चेहेरे आणि मुखवटे …
आपल्याला एखाद्या बँकेने कर्ज नाकारले तर आपण काय करतो? दुसऱ्या बँकेकडे जातो. त्या बँकेनेही दिले नाही तर आणखी वेगळी बँक बघतो. पण ‘तुम्ही कर्ज नाकारलेत, आता मीच माझी बँक काढतो’, असे कोणी म्हणते का ? तीन दशकांपूर्वी अवघे २५ वय असणाऱ्या विश्वास जयदेव ठाकूर या नाशिकच्या तरुणाने हेच उत्तर दिले. आणि दोन वर्षांतच बँक काढलीही. ती आज ‘विश्वास सहकारी बँक’ या नावाने प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रात सहकारी बँक आणि एकूणच सहकार क्षेत्र, त्याचे अर्थकारण, त्याबरोबर येणारे राजकारण, त्यातून काही सहकारी बँकांची वा संस्थांची (पर्यायाने सामान्य खातेदारांची) झालेली वाताहत या सगळ्यापासून विश्वास बँक दूर राहिली आणि केवळ ग्राहकहित लक्षात घेऊन सुरु करण्यात आलेली ही बँक आज आर्थिकदृष्ट्या भक्कम स्तरावर ताठ मानेने उभी आहे. काही सहकारी बँकांच्या नेत्यांनी प्रत्यक्ष / अप्रत्यक्षरीत्या बँक चालवता चालवता राज्य पातळीवर राजकारणही केले. मग काही वेळा ते राजकारण बँकांना गाळात घालणारेही ठरले. विश्वास ठाकूर यांनीही राजकारणात काही वर्षे काढली, पण बँकेचा ‘उपयोग’ त्यासाठी करणे कटाक्षाने टाळले. आज ते सक्रिय राजकारणात नाहीत. बँकेत मात्र पूर्णपणे सक्रिय आहेत. हा सहकारी बँकांच्या इतिहासातील अपवादच म्हणायचा.
सगळ्या सहकारी बँकांना एका माळेत गणले जाऊ नये. ग्राहकांनी बँकेत ठेवलेला पैसा जपण्याचे, तो कर्जाऊ देताना अथवा वृद्धिंगत करताना नियमाप्रमाणे आपणही नफा कमवायचा हे ब्रीद विश्वास बँकेने कायम पाळले. आपण या पैशाचे ‘विश्वस्त’ आहोत, त्यामुळे वाया जाणाऱ्या (म्हणजेच वसुली न होणाऱ्या) कर्जामुळे बँक बंद पडू शकते याचे भान कायम ठेवायला हवे. ही ‘विश्वस्त’पणाची भावना विश्वास ठाकूर यांच्या अनेक लेखांमधून ठळकपणे पुढे येत राहाते. इतरांनी यापासून धडा घेण्यासारखा आहे.
लोकांना मदत करायची तीही रिझर्व बँकेच्या नियमांच्या चौकटीत राहून. बँकेचे सगळे नियम पाळून. राष्ट्रीयीकृत बँक, सहकारी बँक, जिल्हा बँक या सर्वांसाठी वेगवेगळे नियम असतात. त्यामुळे विश्वास बँकेला कामाच्या काही मर्यादा होत्या. त्या सांभाळून ही बँक आज सुस्थितीत आली याचे श्रेय विश्वास ठाकूर आणि त्यांच्या सहकार्यांना द्यायलाच हवे. विश्वास बँक आता २७ वर्षांची झाली. ही वाटचाल सोपी नव्हती. विश्वास ठाकूर यांचा संचार साहित्यिक / आर्थिक / राजकीय / सामाजिक अशा सर्व क्षेत्रात असल्याने वेळोवेळी यातील लोकांची मदत त्यांनी घेतली. त्या लोकांनाही मदत केली. सगळेच भले होते असे नाही. समाजात वावरताना एक चेहेरा आणि प्रत्यक्षात वेगळी वागणूक हा अनुभव ठाकूर याना अनेकवेळा आला. बँकेला २५ वर्षे झाली तेव्हा अशाच २४ लोकांवर लिहिण्याचे ठाकूर यांनी ठरवले. त्याचवेळी २५व लेख स्वतःच्या चुकीवर लिहिण्याचे भानही दाखवले. आणि त्यातूनच ‘नात्यांचे सर्व्हिसिंग’ नावाचे पुस्तक जन्माला आले. स्वानंद बेदरकर यांच्या ‘शब्दमल्हार प्रकाशना’ने हे पुस्तक काढले आहे. हा रूढार्थाने कथासंग्रह असला तरी प्रत्यक्षात ‘सत्यकथा संग्रह’ म्हणायला हवे. कारण सगळ्या घटना खऱ्या आहेत, असे लेखकाचे म्हणणे आहे. मुख्य पात्रांची नावे मात्र बदलली आहेत. ही माणसे आजही समाजात उजळ चेहेऱ्यांनी वावरत आहेत. ही माणसे प्रामुख्याने नाशिकची असली तरी तसे बघितल्यास प्रत्येक शहरात अशी इरसाल माणसे सापडतील. हीच आज आपली शोकांतिका आहे. ‘नात्यांचे सर्व्हिसिंग’ हे पुस्तक प्रसिद्ध होऊन दोन वर्षे झाली आणि सुमारे २२ हजार प्रती विकल्या गेल्या आहेत. यावरून कथांमधले बाण नेमके कसे लागले आहेत याची कल्पना येते.
अर्थात सगळ्या कथांमध्ये राजकारणी माणसेच आहेत असे नाही. एखादा कर्जदार कर्ज परत करत नाही, तेव्हा त्यानंतर उलगडलेल्या घटनांचा विस्मयकारक पट कधी वाचायला मिळतो, ज्या अस्थिरोग तज्ज्ञाला जवळचे मानले त्यांचे शेवटी काय झाले, समाजात नाव असलेले लोक जेव्हा एखाद्या कर्जदाराचे कर्ज माफ करण्याच्या बहाण्याखाली येतात तेव्हा त्यांचे काय होते, कमकुवत बॅलन्सशीट असतानाही कर्ज दिल्यावर केवळ दुसरी बँक कमी व्याजदरात कर्ज देते म्हणून धक्का देणारे काहीजण, स्वतःचे पैसे परत मिळविण्यासाठी एका तरुणाला कर्ज देण्याची गळ घालणारे सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, साहित्यिक अशा सर्वच क्षेत्रात प्रभाव असणारे व्यक्तिमत्व, स्वतःचे कर्ज माफ करण्यासाठी विश्वास ठाकूर याना घेऊन मुंबई गाठणारे पण काम झाल्यानंतर एका मोठ्या सहकारी बँकेच्या निवडणुकीत दगा देणारे व्यक्तिमत्व, एका मोठ्या व्यक्तीच्या सांगण्यावरून तरुणाला स्वतःच्या बँकेत दिलेली नोकरी आणि नंतर त्या तरुणाने बँकेलाच दिलेली नोटीस, … असे एक ना अनेक माणसांचे मानवी स्वभावाचे कंगोरे आपल्याला वाचायला मिळतात. स्वतःच्या जावयाला कर्ज देताना त्याची जमीन तारण म्हणून ठेवून घ्या असे सांगणारे ‘मोठे’ व्यक्तिमत्व, शाळा सुरु करण्यासाठी कर्ज घ्यायचे, आपण किती नीतिमान आहोत ते सांगायचे, पण प्रवेश देण्याची वेळ आली तेव्हा वेगळा चेहेरा दाखवायचा…. अशीही माणसे यात दिसतात.
