Posts

अस्वस्थतेचे  रंग गडद

  ओ मायक्रोन कोरोनाव्हायरसमुळे चिंतेचे ढग अधिक गडद होत असतानाच काल आणखीन एक बातमी वाचायला मिळाली, तीसुद्धा अस्वस्थतेत भर टाकणारी होती. भारतातील अनेक कंपन्या आपापल्या उत्पादनांच्या किमती नवीन वर्षात वाढवणार आहेत, अशी ती बातमी होती. हिंदुस्तान युनिलिव्हर, डाबर, ब्रिटानिया, मरिको आणि अन्य कंपन्यांनी गेल्या सहा महिन्यात त्यांच्या उत्पादनांच्या किमती पाच ते बारा टक्क्यांनी वाढविल्या आहेत, तरी त्यांच्यासह इतरही अनेक कंपन्या आपल्या उत्पादनांच्या किमती पुन्हा वाढवण्याच्या विचारात आहेत. डिझेल, पाम तेल आणि पॅकेजिंगच्या किमती गेल्या वर्षभरात जवळपास दुप्पट झाल्याने ही किंमतवाढ करावी लागते आहे असे या कंपन्यांनी म्हटले आहे. अनेक मोटार कंपन्यांनी आपल्या वाहनांच्या किमती वाढविण्याचे ठरविले आहे. हे चित्र केवळ भारतातच दिसते आहे असे नाही, महत्त्वाचे म्हणजे सर्वसाधारण चलनवाढ ही अनेक देशांमध्ये वाढत आहे आणि सामान्य माणसाचे जगणे अधिकाधिक कठीण होत आहे.  कोरोनाने ग्रासलेले आणखीन एक वर्ष संपत असताना नवीन वर्षाकडे आशेने बघावे असे प्रत्येकाच्या मनात असले तरी भाजीपाल्यापासून ते अन्य जीवनावश्यक वस्तूंपर्य...

महिलांना दुटप्पी वागणूक कशासाठी?...

 ''बलात्कार होणारच आहे, तर मग झोपा आणि आनंद घ्या, असे अत्यंत लज्जास्पद आणि संतापजनक वक्तव्य काँग्रेसचे आमदार आणि कर्नाटक विधानसभेचे माजी अध्यक्ष केआर रमेश कुमार यांनी केले असल्याची बातमी गेल्या आठवड्यात सगळीकडे झळकली. या वक्तव्यावरून त्यांच्यावर कारवाईची मागणी केली गेली. देशभर या व्यक्तव्याचा निषेध झालाच, शिवाय कॉंग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनीही  या व्यक्तव्याचा  कडक शब्दांत निषेध केला. संबंधीर बातमीत असेही म्हटले होते की 'असे वादग्रस्त वक्तव्य करण्याची  रमेश कुमार यांची ही पहिलीच वेळ नाही. २०१९ मध्ये सभापती असतानाही त्यांनी आपल्या स्थितीची तुलना बलात्कार पीडितेशी करून मोठा वाद निर्माण केला होता. '' म्हणजे एकंदरीत हे रमेश कुमार हे व्यक्तिमत्व कसे आहे हे लक्षात आले असेल. अशा माणसाचा नुसता निषेध करून चालणार नाही, त्यांना पक्षातून काढले पाहिजे. परंतु, हे लिहीपर्यंत  तरी त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नव्हती. या वक्तव्यावर रमेशकुमार यांनी माफी मागितली. पण त्याचा शब्दप्रयोग बघा. ''आपल्या वक्तव्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर त्याबद्दल आपण दिलगीर आहो...

मनातल्या माणसांची चित्रे ...

