Posts

Showing posts from July, 2024

प्रकल्पांची खर्चवाढ टाळता येईल का ?

Image
मुंबईतील वांद्रे वर्सोवा सी लिंक प्रकल्पाचा खर्च ६७८८ कोटी रुपयांनी वाढला आणि प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आणखी ५०८ दिवसांची मुदतवाढ मिळाली ही सौरभ कुलश्रेष्ठ यांनी 'हिंदुस्थान टाइम्स'मध्ये दिलेली बातमी वाचून खेद वाटला असला तरी अजिबात आश्चर्य वाटले नाही. हा खर्च आता ११,३३२ कोटींवरून १८,१२० कोटींवर गेला आहे. वांद्रे वर्सोवा सी लिंक रस्ता हा मरीन लाईन्स ते कांदिवली अशा रस्त्याचा एक भाग आहे. मुंबईतील वाहतूक सुरळीत करण्याच्या प्रयत्नातील एक भाग म्हणून याकडे पाहता येईल.  वांद्रे वरळी सी लिंक २००९मध्ये पूर्ण झाल्यावर तेव्हाच्या काँग्रेस - राष्ट्रवादी सरकारने वरळी ते नरिमन पॉईंट आणि वांद्रे वर्सोवा असे दोन मार्ग उभारण्याचे ठरवले, परंतु दोन्ही पक्षातील मतभेदांमुळे पुढे काहीच झाले नाही. २०११ मध्ये वांद्रे वर्सोवा मार्ग मंजूर करण्यात आला. पण प्रत्यक्षात काम सुरु झाले नव्हते. २०१७मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने हा प्रकल्प मार्गी लावण्याचे ठरवले आणि एमएसआरडीसीला ७५०८ कोटींचा हा प्रकल्प पूर्ण करण्यास सांगितले. वर्षभरातच खर्चाचा आकडा वाढून ११,३३२ कोटींवर गेला. तोच आता सात वर्षांनी वाढून १...

... ...आणि अमेरिका जागी झाली !

Image
अमेरिकेत सध्या काही भागात तापमान कमालीचे वाढत आहे. अनेक ठिकाणी वणवे पेटले आहेत. त्यावर कसे नियंत्रण ठेवायचे हे कळत नाहीये. अनेकांची घरे त्यात उध्वस्त झाली, वनजमीन तर पार जाळून खाक झाली.  कॅलिफोर्निया पार्क भागात  सध्या साडेतीन लाख एकरमध्ये हा वणवा पसरलेला आहे. अतिउष्णतेमुळे अमेरिकेत असे वणवे पेटणे ही आता बातमी राहिलेली नाही. बदलत्या हवामानामुळे होणारे हे दुष्परिणाम याच नव्हे तर अन्य देशांनाही कुठे घेऊन जाणार आहेत हा अत्यंत काळजीचा विषय आहे. या वणव्यांबरोबरच अमेरिकेत सध्या चर्चा आहे ती या वणव्यासारख्या पसरलेल्या बातमीची. सध्याचे जग 'सतत ऑनलाईन' असण्याचे जग आहे. त्यामुळे जगाच्या कानाकोपऱ्यात जरा कुठे खुट्ट झाले की सगळ्यांना कळायला वेळ लागत नाही. आणि मी जी बातमी म्हणतो आहे ती तर जो बायडेन यांनी अध्यक्षपदाच्या शर्यतीतून माघार घेण्याची. अमेरिका शनिवार - रविवार काम करत नाही. सगळे सुटीच्या मूडमध्ये असतात. त्यातही रविवारी दुपारी बातम्या बघितल्या जातीलच असे नाही. बायडेन यांनी माघारीची घोषणा करण्यासाठी हीच वेळ निवडली आणि सगळे जण 'जागे' झाले. पुढच्या तीनपाच मिनिटात ही बातमी अमेरिक...

कमला हॅरिस याना निधी मिळाला, मतांचे काय?

Image
  अमेरिकेचे सध्याचे अध्यक्ष जो बायडेन यांनी आणखी  चार महिन्यांनी होणाऱ्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेऊन आता २४ तास उलटून गेले आहेत. माघार घेतानाच त्यांनी डेमोक्रॅटिक पक्षाच्या नवीन उमेदवार म्हणून सध्याच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस यांना पाठिंबा दिला. अर्थात म्हणून त्या आपोआप उमेदवार झाल्या नाहीत. ऑगस्ट महिन्यात डेमोक्रॅटिक पक्षाचे अधिवेशन आहे. त्यावेळी पक्षाच्या उमेदवाराची निवड अधिकृतपणे जाहीर होईल. परंतु, गेल्या २४ तासात कमला हॅरिस यांनी निधी संकलनाचा विक्रम नोंदवला आहे. २४ तासांत लहानमोठ्या देणगीदारांनी त्यांना आठ कोटी डॉलर्सपेक्षा अधिक रकमेच्या देणग्या दिल्या आहेत. यात आतापर्यंत या पक्षाला अजिबात देणगी न देणाऱ्यांचाही समावेश आहे हे लक्षात घ्यायला हवे.  कमला हॅरिस याना आतापर्यंत ११०० डेमोक्रॅटिक प्रतिनिधींनी पाठिंबा दिला आहे. म्हणजे अर्धी लढाई त्यांनी जिंकली आहे. पुढचा टप्पा उमेदवारी मिळविण्यापुरता तरी सोपा वाटतो आहे.  हॅरिस यांनी २०२० मध्येच पक्षाच्या उमेदवारीसाठी प्रयत्न केले होते. ते अयशस्वी झाले. पण या निमित्ताने त्या देशभर फिरल्या. अमेरिकन लोकांना त्यांची ...