एखादे समाजसेवेचे व्रत घेऊन आपण जेव्हा प्रामाणिकपणे काम करतो तेव्हा प्रत्येकालाच अशा माणसांचा सामना करावा लागतो. मग तो माणूस बँकेत काम करत असो वा अन्य क्षेत्रात. असे मुखवटे उघडकीस आणण्याचे काम विश्वास ठाकूर यांनी केले आहे. प्रत्येकाला ते जमेलच असे नाही. ‘जाऊ दे , मोठा माणूस आहे, आपले कोण ऐकणार’, असे म्हणून आपण गप्प बसतो. याचाच फायदा हे ‘चेहेरे’ घेत असतात.
विख्यात साहित्यिक मधू मंगेश कर्णिक यांनी पुस्तकाला प्रस्तावना दिली आहे. ज्येष्ठ साहित्यिक वसंत आबाजी डहाके यांनी पाठवलेले पत्रही पुस्तकात आवर्जून समाविष्ट करण्यात आले आहे. पत्रात डहाके म्हणतात, ”नाती रक्ताची असतात आणि परिचयातून, सहवासातूनही तयार होत असतात. सर्वच नात्यांमध्ये परस्परांविषयीचा जिव्हाळा आणि वर्त प्रांजळपणा हवा असतो; परंतु मानवी स्वभावाचा, वृत्तींचा, हेतूंचा थांग कधीकधी लागत नाही आणि विपरीत वर्तनाचा प्रत्यय येतो. नाते गृहीत धरले जाते आणि मग जो अनुभव येतो त्याने माणसांना धक्का बसतो, ती हादरून जातात, कित्येकदा कोसळून पडतात. याचे कारण नात्यांना उजाळा दिला जात नाही, परस्परांच्या संबंधात आतूनच काही अंतराय आलेला असेल याची तर कल्पनाही केली जात नाही. विश्वास ठाकूर यांच्या शब्दांत सांगायचे तर नात्यांचे सर्व्हिसिंग केले जात नाही, तसे ते करायचे असते याची जाणीवही कित्येकांना नसते. नात्यांचे सर्व्हिसिंग या पुस्तकातील छोट्या गोष्टींच्या माध्यमातून लेखक ठाकूर यांनी काही सुखद, दुःखद अनुभवांचे कथन केलेले आहे. खरे तर या पुस्तकातील प्रत्येकच अनुभवकथनात विविध कथा लपलेल्या आहेत. या घडलेल्या, अनुभवास आलेल्या गोष्टी असल्यामुळे मी अनुभवकथन हा शब्द वापरला आहे. या पुस्तकाच्या या छोट्या गोष्टी नाडलेल्या, पीडलेल्या, हतबल, हताश, दुःखाहत, गैरफायदा घेऊ इच्छिणाऱ्या, स्वार्थ साधणाऱ्या अशा भिन्न भिन्न व्यक्तींच्या वर्तनाच्या आणि मनाच्या पृष्ठस्तरापलीकडे आणखी कायकाय दडलेले आहे याचा शोध घेण्याचे आवाहन वाचकाला करतात. माणसांचे परस्परांशी वागणे कधी सौहार्दाचे असते तर कधी सकारण, अकारण शत्रुत्वाचे असते. कधी ते विपरीत वागणे इतके अनपेक्षित असते की ही व्यक्ती एकाएकी अशी का वागायला लागली याचे आश्चर्य वाटत राहाते. या पुस्तकातील पंचवीस गोष्टींमधून मानवी स्वभावाचे आणि वर्तनाचे अनेक नमूने पाहायला मिळतात. बँकेच्या क्षेत्रातील व्यवहारातून हे सगळे अनुभव येत गेलेले असले तरी प्रत्येकच अनुभव मानवी स्वभावाच्या एखाद्या पैलूवर प्रकाश टाकणारा आहे आणि त्यांतून एकूणच मानवी वर्तनातील संगती, मुख्यतः विसंगती लक्षात येत राहाते. साध्या, सुबोध, अलंकरणरहित भाषेतून ठाकूर यांनी हे अनुभवकथन केलेले असल्यामुळे ते मनाला स्पर्श करते.”
लेखक विश्वास ठाकूर यांनी त्यांच्या प्रस्तावनेत भूमिका विशद केली आहे. ते म्हणतात, ”’नातं’ हा या सर्व कथांचा गाभा आहे. ते टिकवायचं असेल तर प्रेमाशिवाय कुठलाही अजेंडा असता कामा नये. नात्यात ‘हिशेब’ आला की मग आयुष्याचं ‘बॅलन्सशिट’ कधीही ‘टॅली’ होणार नाही हे मी शिकल्यामुळे या कथांचा शेवट होताना ‘नात्याचं सर्व्हिसिंग’ ही शब्दांची -जोडी येते. तोच त्या कथेचा कळस आहे. सलग दोन महिन्यांमध्ये या कथा लिहून पूर्ण झाल्या असल्यामुळे त्यातले सूत्र मला सलग आणि चांगले गुंफता आले. या सगळ्या माणसांनी माझ्या तळहातावर जो अनुभव ठेवला त्यातून इतरांनीही शहाणे व्हावे आणि आपले आयुष्य सुंदर करावे हाच या कथांमागचा हेतू आहे. पैसा समोर दिसला की माणसं बदलतात, विचित्र वागायला लागतात, त्यांच्या हेतूत खोट निर्माण होते. पैसा हे सर्वस्व नाही; पण पैसा नगण्यही नाही असे असताना आपले वर्तन कसे ठेवावे आणि माणसं कशी बांधून ठेवावी हे कथा सांगतात असे मला वाटते.”