Image
  आ युष्याच्या विविध टप्प्यांमध्ये आपल्याला अनेक माणसे भेटत असतात. अनेकांना आपण नेहेमी पाहात असतो. काहींशी आपला परिचय होतो, इतरांशी होतोच असे नाही. परंतु डोळ्यासमोरून गेलेला प्रत्येक माणूस आपल्या मेंदूच्या हार्ड डिस्कवर रजिस्टर होत असतो. तो केव्हा, कधी, कसा आठवेल याचा नेम नाही. या सगळ्यामधली निवडक माणसे आपल्या आवडीची असतात. किंवा त्यांना पाहणे, त्यांच्याबरोबर वावरणे आपल्याला आवडत असते.या माणसांची चित्रे काढायची झालीच तर मात्र आपण काहीवेळा प्रतीकात्मक रूप देऊन काढणे पसंत करतो. या लोकांचे फोटो काढणे हा 'जसे आहे तसे' या प्रकारात मोडणारा प्रकार आहे. त्यांची चित्रे काढताना मात्र त्यांच्या 'मनाच्या पटलावर कोरलेल्या आकृत्या' काढावेसे वाटणे ही मला वाटते की एक नैसर्गिक प्रक्रिया झाली. ही प्रक्रिया प्रत्येकाच्या मनात चालू असते. ती व्यक्त करता येणे ही कला मात्र काही जणांनाच जमते. ती नीट जमली तर काय सुखद अनुभव मिळतो, हे संजय घागरे यांच्या चित्रांमधून दिसतो.   संजय हे रूढार्थाने चित्रकार नाहीत. (आता ओळखले जातील). कार्पोरट जगतामध्ये अत्यंत महत्वाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळताना आवड म...

बहिष्काराने साधणार काय ?

  ए खाद्या घटनेची ३९ वर्षानंतर माफी मागणे ही गोष्ट थोडी विचित्र वाटेल, परंतु अमेरिकेच्या ऑलिम्पिक समितीने १९८० साली मॉस्को ऑलिम्पिकवर टाकलेल्या बहिष्काराबद्दल आपल्या खेळाडूंची २०१९  मध्ये माफी मागितली आणि ती मागताना असे म्हटले की, ''आता मागे वळून पाहताना असे जाणवते की मॉस्कोला आपला संघ न पाठविल्याने जागतिक राजकारणावर काहीही परिणाम झाला नाही आणि उलट नुकसान झाले ते तुम्हा खेळाडूंचेच.  अमेरिकन खेळाडू मॉस्कोला जाऊन चांगली कामगिरी करण्याच्या प्रयत्नात होते, परंतु आमच्या निर्णयामुळे त्यांच्यावर विपरीत परिणाम झाला. याबद्दल आम्ही माफी मागतो... '' या माफीने फार फरक पडणार नव्हता, परंतु एकंदरच ऑलिम्पिक स्पर्धा आणि बहिष्कार यांनी काय साधते या प्रश्नाचे उत्तर या एका माफीनाम्याने लक्षात येते. विषय आहे तो फेब्रुवारी २०२२  मध्ये बीजिंग येथे होणाऱ्या हिवाळी ऑलिंपिक स्पर्धेचा. या स्पर्धेवर ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, ब्रिटन, कॅनडा आणि अमेरिका यांनी राजनैतिक बहिष्कार टाकला आहे. राजनैतिक बहिष्कार याचा अर्थ असा की या स्पर्धेला या देशांचा कोणीही राजनितिक अधिकारी  जाणार नाही. चीनने उइघर म...

प्रसारमाध्यमामधला मेलोड्रामा

 (Adoption एक गुड न्यूज या पुस्तकातील वर्षा पवार-तावडे यांचा हा लेख. सोबत त्यांची कन्या अन्वी हिचा  प्रांजल लेख. या पुस्तकातले दोन लेख आधीच दिले आहेत. त्यावरून या साऱ्या प्रकरणाची माहिती वाचकांना  होईल असे वाटते)   मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासात पालकांसोबत समाजाचा सहभागही तितकाच महत्त्वाचा असतो. प्रसारमाध्यमांकडून प्रगल्भ भूमिकेची अपेक्षा असते.   प्रसारमाध्यमांकडून अनेक वेळा अॅडॉप्शन हा विषय चवीनं हाताळला जातो. कथा-कादंबऱ्या, टीव्ही सीरियल्स व सिनेमांमधून 'मेलोड्रामॅटिक' इफेक्ट आणण्यासाठी कुठल्या तरी एका कुटुंबातल एक मूल 'ॲडॉप्टेड' दाखवलं जातं. त्या विषयाचा गांभीर्यानं सखोल अभ्यास न करता अतिशय असंवेदनशील आणि नाट्यमय पद्धतीनं प्रसंग रंगवले जातात.   सिनेमा वा सीरियल्समध्ये कुटुंबातलच मूल त्याच कुटुंबातल्या कोणीतरी दत्तक घेण्याचा प्रसंग किंवा मोठं सामाजिक कार्य करण्याचा आव आणत संस्थेतून मूल दत्तक घेताना सर्रास दाखवलं जातं. 'दत्तक' संबंधीची शास्त्रशुद्ध व कायदेशीर माहिती करून न घेताच चुकीच्या गोष्टी दाखवल्या जातात. उदा. एका वेळी अनेक बाळांमधून पालकांना निवड कर...

