित झाली असेल

हे पुस्तक खूप गोष्टी उलगडत जाईलमानवी उत्क्रांती (evolution), चिकित्साशास्त्र  (medical history), जैवरसायन शास्त्र (biochemistry), शरीर विज्ञान (physiology), भौतिक शास्त्र (physics), व्यायामपटूंची सहन करण्याची क्षमता (athletic endurance) आणि बरंच काहीपण सर्वात महत्त्वाचं म्हणजेहे पुस्तक ‘तुम्हाला’ उलगडत जाईल

सरासरी काढली तर आपण आयुष्यभरात 670 दशलक्ष श्वास घेतोकदाचित तुमचे अर्ध्यापर्यंतचे श्वास झालेही असतीलकदाचित तुम्ही ६६९, ०००,००० व्या श्वासापर्यंत आला असालकदाचित तुम्हाला आणखी दशलक्ष श्वास घ्यायचे बाकी असतील.

 

समारोप 

एक अंतिम श्वास 

या जागेतील काही बदललं नाहीविसविशीत झालेला पर्शियन गालीचावार्याबरोबर खडखडाट करणार्या रंग उखडलेल्या खिडक्यापेज स्ट्रीटवर खडखडाट करत जाणारे डिझेल ट्रकरस्त्यावर झाकोळलेला पिवळा प्रकाशकाहीकाही चेहरेही तेच आहेतकैद्यासारखे डोळे असलेला एक माणूसदुसरा एक जेरी लुईससारखा गोंधळ करणारासोनेरी केसाची महिला जिचे शब्दोच्चार एखाद्या अतर्क्य पूर्व युरोपीय प्रांतासारखे होतेमी माझी सोफ्यातली जागा पकडली  खिडकीखाली बसून घेतलं.

मी दहा वर्षांनंतर या खोलीत आलो होतो  श्वसनाच्या शक्यता आजमावत होतोदशकभराचा प्रवाससंशोधन  स्वतःवर केलेले प्रयोगत्या अवधीत मला उलगडलं होतं कीश्वसनाचे फायदे अमाप आहेतकधीकधी अनाकलनीयपण त्यांनाही मर्यादा आहेत.

ही विचलित करणारी गोष्ट काही महिन्यांपूर्वी स्पष्ट झालीमी पोर्टलंडऑरिगॉनमध्ये होतो आणि नुकतंच माझं या पुस्तकातील उल्लेखांबद्दलचं भाषण पुरं केलं होतंमी व्यासपीठावरून उतरून सभेच्या बाहेरच्या भागात माझ्या मित्राला भेटण्यास गेलो तेव्हा एक महिला माझ्याजवळ आलीमोठ्या डोळ्यांची  थरथरणार्या हातांचीतिने मला सांगितलं कीतिच्या आईला नुकतंच पल्मनरी एम्बोलिझम (फुप्फुसातील रक्तवाहिन्यात होणार्‍या गुठळ्या ज्यात आकस्मिक अनपेक्षित मृत्यू संभवतो.)  झालं होतं  तिला फुप्फुसातील रक्ताच्या गुठळ्या काढून टाकण्यासाठीचं श्वसनाचं तंत्र अत्यंत निकडीने हवं होतं.

काही आठवड्यांनंतर विमानात माझ्याशेजारी बसलेल्या महिलेने माझ्या लॅपटॉपवरील मानवी कवट्यांचे फोटो पाहिलेतिने मी करीत असलेल्या कामाची विचारपूस केलीतिला मी त्याबद्दल सांगितल्यानंतर तिने तिचा एक मित्र आहाराच्या समस्येनेहाडं ठिसूळ होण्याच्या समस्येने  (ऑस्टिओपोरोसिस Osteoporosis)  कॅन्सरने ग्रस्त असल्याचं म्हटलंकुठलीही औषधयोजना लागू पडत नव्हतीत्या मित्राला काही श्वसनपद्धती वापरून पुन्हा मार्गावर आणता येईल का असं तिने विचारलं.