नमुन्यादाखल पुस्तकातल्या दोन कथा देत आहे. पहिली आहे ‘ मैत्रीच्या नात्याला कात्री’. . त्यावरून पुस्तकांतल्या (सत्य)कथांची कल्पना येईल. दुसरी कथा अधिक भेदक आहे. तिचे शीर्षक आहे कृतघ्नतेचे काय करायचे ? दुसरी कथा राजकारण कसे चालते यावर चांगलाच झोत टाकते. दोन्ही कथा वाचल्यावर पूर्ण पुस्तक वाचवेसे वाटेल हे नक्की !
‘ मैत्रीच्या नात्याला कात्री’
मुकुंदरावांची आणि माझी दोन- तीन वेळा चुकामूक झाली. ते भेटीला यायचे तेव्हा नेमके कोणी ना कोणी येऊन बसलेले असायचे किंवा ते निवांतपणे आले तर मलाच पोहोचायला उशीर व्हायचा. तिसऱ्यांदा जेव्हा असे झाले तेव्हा मला फार अपराधी असल्यासारखे वाटू लागले. शेवटी मी फोन करून त्यांची माफी मागितली आणि उद्या आपण काही झाले तरी भेटूया असे सांगितले. अर्थात त्यांचे आणि माझे संबंध हे काम, भेट आणि माफी यांच्या पलीकडचे होते. शासकीय कार्यालयात प्लॉटच्या संदर्भात एका कामानिमित्त मी गेलो असताना त्यांची आणि माझी भेट झाली. माझ्या कागदपत्रांची फाईल पाहून त्यांना फारच आनंद झाला. तेव्हापासून आमचा जो स्नेह जुळला तो कायमचाच. माझे काम असेल, तर त्यांनी करावे. त्यांच्या कामात मी मदत करावी आणि होता होईल तेवढा समाजसेवेचा रथ पुढे न्यावा, असे आमचे चालले होते.
ठरल्याप्रमाणे ते आले तेव्हा माझ्यासमोरची सगळी कामं बाजूला ठेवत मी म्हणालो, “मुकुंदराव, बोला. पुढचा सगळा वेळ तुमच्यासाठी. तेव्हा त्यांनी बाहेर जाऊन एका मुलाला आत आणले आणि माझी ओळख करून दिली. म्हणाले, “हा अनिल परमार. माझ्या गावाकडच्या मामाचा मुलगा. म्हणजे माझा सख्खा मामेभाऊ. बी.कॉम. झाला आहे. आपल्या बँकेत याला नोकरी मिळाली, तर बरे होईल. गावाकडच्या मातीत तितकेसे काही चांगले चाललेले नाही. त्यामुळे इथे जर आला तर घरच्यांनाही काही मदत होईल. ‘
मुकुंदरावांचे हे बोलणे ऐकून मी अनिलकडे पाहिले. तेवीस-चोबीस वर्षांचा तो गावाकडचा मुलगा चेहऱ्यावरून अतिशय सुव्यवस्थित वाटत होता. शेलाटी अंगकाठी, पांढरा शर्ट, काळी पॅन्ट त्यातही इन केलेली. त्यामुळे पाहाताच त्याच्या बी. कॉम. पणाची जाणीव व्हावी असा तो मुलगा होता. आपण कुठे जातो आहोत, कशासाठी जातो आहोत हे कळले की मग आपले वर्तनही तसेच होते. ते मला अनिलकडे पाहून लगेच कळले. गावाकडच्या मुलाला जर ही जाण असेल तर तो गावाकडचा आहे म्हणून त्याच्याकडे नकारात्मक नजरेने पाहाणे योग्य नव्हते. त्याच्यातले गुण हेरून त्याला पुढे नेणे हीच गरज होती. मग मी अनिलला काही जुजबी प्रश्न विचारले. त्यानेही त्याची नेमकी उत्तरं दिली.
“बँकेत काम करावसं का वाटतं?” या माझ्या प्रश्नावर त्याने दिलेलं उत्तर फार चांगलं होतं. तो म्हणाला, “आमच्या गावात एकच बँक आहे. बँकेचे व्यवहार अनेक लोकांना माहीत नाहीत. त्यामुळे लोक फार मागे राहिले आहेत; असं मला वाटतं. मी जर बँकेत कामाला लागलो, तर त्यांना मी काही चांगल्या चार गोष्टी सांगू शकेल. त्यातून ती माणसं पुढे जातील असं मला वाटतं. मी जर हे नुसतंच त्यांना सांगितलं तर ते त्यांना पटणार नाही; पण मी बँकेत नोकरी करतो आहे आणि मग त्यांना बँकेविषयी सांगतो आहे असे झाले, तर यावर त्यांचा लवकर विश्वास बसेल.” या त्याच्या उत्तराने मला फारच आनंद वाटला. वागण्या बोलण्यातला त्याचा उत्साहीपणा खरं तर मला आवडला होता. त्याचा बायोडाटा घेत मी मुकुंदरावांना म्हणालो, “आमच्या दोन नवीन शाखा निघताहेत. येत्या पंधरा दिवसांत त्या सुरू होतील. तिथे आम्हाला माणसांची गरज आहे; मात्र आमच्या बँकेतील वरिष्ठ अधिकारी याचा रितसर इंटरव्ह्यू घेतील. मगच काय ते ठरेल.’
माझ्या या बोलण्याने आश्वस्त होत दोघेही बाहेर पडले. मीही त्यांना सोडायला बाहेर गेलो, तर तिथे टोपीवाले गृहस्थ बसले होते. मुकुंदरावांनी त्यांची ओळख करून दिली. ते त्यांचे मामा होते. त्यांच्या ग्रामीण आणि आर्जवी भाषेत त्यांनीही मुलाच्या नोकरीसाठी मला विनंती केली. ती ऐकून मी फक्त हात जोडून नमस्कार केला. अशी परिस्थितीने पिचलेली माणसं माझ्यासमोर आली की, का कोण जाणे मला आतून हलायला होते. तो संपूर्ण दिवसच मग माझा कोलमडून पडतो. ते गांजलेपण नकळतपणे माझ्या मनावर येऊन बसते.
