Posts

Showing posts from September, 2024

कशासाठी ...रेडिओसाठी !

सध्या तरुण पिढी मोबाईल आणि स्क्रीनच्या मागे लागली आहे, ते त्यात खूप वेळ घालवतात असे आरोप नेहमी होतात. त्यात बऱ्याच प्रमाणात तथ्यही आहे. त्याचे विपरीत परिणाम मानसिक आणि शारीरिक असे दोन्ही होतात. कोरोंनाने सर्व वयोगटातील शाळकरी मुलामुलीना  हातात लवकर मोबाईल दिला असला तरी कोरोना संपल्यावर तो दूर झाला नाही. मुलांना कोणत्याही ताज्या घडामोडींची माहिती नसते असे म्हणता येणार नाही. त्यांचा माहितीचा 'सोर्स' हा वर्तमानपत्रांपेक्षा ऑनलाईन आहे हेही खरे आहे. परंतु मोबाईल, टीव्ही चॅनेल्स, यु ट्यूब यापेक्षा आपल्या सर्वांचा बातम्यांचा / माहितीचा जो मूळ सोर्स होता तो रेडिओ या मुलांपासून लांब गेला आहे. अर्थात याचा दोष त्यांना देता येणार नाही. घरचे ज्येष्ठ रेडिओ न ऐकता मोबाईलमध्ये डोळे खुपसून बसणार असतील तर मुलांना सवय तरी कशी लागणार ? आधीपेक्षा कमी, पण आजही अनेक घरांमध्ये रेडिओ ऐकला जातो आणि त्यावर अनेक दर्जेदार कार्यक्रम इथे सादर होत असतात. तुम्ही कितीही ऑनलाईन असाल तरी घरी रेडिओ हवाच यात वाद नाही. काल 'द हिंदू' या नावाजलेल्या दैनिकात रेडिओसंदर्भात एक बातमी वाचली आणि रेडिओच्या आठवणी जाग्...

अमेरिकेत बोलबाला Influencers चा !

  अमेरिकेत सध्या अध्यक्षीय निवडणुकीची धामधूम सुरू आहे. डेमोक्रॅटिक पक्षाकडून आपण परत एकदा निवडणूक लढवावी अशी विद्यमान अध्यक्ष जो बायडेन यांची कितीही इच्छा असली तरी ते शक्य झाले नाही. त्याची कारणे सर्वश्रुत आहेत. त्यांच्या जागेवर उपाध्यक्ष कमला हॅरिस यांची निवड उमेदवार म्हणून झाली आणि डेमोक्रॅटिक पक्षाच्या मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. माजी अध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प  यांनी या निवडणुकीत आधी आघाडी घेतली होती, पण आता सध्या तरी अल्पमताने का असेना कमला हॅरिस आघाडीवर आहेत. अजूनही नोव्हेंबरमध्ये नक्की कोण निवडून येतील हे सांगणे कठीण आहे. कमला हॅरिस यांच्या उमेदवारीवर शिकागो येथे गेले चार दिवस सुरू असलेल्या अधिवेशनात शिक्कामोर्तब झाले. हॅरिस यांच्या समर्थनार्थ स्वतः जो बायडेन, बराक व मिशेल ओबामा, हिलरी क्लिंटन यांच्यासह अनेक दिग्गज नेते या अधिवेशनात येऊन गेले. अमेरिकेत राहणारे पण मतदानाचा अधिकार नसलेले लोकही ही भाषणे ऐकत आहेत. कारण ही निवडणूक कदाचित त्यांचेही भविष्य ठरवणार आहे.    हॅरिस आणि त्यांची टीम डेमोक्रॅटिक पक्षाचे जुने मतदार...

एका सच्च्या कार्यकर्त्याची शंभरी

Image
बबन डिसोजा, रतन डिसोजा, मधू दंडवते, प्रमिला दंडवते   वयाच्या १८व्या वर्षी 'भारत छोडो' आंदोलनात सक्रिय सहभाग, राष्ट्र सेवा दलात भरीव काम, मिल मजदूर सभेच्या स्थापनेपासून नंतर अनेक वर्षे सक्रिय सहभाग, प्रजा समाजवादी पक्षाचे पूर्ण वेळ चिटणीस, गोवा विमोचन समितीचे व संयुक्त महाराष्ट्र समितीच्या मुंबई शाखेचे कार्यालयीन सचिव, बॅ. नाथ पै,  मधू दंडवते यांच्या निवडणुकांमध्ये मोठे काम, साने गुरुजींच्या  नेतृत्वाखाली  काम , १९७५मध्ये आणीबाणीच्या विरोधात काम, नंतर मुंबई जनता दलात अनेक वर्षे काम, १९८० साली मालवणमध्ये बॅ. नाथ पै सेवांगणाच्या उभारणीत सिंहाचा वाटा, आणि हे सारे काम करताना अत्यंत निर्मल आणि नि:स्वार्थी स्वभाव, सगळ्यांना बरोबर घेऊन काम करण्याची हातोटी ... हे सारे करणाऱ्या श्री. बबन डिसोजा यांचा आज शंभरावा वाढदिवस आहे. माझे वडील, राजकीय कार्यकर्ते, कामगार नेते, सामाजिक कार्यकर्ते अशा विविध भूमिकांमध्ये त्यांना मी पाहात आलेले आहे. आणि या सगळ्याबद्दल मला विलक्षण अभिमान आहे. बबन डिसोजा आणि राणी पाटील बबन डिसोजा यांचा जन्म ३ सप्टेंबर १९२४ रोजी गणेश चतुर्थीला, माल...