अशा लोकांना मी जे समजावतो  आत्ताच स्पष्ट करू इच्छितो की इतर उपचार किंवा औषधयोजनेप्रमाणेच श्वासक्रियाही सगळ्यावरच उपकारक ठरेल असं नाहीश्वास जलदहळू किंवा  घेणं यामुळे रक्तातील गुठळ्या जाणार नाहीतनाकावाटे घेतलेला दीर्घ उच्छ्वास हा आनुवंशिक चेतापेशी  स्नायू यांचे रोग उलटवू शकणार नाहीकुठलीही श्वासपद्धती चौथ्या स्टेजच्या कॅन्सरला बरं करू शकणार नाहीया सर्व व्याधींसाठी त्वरित वैद्यकीय उपचारांची गरज आहे.

प्रतिजीवी औषधंरोगप्रतिकारक लशी याशिवाय माझं जीवन अशक्य आहेलसिका गाठींना झालेला जंतूप्रादूर्भाव मला डॉक्टरांकडूनच बरा करावा लागेलआजपावेतो विकसित झालेल्या वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे हजारो जीव वाचले आहेतत्याच्यामुळे जीवनाच्या गुणवत्तेत मोलाची भर पडली आहे.

पण आधुनिक वैद्यकशास्त्राला आजही मर्यादा आहेततीस वर्षं दंतवैद्यक  निद्रा याविषयी तज्ज्ञ असलेल्या डॉमिशेल गेल्बने म्हटलं आहे, ‘मी चालणार्या मृतांवर काम करतो आहे’. हेच मी 40 वर्षं श्वसनक्रिया तज्ज्ञ म्हणून काम करणार्या डॉडॉन स्टोरी या माझ्या सासर्यांकडून ऐकलं आहेहार्वर्डस्टॅनफोर्ड  इतर संस्थेत काम करणार्या डझनभर डॉक्टरांनी हेच सांगितलं आहेआधुनिक वैद्यकशास्त्र एखाद्या निकडीच्या प्रसंगी शरीरातील एखादा रोगग्रस्त अवयव काढण्यासाठी किंवा टाके घालून पूर्ववत करण्यासाठी काम करेल पण दुर्दैवाने म्हणावं लागेल कीयाच वैद्यकशास्त्राला बर्याच जुन्या असलेल्या दमाडोकेदुखीमानसिक ताणस्वयंप्रतिकार रोगया व्याधींवर उपचार करताना मर्यादा आडव्या येतीलआधुनिक जगतातील अनेक समस्यांच्या बाबतीतही हेच.

या सर्व डॉक्टरांनी वेगवेगळ्या शब्दांत  वेगवेगळ्या मार्गांनी स्पष्ट केलं होतं कीजर एखाद्या मध्यमवयीन गृहस्थाला कामाच्या ठिकाणी ताणत्रासदायक आतड्यांच्या समस्यानैराश्यक्वचितच येणार्या हातापायाच्या मुंग्या यांनी ग्रासलं असेल तर त्याच्याकडे मूत्रपिंड निकामी झालेल्या व्यक्तींपेक्षा जास्त लक्षच दिलं जाणार नाहीउलट त्यांना रक्तदाबावरच्या किंवा नैराश्य दूर करणार्या औषधांची यादी देऊन त्यांची बोळवण केली जाईलआधुनिक डॉक्टरची भूमिका आग विझवणं आहेनुसता धूर बाजूला सारणं नाही

या व्यवस्थेवर कुणीही संतुष्ट नसतोडॉक्टरांकडे थोड्याथोडक्या समस्या पाहायलात्या टाळण्यासाठी  बर्या करण्यासाठी वेळही नसतो  समर्थनही नसतेआणि पेशंटना जितकं लक्ष हवं असतंतितक्या त्या समस्या महत्त्वाच्या नसतात.