त्यांना निरोप देत मी तो बायोडाटा संबंधित व्यक्तीकडे पाठवला. नियमाप्रमाणे काम होऊन अनिल बँकेत रूजू झाला. तीन-चार महिने त्या मुलाने अतिशय व्यवस्थित काम केले. नवीन शाखेतल्या नवीन कर्मचाऱ्यांवर मी विशेष लक्ष ठेवून असतो. आठवड्यातून तीनदा फोन करत त्यांची चौकशीही करतो. अनिलही याला अपवाद नव्हता; पण त्याचे रिपोर्ट मात्र माझ्यापर्यंत अतिशय चांगले आले. सहा-सात महिन्यांनंतर त्याच्याविषयीची लेखी तक्रार शाखाधिकाऱ्यांनी माझ्याकडे केली. तेव्हा त्याला बोलवून घेत योग्य ती समजही दिली. पुढचे दोन महिने पुन्हा सुरळीत काम चालले. दोन महिन्यांनी नवीन तक्रार. शाखाधिकाऱ्यांचे पुन्हा लेखी पत्र. अनिलला बोलवून घेत मी त्याच्यावर बऱ्यापैकी चिडलो आणि त्याला जाणीव करून दिली, की तू कुणाच्या शब्दाखातर इथे आला आहे. त्यानेही पुन्हा पुन्हा माफी मागितल्याव मी त्याला परत पाठवले. परत पाठवताना टोपीवाल्या मामांचा म्हणजेच मुकुंदरावांच्या मामांचा आर्जवी चेहरा माझ्या डोळ्यासमोरून हटत नव्हता. आमच्या काम करण्याच्या पद्धतीत खरे तर हे बसणारे नव्हते. एकाच माणसाने दोनदा चूक केली की, मी त्याला थेट घरी पाठवतो. अनिल मात्र याला अपवाद ठरला, तो केवळ त्याच्या वडिलांच्या त्या आर्जवी . यावेळेस एक मात्र मी केले, मुकुंदरावांना फोन करून त्यांच्या कानावर घडलेला सर्व प्रसंग टाकला. पहिल्या चुकीच्यावेळी मी असे काही केले नव्हते. आता मात्र पहिली आणि दुसरी अशा दोन्ही चुका मुकुंदरावांना ऐकवल्या. तेव्हा ते म्हणाले, “साहेब, तो गरीब आहे. सांभाळून घ्या.”
मुकुंदरावांचे हे शब्द मला अजिबात मानवणारे नव्हते; कारण तो बँकेत काम करत होता. तो जर माझा वैयक्तिक पी. ए. अथवा कुणी कामगार असता, तर दोनदा काय दहा वेळाही मी त्याची चूक खपवून घेतली असती, समजून सांगितले असते. बँकेत असे करून चालणार नव्हते; पण असो. बघूया काय होते ते, असे स्वतःशीच म्हणत मी स्वस्थ राहिलो.
साधारणतः पुढच्या चार महिन्यांत बँकेतल्याच एका कर्मचाऱ्यावर हात उगारल्या प्रकरणी शाखाधिकाऱ्यांची अनिलबद्दलची तक्रार आली. तेव्हा त्याला कामावरून काढून टाकत असल्याचे पत्र तयार ते थेट मी त्याच्या हातात ठेवले. त्याला बऱ्यापैकी सुनावले. आता त्याच्या लक्षात आले होते की, आपल्याला येथे पुन्हा कामावर येता येणार नाही. हे सगळे मी मुकुंदरावांनाही फोन करून सांगितले. तेव्हा त्यांच्या बोलण्यातही हतबलता होती. अनिल परमार हे प्रकरण माझ्या लेखी इथेच संपले. आठ दिवसांनी अनिलच्या परिवारातील दोन व्यक्ती मला भेटायला आल्याचे शिपायाने सांगितले. माझ्या हातातली कामे आटोपून त्यांना बोलावले. तर ते दुसरे-तिसरे कुणी नसून मुकुंदरावांचे मामा आणि अनिल होता. मामा हात जोडून म्हणाले, “साहेब, आमचा हा पोरगा तुमच्या बँकेत काम करायला नालायक निघाला. त्याच्यावतीने मी तुमची माफी मागतो; पण साहेब, एक गोष्ट विचारू का?”
“मामा, तुम्ही अजिबात माफी मागू नका. त्याला जर त्याचे कल्याण कळत नसेल, तर तुम्ही तरी काय करणार? याला नोकरीवर न ठेवण्याचा प्रश्न सोडून तुम्ही मला काहीही विचारा, असे माझे बोलणे चे ऐकताच मामा म्हणाले, “साहेब, याने वर्षभरपण नीट काम केले नाही. तेव्हा ते आमचे से पैसे मिळाले तर बरे होईल. आम्हाला तेवढीच मदत.” “मामा, कसले पैसे? याला काम केल्याबद्दलचा दर महिन्याचा पूर्ण पगार आम्ही दिला आहे आणि तो त्याच्या खात्यात असल्याने त्याची तुम्ही चौकशी करू शकता.”.
“तसं नाही. याला नोकरीला लावण्यासाठी म्हणून आमच्याकडून तुम्ही जे तीन लाख रुपये घेतले ते आम्हाला परत मिळाले तर बरेहोईल.”
धरणी दुभंगून मला पोटात घेईल तर बरे, अशी या एका वाक्याने माझी अवस्था झाली. विश्वास बँकेत नोकरी लागण्यासाठी गुणवत्तेशिवाय काही लागत नाही हे आता सर्वज्ञात झाले आहे, असे मला वाटत होते. ते चुकीचे आहे की काय, या प्रश्नाच्या भोवऱ्यात मी सापडलो. तरीही त्यांना म्हटलो, कुणाला दिलेत तुम्ही पैसे ? “आम्ही मुकुंदाला दिले आणि मुकुंदाने तुम्हाला.”
या वाक्याने सगळा चित्रपट माझ्या डोळ्यापुढे उभा राहिला. अनिलला बँकेत कामाला लावून देतो, या नावाखाली परस्पर मुकुंदरावांनी तीन लाख रुपये आपल्या सख्ख्या मामाकडून लाटले. हे माझ्या एव्हाना लक्षात आले होते. मामांनी गावाकडची जमीन विकून हे तीन लाख रुपये उभे केले आणि ते मुकुंदरावांना दिले. आता मला या सर्व प्रकरणाचा छडा लावणे गरजेचे होते. हा सूर्य आणि हा जयद्रथ करायलाच हवा होता. त्या दोघा-तिघांना आतल्या खोलीत बसवून मी मुकुंदरावांना फोन केला. ‘जरा महत्त्वाचे काम आहे. तातडीने बँकेत येऊ शकाल का?’ असे विचारले. तेव्हा ‘येतोच’ म्हणून उत्तर देत ते पंधरा-वीस मिनिटांत बँकेत पोहोचले. इकडचे तिकडचे बोलत अनिलच्या विषयावर मी त्यांना ओढून आणले. बँकेत नोकरी लावण्यासाठी माझ्याकडून पैसे घेतले होते, असे तो बाहेर सांगतो आहे. हे मी त्यांना सांगितल्यावर ते एकदम आवेशात ‘बघतोच मी त्याच्याकडे. फार हरामखोर मुलगा निघाला. उगीच मी तुमच्याकडे शब्द टाकला.’ वगैरे वगैरे ते बोलत राहिले. हा त्यांचा कांगावा सुरू असताना मी शिपायाला आत बसलेल्या मामांना बाहेर आणायला सांगितले. मामांना पाहाताच मुकुंदरावांना दरदरून घाम फुटला. तोंडातून शब्द फुटेना. त त फ फ होऊ लागली. मी त्यांना म्हणालो, “खरे काय ते सांगा. नाही तर आता इथे पोलिसांना बोलावतो.” ते खूप घाबरले. झालेली चूक कबूल केली. “पैसे परत देतो” म्हणाले. माझ्या डोळ्यासमोर पुन्हा एकदा मामांचा तो अगद. सुरुवातीचा आर्जवी चेहरा आणि आताचा नाडवला गेलेला चेहरा आला. मुकुंदरावांना मी म्हणालो, “पैसे घेऊन जेवढे दिवस झाले तेवढ्या दिवसांच्या बँकेच्या नियमाप्रमाणे व्याजासह मामांना पैसे परत करा. किती दिवसात परत द्याल, ते मला लिहून द्या. नाही तर आज तुमचे काही खरे नाही.”