अमित शाह, ममता दीदी आणि राजकारण

 अमित शाह हे भारतीय जनता पक्षाचे ‘चाणक्य’ म्हणून ओळखले जातात. या वर्षीच्या मार्च एप्रिलमध्ये झालेल्या पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळ राज्यांतील विधानसभा निवडणुकीत भाजपला पराभव पत्करावा लागल्याने अमित शाह यांची चाणक्य नीती फसते  की काय असे वाटू लागले होते. या तीन राज्यांतील निवडणुकांनंतर काही राज्यांत पोटनिवडणूक झाल्या, त्यात भाजपला संमिश्र यश मिळाले. आता उत्तर प्रदेशातील विधानसभेच्या निवडणुकीचे नगारे वाजू लागले आहेत. मार्च एप्रिलमध्ये भाजप काहीशी बेसावध होती. पश्चिम बंगाल आपण जिंकलाच आहे, फक्त मतदानात शिक्कामोर्तब होणे बाकी आहे, असे त्यांना वाटत होते. ममता बॅनर्जी यांनी त्यांचा पूर्ण भ्रमनिरास केला. त्या वेळेच्या प्रमाणे आता उत्तर प्रदेशात बेसावध राहून चालणार नाही, याची चाहूल भाजपला लागलेली दिसते. म्हणूनच या महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात अमित शाह यांनी वाराणसी (पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ) आझमगढ (समाजवादी पक्षाच्या अखिलेश यादव यांचा मतदारसंघ) आणि बस्ती (हरिश्चंद्र द्विवेदी हे भाजप खासदार असलेला मतदारसंघ) अशा तीन मतदारसंघांचा दौरा केला. असंख्य बैठक घेतल्या. या तीन मत...

एका प्रांजळ पुस्तकाविषयी...

Image
 ( मूल दत्तक घेण्याचे प्रमाण भारतात आता वाढले असले तरीही कायदेशीर अडचणी, दत्तक मूल  स्वीकारण्याबाबतचे मानसिक तिढे, अशा मुलांना समाज स्वीकारेल का ही मनात असलेली भीती, मुलाचे पालक कोण असतील, त्यांची पार्श्वभूमी कशी असेल, मुलात काही मानसिक वा इतर दोष असतील का या आणि इतर अनेक प्रश्नांमुळे मूल दत्तक घेण्याची प्रक्रिया सहजसुलभ नसते. मात्र, योग्य मार्दर्शन मिळाल्यास हा अनुभव खूप आनंददायी होऊ शकतो. आपल्या मित्रपरिवारात, नातेवाईक अथवा अन्य कुटुंबात मूल दत्तक घेतले गेले असेल तर त्याबद्दल कुतूहल असते, पण जेव्हा स्वतःच्या कुटुंबात मूल असे दत्तक आणायचे असते तेव्हा मात्र मन पटकन निर्णय घेण्यास तयार होत नाही. काही दिवस, महिने जावे लागतात. लोकांच्या मनातील याच शंका दूर करण्यासाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या वर्षा  पवार -तावडे यांनी दत्तक मुलांच्या व पालकांच्या भावना त्यांच्याच शब्दात मांडून पुस्तकरूपाने आपल्यासमोर आणल्या आहेत. पुस्तकाची संकल्पना, संकलन आणि संपादन त्यांनीच केले आहे. डॉ. मनोज भाटवडेकर यांची समर्पक प्रस्तावना पुस्तकात आहे. मूल दत्तक घेऊ इच्छिणाऱ्यांसाठीच नव्हे तर इतर प्रत्...

मूल दत्तक घेताना ..