माझ्यामते हे एक कारण आहे कीवैद्यकीय विषयाचे संशोधक श्वासप्रणालीकडे वळले आहेत.

सर्व पूर्वेकडील चिकित्सापद्धतीप्रमाणेचश्वासपद्धतीचा उपयोग प्रतिबंधात्मक देखभाल होण्यासाठी शरीराचा समतोल राखण्यासाठी होतो त्यामुळे छोट्याछोट्या समस्यांचं रूपांतर मोठ्या  गंभीर स्वास्थ्य समस्यांत होत नाहीहा समतोल वेळोवेळी बिघडला तर श्वासामुळे तो राखला जातो.

नोबेल पुरस्कार विजेता अल्बर्ट जेन्ट ग्योरगीने लिहिलं, ‘जीवन प्रणालीवर साठ वर्षांहून अधिक संशोधन केल्यानंतर मला असा विश्वास निर्माण झाला आहे की आपलं शरीर अगणित आजारांच्या यादीपेक्षा अधिक परिपूर्ण आहेत्यात जी वैगुण्यं आहेत ती आपण करणार्या त्याच्या दुरुपयोगापेक्षा अपूर्णतेमुळे आहेत.’  

जेन्ट ग्योरगी आपण निर्माण केलेल्या आजारांबद्दल बोलत होतेकिंवा मानववंशशास्त्रज्ञ रॉबर्ट कोरुसिनीच्या म्हणण्याप्रमाणे ते सामाजिक सुधारणांचं द्योतक होतंदहापैकी नऊ जीवघेणे रोग जसे की मधुमेहहृदयरोगपक्षाघातहे आपण खात असलेले अन्नआपण पीत असलेलं पाणीआपण वास्तव्य करीत असलेली घरंआपण काम करीत असलेलं ऑफिस यातून जन्माला येतातहे मानवनिर्मित रोग आहेत.

आपल्यातील काहीजण आनुवंशिकतेच्या दृष्टीने एखाददुसर्या रोगाला प्रवृत्त करत असतीलहीपण त्याचा अर्थ असा नाही की आपल्या प्राक्तनात ते रोग लिहिलेच आहेतगुणसूत्रं ज्याप्रमाणे सक्रिय होऊ शकतात तशीच ती निष्क्रियही करता येतातवातावरणातील उपस्थित गोष्टी त्याला प्रेरणा देतातआहारात केलेली सुधारणाव्यायाम  आपल्या राहत्या जागी  ऑफिसात निर्माण झालेला ताणतणाव  जाचक द्रव्यं दूर करणं याचा खोलवर  दीर्घकालीन परिणाम बहुतांश आधुनिक जुनाट रोग टाळण्यासाठी  बरा करण्यासाठी होतो

श्वास हीच एक प्रमुख संकल्पना आहेगेल्या दहा वर्षांत मी काय शिकलो की माझ्या फुप्फुसातून रोज जाणारी 30 पौंड हवा  1.7 पौंड पेशी वापरीत असलेला ऑक्सिजन हा तितकाच महत्त्वाचा आहे जितकं मी काय आहार घेतो  व्यायाम करतो हे महत्त्वाचं आहेश्वास हा आरोग्याचा हरवलेला स्तंभ आहे.

मला जर निरोगी आयुष्य जगण्याचा मंत्र एकाच संकेतात द्यायचा असेल तर मी फक्त चांगला श्वास घ्यायला शिकलं पाहिजे.’ असं अँड्र्यूू वेईल या प्रसिद्ध डॉक्टरचं मत होतं.

जरी संशोधकांना या अंत नसलेल्या अफाट विषयाविषयी अजून खूप शिकायचं आहे तरी आजमितीला उत्तम श्वास याविषयी बर्यापैकी एकमत झालं आहे.

थोडक्यात आपण हे शिकलो आहोत… 

Comments