माझा हा रुद्रावतार पाहून मुकुंदराव गर्भगळीत झालेच होते. ते आणखीनच अस्वस्थ झाले. शेवटी प्रश्न त्यांच्या इभ्रतीचा आण सरकारी नोकरीचा होता. ठरल्याप्रमाणे व्याजासह त्यांनी ते पैसे मामांना माझ्यासमोर परत केले. ते दोघेही गेल्यावर मला वाटले सख्खा मामा, सख्खा मामेभाऊ, सख्खा भाचा आणि मी तर मुकुंदरावांना माझा सख्खा मित्र मानत होतो; असे असूनही हा विचित्र प्रसंग घडला. किंबहुना मुकुंदरावांच्या लोभी वृत्तीने तो घडवून आणला. शेवटी काय तर इथेही नात्याचं सर्व्हिसिंग झालं नाही हेच खरं.
आता आणखी एक कथा … शीर्षक आहे
कृतघ्नतेचे काय करायचे ?
सहकारी संस्थेच्या देशपातळीवर काम करणाऱ्या एका शिखर संस्थेवर आपण ही इच्छा सहकाररत्न विनायकराव अनगळ यांच्या मनात मूळ धरून होती. त्यासाठी कराव्या लागणाऱ्या लटपटी-खटपटीत विनायकराव माहीर होते; पण तरीही या शिखर संस्थेवर जाण्यात काही गोष्टी कमी पडत होत्या आणि त्याची जमवाजमव करण्यात विनायकराव व्यग्र होते; कारण या संस्थेवर महाराष्ट्रातून एका अत्यंत मोठ्या बँकेचे एक वजनदार संचालक आधीच कार्यरत होते. त्या शिखर संस्थेचे वैशिष्ट्य म्हणजे भारतातल्या सर्व राज्यांतून सहकार क्षेत्रात काम करणारे प्रतिनिधी तिथे समाविष्ट असतात. एकवीस ही संख्या नक्की असल्यामुळे काही राज्य शेजारच्या राज्याशी हातमिळवणी करून दोन राज्य मिळून एक प्रतिनिधी असेही घडते. त्यामुळे प्रतिनिधीत्व मिळवण्यासाठी संख्या जास्त आणि जागा कमी अशी ही कसरत असते. ती कसरत विनायकरावांनी पूर्वीही एकदा करून पाहिली; पण त्यात त्यांना यश आले नाही. यावेळी त्यांचा मला फोन आला आणि त्यांनी मदत करण्याची विनंती केली. विनायकराव हा तसा दिलखुलास माणूस.
जे जे मिळवायचे म्हणून त्यांनी मनात घेतले ते सर्व त्यांनी अत्यंत गोड बोलून मिळवले; पण या संस्थेत जाण्यासाठी त्यांच्या धडपडीला यश येईना, हे जेव्हा माझ्या लक्षात आले तेव्हा विनायकरावांना आपण मदत करायला हवी या भावनेने मी कामाला लागलो. राज्य पातळीवर असलेले माझे संबंध त्यासाठी वापरायला मी सुरुवात केली. कुणाला शब्द टाकला की काय होईल, याचा अंदाज घेत कधी प्रत्यक्ष, कधी पत्राद्वारे, तर कधी फोनवर मी संपर्क साधत विनायकरावांसाठीचे एक पोषक वातावरण निर्माण केले. हे त्यांच्या लक्षात यायला वेळ लागला नाही. एके दिवशी फोनवर ते मला म्हणाले,
“विश्वास, तू माझ्यासाठी घेत असलेले कष्ट पाहून मला खरोखरच खूप आनंद झाला आहे. या शिखर संस्थेवर जाण्यासाठी माझे प्रयत्न तुला माहीतच आहे; पण त्याला यश आले नाही हे मात्र खरे. साताऱ्यासारख्या जिल्ह्यात राहून, सगळ्या नेत्यांशी उत्तम संबंध असून मला हे आजवर का जमले नाही ? हे मलाच न सुटलेले कोडे आहे. तू मात्र ही सगळीच परिस्थिती उलटवून टाकत जे वातावरण तयार केले आहेस त्यामुळे मी समाधानी झालो आहे. खरं तर तू माझ्यापेक्षा ज्युनिअर आहेस; पण कोणतेही प्रकरण टॅक्टफुली कसे हाताळावे याचा अनुभव माझ्यापेक्षा तुला दांडगा आहे. माझ्यासाठी तू लकी आहेस. त्यामुळे ज्युनिअर असलास तरी तुला सलाम. ”
त्यांच्या या दीर्घ संवादावर काय उत्तर द्यायचे ते दिले; पण विनायकराव शिखर संस्थेत जाणे म्हणजे एक प्रकारे मलाच ही संधी मिळते आहे हे मी सांगायला विसरलो नाही.
झाले, विनायकराव शिखर संस्थेत प्रतिनिधी म्हणून गेलेत. तेवढ्यानेही मी शांत बसलो नाही, तर त्या शिखर संस्थेच्या अंतर्गत निवडणुकांमध्ये विनायकराव केवळ संचालक म्हणून न राहाता वरिष्ठ पदाधिकारी कसे होतील, याकरिता मी माझे संपूर्ण लक्ष केंद्रीत केले. परिणामस्वरूप आमचे विनायकराव देशपातळीवरच्या सहकारातील चे सर्वोच्च संस्थेत वरिष्ठ पदाधिकारी झालेत. त्यावेळी मी त्यांच्याबरोबर होतो. त्यांनी मला कडकडून मिठी मारली. डोळे डबडबले होते त्यांचे. एखाद्याचे ध्येय साध्य झाले, की काय आनंद होतो हे मी त्यावेळी अनुभवत होतो. तेव्हापासूनच ते मला त्यांचा लहान भाऊ म्हणू लागले.