Image
 ( मूल दत्तक घेण्याचे प्रमाण भारतात आता वाढले असले तरीही कायदेशीर अडचणी, दत्तक मूल  स्वीकारण्याबाबतचे मानसिक तिढे, अशा मुलांना समाज स्वीकारेल का ही मनात असलेली भीती, मुलाचे पालक कोण असतील, त्यांची पार्श्वभूमी कशी असेल, मुलात काही मानसिक वा इतर दोष असतील का या आणि इतर अनेक प्रश्नांमुळे मूल दत्तक घेण्याची प्रक्रिया सहजसुलभ नसते. मात्र, योग्य मार्दर्शन मिळाल्यास हा अनुभव खूप आनंददायी होऊ शकतो. आपल्या मित्रपरिवारात, नातेवाईक अथवा अन्य कुटुंबात मूल दत्तक घेतले गेले असेल तर त्याबद्दल कुतूहल असते, पण जेव्हा स्वतःच्या कुटुंबात मूल असे दत्तक आणायचे असते तेव्हा मात्र मन पटकन निर्णय घेण्यास तयार होत नाही. काही दिवस, महिने जावे लागतात. लोकांच्या मनातील याच शंका दूर करण्यासाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या वर्षा  पवार -तावडे यांनी दत्तक मुलांच्या व पालकांच्या भावना त्यांच्याच शब्दात मांडून पुस्तकरूपाने आपल्यासमोर आणल्या आहेत. पुस्तकाची संकल्पना, संकलन आणि संपादन त्यांनीच केले आहे. डॉ. मनोज भाटवडेकर यांची समर्पक प्रस्तावना पुस्तकात आहे. मूल दत्तक घेऊ इच्छिणाऱ्यांसाठीच नव्हे तर इतर प्रत्...

शिक्षण स्थिती  / खड्डेमुक्ती / कृषी कायदे

 'स्टेटस ऑफ एज्युकेशन रिपोर्ट २०२१'  ('असर') हा ग्रामीण भागापुरता असलेला अहवाल काही दिवसांपूर्वी जाहीर झाला. हे अहवाल दरवर्षी प्रसिद्ध होतात आणि वास्तव चित्र समोर उभे केले जाते, त्याचप्रमाणे भविष्यात आपल्याला काय करावे लागेल याच्या दिशादर्शक सूचनाही यातून मिळत असतात. यावेळच्या अहवालाचे पाच महत्त्वाच्या सूचनांमध्ये विभाजन केले आहे. कोरोनामुळे  शिक्षणावर विपरीत परिणाम झाला असला तरी प्राथमिक विभागात शाळाबाह्य मुलांची संख्या वाढलेली नाही असे हा अहवाल म्हणतो, हे थोडे आश्चर्यजनक वाटते. २०१८ ते २०२०  या काळात  सरकारी शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे असे अहवाल म्हणतो. २०२०  मध्ये ही संख्या ६५.८ टक्के होती, ती  आता ७०.३  टक्‍क्‍यांवर गेली आहे आहे. खाजगी शाळांची फी  परवडत नाही म्हणून सगळे सरकारी शाळांमध्ये गेले की सरकारी शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावला म्हणून तिथे गेले हे पुरेसे स्पष्ट होत नाही. तिसरी महत्त्वाची बाब म्हणजे याचाच परिणाम म्हणून खासगी शाळांमधील प्रवेश गेल्या दहा वर्षाचा विचार करता सर्वात कमी झाले. इथे परत आर्थिक बाजू समजून घ्...

.. आणि बाबासाहेब थांबले !

Image
 शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन ही अवघ्या महाराष्ट्राला आणि जगभरातील शिवप्रेमीना चटका लावून जाणारी घटना होती. कार्यक्रमाच्या निमित्ताने, भ्रमंतीच्या निमित्ताने बाबसाहेबांनी हजारो लोकांशी मैत्र केले, दोघांमधला दुवा एकच - छत्रपती शिवाजी महाराज ! मुंबईतील अनिल शशिकांत नलावडे आणि पद्मश्री राव यांच्याशी त्यांचे मैत्र जुळले ते याच कारणांमुळे. वेगवेगळ्या निमित्ताने त्यांचा बाबासहेबांशी संबंध येत राहिला आणि ते अधिकाधिक समृद्ध होत राहिले. बाबसहेबांचे शिवरायांवरचे बोलणे आणि शिवरायांच्या आयुष्यावरची गाणी असा  एक कार्यक्रम या दोघांनी खूप सुंदर सादर केला. गाणी कितीही सुंदर असली तरी बाबासहेबांचे बोलणे कधी थांबूच नये असे वाटायचे.   एक आठवण सांगविशी वाटते. या दोघांनी मुंबईत माटुंगा येथे आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बाबासाहेब बोलत होते, वयाची नव्वदी उलटून गेली आहे याच्या कोणत्याही खुणा दिसत नव्हत्या, पंचविशीच्या उत्साहाने बाबासाहेब बोलत होते. ... बोलतच राहिले. नाईलाजाने मध्ये त्यांना थांबवून एखादे गाणे व्हायचे. अडीच तास होऊन गेले तरी मध्यंतर झाले नव्हते. शेवटी या आयोजकांनी बाबास...