स्वतःचे वेगळे विश्व निर्माण करणारा कलाकार !

Image
आ षाढी एकादशी आली की ‘महाराष्ट्र टाइम्स’चे वाचक त्या दिवशीच्या अंकाची वाट बघतात. बातम्यांसाठी नव्हे तर गेली काही वर्षे दोन पाने भरतील इतक्या आकाराचे (आमच्या भाषेत ‘पॅनो ‘) विठ्ठल राखुमाईचे अप्रतिम चित्र पाहायला. कोणतेही वर्तमानपत्र घरात आल्यावर अर्ध्या दिवसांत ‘शिळे’ होते हे खरे असले तरी विठ्ठल राखुमाईचे अप्रतिम चित्र जपून ठेवणारे असंख्य वाचक आहेत हे लक्षात घ्यायला हवे. हे चित्र काढणारा कलाकार आज अवघ्या महाराष्ट्रात / देशात प्रसिद्ध आहे. त्याचे नाव रोहन पोरे. विठ्ठल रखुमाईचे ‘पॅनोरमा’  चित्र अनेकजण घरी फ्रेम करून लावतात. काहीजण तर रेल्वे डब्यात हे चित्र लावून विठ्ठल रखुमाईची पूजा करतात. अलीकडेच ‘महाराष्ट्र टाइम्स’ने मायमराठी उत्सव मराठीचा’ या नावाने महोत्सव आयोजित केला होता. त्यात रोहनचा विशेष सहभाग होता. मटामध्ये प्रकाशित झालेल्या निवडक ४० व्यक्तिचित्रांचे प्रदर्शन मुंबईत टाइम्स इमारतीत भारावले होते. त्यावेळी मान्यवरांकडून रोहनचे कौतुक झाले होते. त्याचप्रमाणे वाचकांनीही भरभरून प्रतिसाद दिला होता. रोहनने काढलेले  २०२४चे चित्र मुद्दाम इथे देत आहे. रोजच्या अंकात, रविवार पुरवणीत ...

मनोरंजन नव्हे, प्रबोधन !

Image
मुं बईतील लोकल रेल्वे सेवा ही बहुसंख्य लोकांसाठी अत्यावश्यक सेवा आहे. मुंबईत राहणाऱ्या आणि पुढे अगदी कर्जत, कसारा, पश्चिम रेल्वेवर पालघरपर्यंत राहणारे लोक पोट भरण्यासाठी मुंबईत येताना प्रामुख्याने या लोकलचा वापर करतात. मेट्रोचे जाळे वाढत असले तरी ते अजून सर्वसमावेशक झालेले नाही. अन्य सार्वजनिक वाहतूक सेवा म्हणाव्या अशा प्रभावी नाहीत. अशा वेळेस लोकलशिवाय पर्यायच नसतो. दिवसेंदिवस वाढणारी गर्दी, त्यांना अपुऱ्या पडणाऱ्या गाड्या, अतिताणामुळे यंत्रणेचे वारंवार कोलमडणे यासारख्या अडचणींवर मात करून सर्व प्रवासी प्रवास करत असतात. प्रवासाचा कालावधी कमी असेल तर भाग वेगळा, परंतु जास्त असेल तर अडचणीही जास्त. गाडीत शिरायला मिळाले तर भाग्य असे म्हणायची पाळी काही वेळेस येते. अशा गर्दीत डब्यात शिरून भजनांमध्ये दंग व्हायचे आणि नकळत इतरांनाही सहभागी करून घ्यायचे हे तसे दिव्य काम. बरे, सगळ्यांनाच ती भजने ‘आवडतील’ अशातला भाग नाही. अनेक जण घरगुती कारणांमुळे, कार्यालयीन कामाच्या तणावामुळे, आर्थिक परिस्थितीमुळे त्रासलेले असतात. अशा वेळेस त्यांना डब्यातून प्रवास करताना शांतता हवी असते. त्यामुळे ती मंडळी या भजना...