सातारा किंवा परिसरात कुठे जाणे झाले, तर एक मुक्काम आणि दोन जेवणं झाल्याशिवाय विनायकरावांनी मला कधीही परतू दिले नाही. पुढे कालांतराने विनायकरावांची टर्म संपली. त्याच काळात केंद्रशासनाचा प्रतिनिधी म्हणून माझादेखील त्या शिखर संस्थेत नामनिर्देशित प्रतिनिधी म्हणून शिरकाव झाला. आम्ही बरोबरीने काही काळ कामही केले. पुढे केंद्रातील सरकार बदलल्याने माझी नियुक्ती रद्द झाली. काळ सरकत गेला. पाच वर्षे एव्हाना कशी निघून गेलीत हेच समजले नाही. दरम्यानच्या काळात त्या संस्थेची निवडणूक जाहीर झाली. राज्यातून दोन प्रतिनिधी निश्चितपणे या संस्थेवर जाणार होते. त्यातील एक स्वतः विनायकराव होते. मागील निवडणुकीत जे दुसरे संचालक होते ते नाशिकचेच होते. मात्र, दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाल्यामुळे त्या जागेवर मी उमेदवारी करावी, अशी इच्छा नाशिक जिल्ह्यातून सर्वच नागरी बँकेच्या चेअरमन यांनी केलेली होती. म्हणून मी दुसऱ्या जागेवर इच्छुक उमेदवार होतो. तसेच माझ्याबरोबर महाराष्ट्रातील विविध बँकांचे आठ प्रतिनिधी त्या पॅनलमधून इच्छुक होते.
अशा ठिकाणी काम करताना जी काही एक विशिष्ट प्रकारची मोर्चेबांधणी करावी लागते ती करण्याचा अनुभव मला नाशिकच्या आधीच्या संचालकांमुळे व विद्यमान विनायकरावांच्या संचालक पदाच्यावेळी मिळाला असल्यामुळे मीही निश्चिंत होतो.
या राष्ट्रीय सहकारी संस्थेचा संपूर्ण कंट्रोल आपल्या शेजारील राज्याच्या एका राजकीय नेत्याच्या हातात होता. तो नेता आपल्या राज्यातील अत्यंत वरिष्ठ नेत्याला मानणारा होता. त्यामुळे आपल्या राज्यातील या आदरणीय नेत्याने माझ्या नावाची शिफारस त्यांना केली होती. ती त्यांनी मान्य सुद्धा केली होती. त्यामुळे मी निर्धास्त होतो; मात्र ज्या वेळेस पॅनल निर्मिती झाली त्यावेळेस माझे नाव यादीत नव्हते. याचा मला प्रचंड धक्का बसला. मागील निवडणुकीमध्ये विनायकरावांना उमेदवारी मिळवून देण्यासाठी भरपूर प्रयत्न केलेले होते. त्यामुळेच त्यांना उमेदवारी मिळालेली होती. या निवडणुकीमध्ये त्यांच्याबरोबर दुसरा उमेदवार निवडण्याचे सर्व अधिकार त्यांच्याकडे असतांना आणि वरिष्ठ नेत्याकडून माझी शिफारस झाली असतांनासुद्धा मला उमेदवारी मिळाली नाही. याचे मला दुःख वाटले. तरीही मी शांत होतो. निवडणूक शांततेत पार पडली, त्या दुसऱ्या राज्यातील राजकीय नेत्याचे संपूर्ण पॅनल भरघोस मताने निवडून आले. सर्वजणांनी आनंदातच दिल्ली सोडली.
मला उमेदवारी न मिळण्यामागील नेमके कारण न समजल्यामुळे मी प्रचंड अस्वस्थ झालेलो होतो. नेमके काय घडले असावे? आणि का घडले असावे? मला नेमका कोणाचा विरोध असावा? आणि तो का असावा? हे माझे न सुटलेले प्रश्न होते. त्यामागील कारणही असे होते की, महाराष्ट्रामधील सहकारी बँकिंग क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला माझ्या कामाची पद्धत माहिती आहे आणि मी कायमच सकारात्मक काम करत असल्यामुळे त्यांना माझ्याबद्दल एक आपुलकीसुद्धा आहे. तरीही हे कसे घडले? काही दिवसानंतर एका कॉन्फरन्समध्ये विनायकरावांची निवांत भेट झाली. त्यांच्याही चेहऱ्यावर दुःख होते. मी त्यांना स्पष्टपणे विचारले,
“तुमच्या हातात निर्णय असतांना असे कसे झाले ?” त्यावेळेस ते मला असे म्हणाले, “अरे बाबा, दिल्लीचे राजकारण फार वेगळे असते शेवटच्या टप्प्यात तर मलाही त्या पॅनलमध्ये उमेदवारी मिळेल की नाही, अशी शंका वाटत होती; कारण तुला माहीतच आहे की, आपली संस्था आपल्या शेजारील राज्यातील या नेत्याच्या नेतृत्त्वाखालीच चालते. ते जो निर्णय घेता तो मान्यच करावा लागतो. तुझ्या जागेवर ज्यांचे नाव आम्ही फायनल केले त्यांची शिफारसही त्यानीच केलेली होती. त्यामुळे माझा नाईलाज होता. ”
दरम्यानच्या काळामध्ये माझ्याऐवजी ज्यांचे नाव पॅनलमध्ये आले होते, त्यांची माझी एका कार्यक्रमामध्ये अचानकपणे भेट झाली. त्यावेळेस झालेल्या चर्चेमध्ये त्यांनी मला असे सांगितले की, खरंतर माझ्या मनामध्ये या संस्थेवर संचालक म्हणून जाण्याचे नव्हतेच; कारण आमच्या बँकेचा विस्तार आणि आणखी काही संस्थेवर मी जना पदाधिकारी असल्यामुळे मला या संस्थेसाठी वेळ देणे शक्य नव्हते; मात्र विनायकरावांनी खूपच आग्रह धरल्यामुळे माझा नाईलाज झाला. खरंतर ही उमेदवारी माझ्याऐवजी जर तुम्हाला मिळाली असती, तर मला अधिक आनंद झाला असता; किंबहुना तुम्ही उमेदवारीसाठी इच्छुक असताना माझा विचार केला नाही तरी चालेल, हे मी स्पष्टपणे विनायकरावांना बोललो होतो. पाहिजे तर तुम्ही समोरासमोर त्याची खात्री करू शकता. हा माझ्यासाठी धक्का नव्हे तर भूकंपच होता. हे असे झालेच कसे? आणि विनायकरावांनी माझ्या बाबतीत असे का केले असेल? हा माझ्यासाठी अनुत्तरीत प्रश्नच होता. दरम्यानच्या काळात त्या शिखर संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) दिल्लीला होती. मी एजीएमला दिल्लीला आवर्जून जात असे; त्यानिमित्ताने भारतातील वेगवेगळ्या राज्यातील सहकारी संस्थांच्या संचालकांच्या भेटीगाठी