आज Cyber Wellness गरजेचे
बर्याच सायबर गुन्ह्यांमध्ये ही एक मोठी अडचण असते की आपण बळी पडत असतो किंवा पडणार असतो पण तेंव्हा हे कोणाशीही शेअर करताना आपल्याला संकोच वाटत असतो. अगदी जवळच्या माणसाला सांगणं पण नको वाटू शकतं, रिपोर्ट करणं embarrassing वाटू शकतं किंवा नेमकं काय करायला पाहिजे, ते नीट लक्षात येत नाही. मग अशा वेळी काय करायचं?
CYBER WELLNESS HELPLINE 7353107353 वर कॉल लावायचा किंवा ह्याच WhatsApp नंबर वर मेसेज करायचा, अगदी बिनदिक्कतपणे! ही मोफत सायबर वेलनेस हेल्पलाईन पूर्ण भारतभर, सोमवार ते शनिवार सकाळी ९ ते संध्याकाळी ६ पर्यन्त उपलब्ध असेल.
सायबर सुरक्षा क्षेत्रात गेल्या दहा वर्षांपासून कार्यरत असलेल्या आणि आत्तापर्यंत लाखो मुलांना व महिलांना सायबर सुरक्षा विषयाचे पद्धतशीर प्रशिक्षण देणाऱ्या Responsible Netism ह्या संस्थेनी ही हेल्पलाईन सुरू केली आहे.
इथे फोन केल्यावर आपल्याला कोणीही जज करणार नाही. परिस्थिती हाताळण्यासाठी काय करायला पाहिजे ते सांगून योग्य ती मदत करणार आहेत. जर काउन्सिलिंगची गरज असेल तर तशी व्यवस्था करणार आहेत.
ह्या क्षेत्रातील तज्ज्ञ, कायदा जाणणारी, मानसशास्त्राचा अभ्यास असणारी आणि आपल्याला योग्य मार्ग दाखवून, संरक्षण मिळवून देण्याचा पूर्ण प्रयत्न करणारी Cyber Wellness Experts ह्यामागे आहेत. आपण १०० % विश्वास ठेवू शकतो.
Online आर्थिक फसवणूक, सोशल मीडिया वर होणार छळ (Harassment) किंवा Online गेम्सचा अतिरेकी वापर, Fake Profile बनवणे, Photo मॉर्फिंग, हॅकींग, ऑनलाईन पाठलाग (Stalking), खास करून मुलांबरोबर होणाऱ्या सायबर बुलींग (Bullying) यासारखे ऑनलाईन गुन्हे, सायबर विकार आणि त्यातून उद्भवणाऱ्या वर्तणूक विषयक तसेच मानसिक समस्या अशा सर्व प्रकारांसाठी आपल्याला Cyber Wellness Experts कडून मदत मिळणार आहे.
जास्तीत जास्त लोकांपर्यंत CYBER WELLNESS HELPLINE - 7353107353 पोहोचवूया.
Comments
Post a Comment