Posts

Showing posts from January, 2024

RNEP ही NEP इतकीच महत्वाची !

Image
Responsible Netism 1st National Cyber Psychology Conference 2017 Theme:  Living Life 2.0: Coming together to Interface our Online and Offline Lives. Date:  January 20-21, 2017 | Mumbai 2nd Conference 2018 – Theme:  Building Cyber Hygiene Culture. Date: January 18-19, 2018 | Mumbai 3rd  Conference 2019 – Theme: Child Online Protection Date: January 8, 2019 – Run-up event at Kolhapur, January 18, 2019 – Run-up event at Aurangabad, January 23, 2019 – Main event at Mumbai 4th Conference 2020 – Theme:  Child Online Protection.   Date:  January 23-24, 2020 | Pune 5th Conference 2021 – Theme:  Coping With Technology, New Education Policy And New Normal Date:  January 23, 2021 | 6th Conference 2022 – Theme:  India Fights Cyber Violence against Women and Children Date:  January 22, 2022 | 6th Conference 2023 – Theme:  Cyber Wellness: Ensuring Mental Well-being in Cyberspace Date:  Saturday, January 21, 2023 | 8th Conference 2024 –...

युपीआय क्रांती कुठपर्यंत?

गे ल्याच महिन्यातील गोष्ट. एका कामानिमित्त एका सहकारी बँकेत गेलो होतो. बँकेची ही शाखा तळमजल्यावरचीच होती आणि ज्येष्ठ नागरिकांनाही बँकेत व्यवहार करताना काही अडचण येणार नाही, याची काळजी घेणारी होती. एक साधारण ७५-८० वर्षे वयोगटातील आजी शाखेत आल्या आणि कशा कोणास ठाऊक पायरीला अडकून एकदम पडल्या. उपस्थित सगळा कर्मचारी वर्ग त्यांच्या मदतीला धावला. त्यांना खुर्चीवर बसवले. सुदैवाने कुठेच काहीच गंभीर दुखापत नव्हती. आजींसह सगळ्यांनीच सुटकेचा निःश्वास सोडला. मदतीसाठी नेहमीच तत्पर असणाऱ्या त्या बँकेच्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना विचारले, ‘अहो आजी, स्वतः कशाला आलात, आम्हाला फोन करायचा, कोणाला तरी घरी पाठवले असते’. आजींचे उत्तर असे होते, ”अगं हो, पण मलाच राहवेना म्हणून आले. मला माझ्या फोनमध्ये गूगल पे की काय म्हणतात ते टाकून हवे आहे, ते कसे वापरायचे तेही सांग. माझी मुले / नाती सांगतात की आता जास्त रोख पैसे जवळ ठेवू नकोस. त्यापेक्षा मोबाईलवरून पैसे देत जा. मला हे तातडीने हवे होते, म्हणून स्वतः बँकेत आले.’ बँकेतील लोकांना लगेच काय प्रतिक्रिया द्यावी ते कळले नाही, पण त्यांनी आजी...

निर्वासितांच्या प्रश्नाचे भयाण वास्तव

  बातमी -१ आर्मेनियातील दोन तृतीयांश निर्वासित मुले आता शाळेत शिकत आहेत. उरलेल्या एक तृतीयांश मुलांचाही सहभाग त्यात असेल या दृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहेत. तशी सूचनाच ‘युनिसेएफ’ने केली आहे. आर्मेनियात निर्वासित म्हणून आलेल्या या मुलांना सलग शिक्षण मिळालेले नाही. अनेक वेळ त्यात खंड पडला आहे. त्यांना नीट शिक्षण मिळावे आणि निदान ते शिक्षणाच्या बाहेर फेकले जाऊ नयेत यासाठी सध्याची यंत्रणा काम करत आहे. ‘शाळा ही केवळ शिक्षणाची ठिकाणे नाहीत. निर्वासित मुलांसाठी ती सर्वात महत्वाची जागा आहे. त्यांच्या कठीण परिस्थितीतून बाहेर येऊन नव्याने आयुष्य उभारण्यासाठीचे महत्वाचे ठिकाण आहे. या शाळा त्यांना शिक्षण देतात, अन्न देतात, त्यांच्या मानसिक स्थितीवर मार्गदर्शन करतात, अन्य समाजाशी मिळूनमिसळून राहतील हे पाहतात आणि याशिवाय लागेल ती मदत करतात, असे ” युनिसेफ आर्मेनियाच्या प्रतिनिधी क्रिस्टीन वीगँड आवर्जून सांगतात. . बातमी -२ जर्मनीत निर्वासितांच्या संख्येत खूप मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. ज्यांचा निर्वासित म्हणून येण्यासाठीचा अर्ज फेटाळला गेला आहे, त्यांना परत त्यांच्या मूळ देशात प...