होतात. दिल्लीतही दोन-तीन दिवस राहिले की, तेथील वेगवेगळ्या क्षेत्रांतील मित्रांना भेटता येते. हा निव्वळ जनसंपर्काचा भाग होता. बँकिंग क्षेत्रात काम करताना संपर्काचे जाळे हे फारच मोठे असावे लागते, हे मी अनुभवाने शिकलो; कारण कोणत्या वेळी, कुणाशी काय काम पडेल हे सांगता येत नाही. दिल्लीमध्ये होणारी ही एजीएम हादेखील देशभर काम करणाऱ्यांचा एक मोठा गोतावळा असतो. प्रत्येकाचे प्रत्येकाकडे पाहाण्याचे स्वतंत्र दृष्टिकोन असतात. त्यामुळे होते काय तर आपलाही आवाका मोठा होतो. भविष्याकडे पाहाण्याची दृष्टी बदलते. बँकेला दिशा देण्यासाठी नेमके काय करायला हवे याचा अंदाज येतो आणि ज्या शिखर संस्थेची ही एजीएम असते तिथे तर मोठे काम करणाऱ्या व्यक्तींची मोजदाद करणे अवघड होईल एवढी उपस्थिती असते. या एजीएमचे वेगळेपण म्हणजे एजीएम संपल्यानंतर तिथे सर्वांसाठी भोजनाची व्यवस्था केलेली असते. नुकत्याच संपलेल्या निवडणुकीतील वाईट अनुभव असल्यामुळे तिथे गेल्यावर निवडणुकीच्या कटू आठवणी जागृत झाल्या. साहजिकच त्यामुळे माझा मूड फारसा चांगला नव्हता म्हणून मी आणि माझा सहकारातील एक मित्र कोपऱ्यात बोलत बसलो होतो. त्यावेळेस त्या पॅनलचा तो नेता तिथून जात होता. मी त्याच्याकडे पाहून न पाहिल्यासारखे केले हे त्या नेत्याने बरोबर हेरले; मात्र तिथे काहीही न बोलता तो नेता तिथून जेवणाच्या ठिकाणी निघून गेला. पाचच मिनिटांत त्यांचा पी.ए. धावत माझ्याजवळ आला आणि “साहेबांनी आपल्याला जेवायला बोलाविले आहे”, असा निरोप दिला आणि तिथेच थांबला. या एका मोठ्या स्तरावर काम करणाऱ्या व्यक्तींची खासियत वेगळीच असते. त्यांना पाहिजे त्या वेळी ते बरोबर सिं बोलतात, माग काढतात, अंदाज घेतात. ही एक व्यक्तिमत्त्वातली विनायकरावांना बोललो होतो. पाहिजे तर तुम्ही समोरासमोर त्याची खात्री करू शकता. हा माझ्यासाठी धक्का नव्हे तर भूकंपच होता. हे असे झालेच कसे? आणि विनायकरावांनी माझ्या बाबतीत असे का केले असेल? हा माझ्यासाठी अनुत्तरीत प्रश्नच होता. दरम्यानच्या काळात त्या शिखर संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) दिल्लीला होती. मी एजीएमला दिल्लीला आवर्जून जात असे; त्यानिमित्ताने भारतातील वेगवेगळ्या राज्यातील सहकारी संस्थांच्या संचालकांच्या भेटीगाठी होतात. दिल्लीतही दोन-तीन दिवस राहिले की, तेथील वेगवेगळ्या क्षेत्रांतील मित्रांना भेटता येते. हा निव्वळ जनसंपर्काचा भाग होता. बँकिंग क्षेत्रात काम करताना संपर्काचे जाळे हे फारच मोठे असावे लागते, हे मी अनुभवाने शिकलो; कारण कोणत्या वेळी, कुणाशी काय काम पडेल हे सांगता येत नाही. दिल्लीमध्ये होणारी ही एजीएम हादेखील देशभर काम करणाऱ्यांचा एक मोठा गोतावळा असतो. प्रत्येकाचे प्रत्येकाकडे पाहाण्याचे स्वतंत्र दृष्टिकोन असतात. त्यामुळे होते काय तर आपलाही आवाका मोठा होतो. भविष्याकडे पाहाण्याची दृष्टी बदलते. बँकेला दिशा देण्यासाठी नेमके काय करायला हवे याचा अंदाज येतो आणि ज्या शिखर संस्थेची ही एजीएम असते तिथे तर मोठे काम करणाऱ्या व्यक्तींची मोजदाद करणे अवघड होईल एवढी उपस्थिती असते. या एजीएमचे वेगळेपण म्हणजे एजीएम संपल्यानंतर तिथे सर्वांसाठी भोजनाची व्यवस्था केलेली असते. नुकत्याच संपलेल्या निवडणुकीतील वाईट अनुभव असल्यामुळे तिथे गेल्यावर निवडणुकीच्या कटू आठवणी जागृत झाल्या. साहजिकच त्यामुळे माझा मूड फारसा चांगला नव्हता म्हणून मी आणि माझा सहकारातील एक मित्र कोपऱ्यात बोलत बसलो होतो. त्यावेळेस त्या पॅनलचा तो नेता तिथून जात होता. मी त्याच्याकडे पाहून न पाहिल्यासारखे केले हे त्या नेत्याने बरोबर हेरले; मात्र तिथे काहीही न बोलता तो नेता तिथून जेवणाच्या ठिकाणी निघून गेला. पाचच मिनिटांत त्यांचा पी.ए. धावत माझ्याजवळ आला आणि “साहेबांनी आपल्याला जेवायला बोलाविले आहे”, असा निरोप दिला आणि तिथेच थांबला. या एका मोठ्या स्तरावर काम करणाऱ्या व्यक्तींची खासियत वेगळीच असते. त्यांना पाहिजे त्या वेळी ते बरोबर सिं बोलतात, माग काढतात, अंदाज घेतात. ही एक व्यक्तिमत्त्वातली वेगळी रेघ कशी वाढत जाते हे खरंच शिकण्यासारखे आहे. कुठे, कसे, किती बोलावे, नजरेच्या इशाऱ्यांवर काम कसे करवून घ्यावे, काम झाल्यावर दाद कशी द्यावी आणि हे सारे करताना डाव्या हाताचे उजव्या हाताला कळू नये याची काळजी कशी घ्यायची हा एक स्वतंत्र भाग आहे. देशपातळीवर काम करणाऱ्या नेत्यांमध्ये हे वेगळेपण मी पाहात आलो. अनेकदा ते जवळून अनुभवण्याचा प्रसंग माझ्यावर आला. मात्र तिथेही मी शिकतच राहिलो. आताही झाल्या प्रकरणाचा विचार डोक्यात सारखा घोळत असल्याने खरं तर माझी त्या नेत्याला भेटण्याची अजिबात इच्छा नव्हती; पण त्यांचा पी.ए. तिथेच थांबल्याने व जेवायचेच निमंत्रण दिल्यामुळे माझा नाईलाज झाला आणि मी माझा मित्र आणि तो बोलतच पुढे निघालो. मागील दहा वर्षांत कोणत्या न
कोणत्या निमित्ताने त्या संस्थेच्या कामात हा पी.ए. मला पाहात होता.. त्यामुळे तो चालता चालता मला म्हणाला, “सर, एक विचारू का?”
मीही म्हटले, “विचार बाबा”
तो म्हणाला, “सर या पॅनलमध्ये तुमचे नाव यायला पाहिजे होते. आमच्या साहेबांनीसुद्धा विनायकरावांना तुमच्या नावाची शिफारस केलेली होती; पण काय राजकारण झाले, हे मला माहीत नाही.”
मी म्हटले, “तुला कसे समजले ?”
मग त्याने मला सांगितले की, “जेव्हा तुमच्या साहेबांचा आमच्या साहेबांना फोन आला, त्यावेळेला गाडीमध्ये मीच होतो आणि बऱ्याच वेळेला साहेबांचा मोबाईलही माझ्याचकडे असतो. तुमच्या साहेबांचा फोन आल्यानंतर आमच्या साहेबांनी मला ताबडतोब विनायकरावांना फोन जोडून द्यायला सांगितले. त्यानुसार मी ताबडतोब फोन जोडून दिला. आमच्या साहेबांनी स्पष्टपणे विनायकरावांना महाराष्ट्राच्या पॅनलमधून विश्वासला घ्या, असे सांगितले.”
हे ऐकून मला धक्काच बसला; मात्र हे बोलणे संपेपर्यंत आम्ही तिघेही त्या नेत्याजवळ पोहोचलो होतो. ते तिथे काही सहकारातील बँकेच्या प्रतिनिधींशी बोलत होते. मला पाहून त्यांनी पाच मिनिटे से थांबायला सांगितले. मी ही नाराजीने काहीही प्रतिसाद न देता तिथे थंडपणे उभा राहिलो. पाचच मिनिटांत त्यांनी त्यांचे बोलणे आटोपते घेतले आणि माझ्याजवळ येऊन खांद्यावर हात ठेवून मला जेवायला बरोबर घेऊन गेले आणि जाताना “तू इ विचारले. ‘ का झालास, असे
मी त्यांना म्हणालो, “तुमचे इतक्या वरिष्ठ पातळीवर बोलणे होऊनही आणि तुम्ही संमती देऊनही असे का झाले?”
हे आमचे बोलणे सुरू असताना माझ्या सुदैवाने आणि विनायकरावांच्या दर्दैवाने ते तिथे पोहोचले. त्यांना पाहून या नेत्याने तातडीने माझ्यासमोरच विनायकरावांना विचारले, “मी तुम्हाला विश्वासच्या नावाची शिफारस केली होती का नव्हती आणि विश्वाससाठी कोणाचा फोन आला होता, हे सांगितले होते का नव्हते ?”
असा प्रश्न विचारल्यावर विनायकराव कमालीचे गोंधळले आणि खजीलही झाले; पण एकदम अंगावर आलेला हा प्रसंग परतवावा कसा हे विनायकरावांना कळलेच नाही. त्यांची ततफफ झाली. त्या परराज्यातील नेत्याने माझ्यासाठी ‘दूध का दूध, पाणी का पाणी केले’ खरंतर तो नेता मला जवळचा नव्हता. विनायकराव जवळचे होते. तो नेता मला फक्त चांगले काम करणारा म्हणून ओळखत होता; पण विनायकराव तर लहानभाऊ मानत होते; तरीही त्यांनी असे केले. मी काय समजायचे ते समजलो. या संपूर्ण कारस्थानामध्ये म्हणजे अगदी पॅनलमधून माझे नावच गायब होण्यामागे विनायकराव असल्याचे समजल्यानंतर पुढचे बरेच दिवस मी अस्वस्थ होतो. सामान्यपणे काम करताना आपण खूप स्वप्न पाहातो, अपेक्षा ठेवून जगतो. माणसांबद्दलचं आपलं म्हणणं अगदी खरं आहे यावर विसंबून राहिल्याने दुःख होते. तसेच दुःख मलाही झाले. अपेक्षाभंगाचे दुःख मोठे असते असे म्हणतात ते याठिकाणी मीही अनुभवले. विनायकराव असे विचित्र वागतील हे मला स्वप्नातही कधी वाटले नव्हते. त्यांच्या आणि माझ्या जवळकीचा विचार करता तर असे कधी घडलेच नसते; पण सत्ता कसा वेगळा परिणाम घडवू शकते याची जाणीव विनायकरावांनी त्यांच्या वागण्यातून मला करवून दिली. या घटनेतून मी एकच शिकलो की मोठे व्हायच्या नादात माणसं लहान कधी होत जातात हे त्यांचे त्यांनाही कळत नाही. कोणाला मदत करणे हा जर गुन्हा असेल, तर तो मी पुन्हा पुन्हा करीत आलो आहे. कदाचित यापुढे आयुष्यभर करीत राहील की नाही, हे मला सांगता येणार नाही; पण अशा ठेचकाळण्यामुळे मी समृद्ध होत जातो. हे आता मला पुरते पटले आहे. विनायकराव तेव्हापासून माझ्या मनातून उतरले. कारणाकारणाने भेटी होत राहिल्या. मी कधीही त्यांचा अनादर केला नाही. त्यांच्याबद्दल माझ्या मनात कटुता आहे हेही कधी ओठावर आणले नाही. एक मात्र घडले साताऱ्यात मी पुन्हा त्यांच्यासाठी कधीही गेलो नाही. या सगळ्या प्रसंगानंतर त्यांचेही मन त्यांना खात असावे. पूर्वीसारखा ‘ये हृदयीचे ते हृदयी’ हा भाव त्यांच्याकडूनही राहिला नाही.
आता वाटते असा मदतीचा भाव ठेऊनही लोक जर कृतघ्नपणेच वागत असतील तर नात्यांचे सर्व्हिसिंग कुठून आणि कसे करायचे ?
Comments
Post a Comment