पोस्ट्स

आगळेवेगळे जंगल पिक

इमेज
मी नेहमी असे मानतो की एखाद्या पत्रकाराने पूर्ण पान लेख लिहून जे सांगायचा प्रयत्न केलेला असतो ते एखादा छायाचित्रकार एका छायाचित्रातून आपल्याला जे हवे ते अधिक ठळकपणे सांगतो. एक फोटो कमाल करतो. अनेकदा एखाद्या बातमीचे शीर्षक इतके चांगले असते की त्यामुळे बातमी चांगल्या पद्धतीने लक्षात येते. तसेच छायाचित्रकाराचे आहे. गेल्या काही वर्षांत मोबाईल क्रांतीमुळे जवळपास प्रत्येकजण छायाचित्रकार झाला / झाली, हे खरे असले तरी प्रत्येकाला उत्तम फोटो काढता येतेच असे नाही. त्यातही रोजच्या जीवनाशी निगडित फोटो काढणे, निसर्गात जाऊन सूर्योदय / सूर्यास्त किंवा उत्तम देखाव्याचे फोटो काढणे आणि जंगलात जाऊन वन्य प्राण्यांचे फोटो काढणे या प्रत्येक क्षेत्रात होत असलेल्या छायाचित्रणात कमालीचा फरक आहे. ते स्वाभाविकही आहे. यात सर्वात कठीण काम आहे ते जंगलात जाऊन वन्य प्राण्यांचे फोटो काढणे. आपण प्राण्यांच्या अधिवासात जात आहोत त्यामुळे त्यांचे नियम पाळून फोटो काढायचे, हे लक्षात ठेवावे लागते. एखाद्या फोटोसाठी प्रसंगी अनेक तास वाट पाहावी लागते तर कधी थोड्या वेळात काही चांगले फोटो मिळू जातात. पण असे क्वचित होते. तरीही ‘नॉर्

बातमी, विश्लेषण आणि अर्थ सांगणारे पुस्तक

इमेज
विख्यात पत्रकार राजीव  साबडे  यांनी लिहिलेले आणि ‘रोहन प्रकाशन’ने प्रसिद्ध केलेले  ‘वार्तांच्या झाल्या कथा’ हे पुस्तक पत्रकार होऊ इच्छिणाऱ्या आणि काही वर्षे पत्रकारिता करणाऱ्या प्रत्येकाने  वाचण्यासारखे आहे. ‘एका ज्येष्ठ पत्रकाराने अनुभवलेल्या विविध घटनांचे गोष्टीरूप चित्रण’ असे पुस्तकाच्या सुरुवातीला म्हटले असले तरीही वेगवेगळ्या घटनांचे रिपोर्ताज स्वरूपातले  लेखन आणि ती घटना आज अनेक वर्षे होऊन गेली तरी डोळ्यासमोर जशीच्या तशी उभी करण्याचे कसब हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे.  हे संपूर्ण लेखन कधीही कोणताही सवंगपणा आणि भडकपणा येऊ न देता केले असल्यामुळे ते अधिक विश्वासार्ह वाटते.  श्री साबडे यांची संपूर्ण कारकीर्द पुण्याच्या 'सकाळ' या वृत्तपत्रात गेली.  तब्बल ३४  वर्षे विविध संपादकीय पदांवर त्यांनी काम केले आहे. त्यामुळे त्यांना देश-विदेशात वार्तांकन करण्याची संधी मिळाली आणि त्यातल्या काही घटनांवर त्यांनी हे पुस्तक लिहिले आहे.  पुस्तकांमध्ये तेरा प्रकरणे आहेत आणि प्रत्येक प्रकरणातला तपशील हा स्वतंत्रपणे पुस्तक होऊ शकतो इतका भरगच्च आहे.  या तेराही विषयांवर यापूर्वी कोणी लेखन केले नाह

कशासाठी ...रेडिओसाठी !

सध्या तरुण पिढी मोबाईल आणि स्क्रीनच्या मागे लागली आहे, ते त्यात खूप वेळ घालवतात असे आरोप नेहमी होतात. त्यात बऱ्याच प्रमाणात तथ्यही आहे. त्याचे विपरीत परिणाम मानसिक आणि शारीरिक असे दोन्ही होतात. कोरोंनाने सर्व वयोगटातील शाळकरी मुलामुलीना  हातात लवकर मोबाईल दिला असला तरी कोरोना संपल्यावर तो दूर झाला नाही. मुलांना कोणत्याही ताज्या घडामोडींची माहिती नसते असे म्हणता येणार नाही. त्यांचा माहितीचा 'सोर्स' हा वर्तमानपत्रांपेक्षा ऑनलाईन आहे हेही खरे आहे. परंतु मोबाईल, टीव्ही चॅनेल्स, यु ट्यूब यापेक्षा आपल्या सर्वांचा बातम्यांचा / माहितीचा जो मूळ सोर्स होता तो रेडिओ या मुलांपासून लांब गेला आहे. अर्थात याचा दोष त्यांना देता येणार नाही. घरचे ज्येष्ठ रेडिओ न ऐकता मोबाईलमध्ये डोळे खुपसून बसणार असतील तर मुलांना सवय तरी कशी लागणार ? आधीपेक्षा कमी, पण आजही अनेक घरांमध्ये रेडिओ ऐकला जातो आणि त्यावर अनेक दर्जेदार कार्यक्रम इथे सादर होत असतात. तुम्ही कितीही ऑनलाईन असाल तरी घरी रेडिओ हवाच यात वाद नाही. काल 'द हिंदू' या नावाजलेल्या दैनिकात रेडिओसंदर्भात एक बातमी वाचली आणि रेडिओच्या आठवणी जाग्

एका सच्च्या कार्यकर्त्याची शंभरी !

इमेज
बबन डिसोजा, रतन डिसोजा, मधू दंडवते, प्रमिला दंडवते   वयाच्या १८व्या वर्षी 'भारत छोडो' आंदोलनात सक्रिय सहभाग, राष्ट्र सेवा दलात भरीव काम, मिल मजदूर सभेच्या स्थापनेपासून नंतर अनेक वर्षे सक्रिय सहभाग, प्रजा समाजवादी पक्षाचे पूर्ण वेळ चिटणीस, गोवा विमोचन समितीचे व संयुक्त महाराष्ट्र समितीच्या मुंबई शाखेचे कार्यालयीन सचिव, बॅ. नाथ पै,  मधू दंडवते यांच्या निवडणुकांमध्ये मोठे काम, साने गुरुजींच्या  नेतृत्वाखाली  काम , १९७५मध्ये आणीबाणीच्या विरोधात काम, नंतर मुंबई जनता दलात अनेक वर्षे काम, १९८० साली मालवणमध्ये बॅ. नाथ पै सेवांगणाच्या उभारणीत सिंहाचा वाटा, आणि हे सारे काम करताना अत्यंत निर्मल आणि नि:स्वार्थी स्वभाव, सगळ्यांना बरोबर घेऊन काम करण्याची हातोटी ... हे सारे करणाऱ्या श्री. बबन डिसोजा यांचा आज शंभरावा वाढदिवस आहे. माझे वडील, राजकीय कार्यकर्ते, कामगार नेते, सामाजिक कार्यकर्ते अशा विविध भूमिकांमध्ये त्यांना मी पाहात आलेले आहे. आणि या सगळ्याबद्दल मला विलक्षण अभिमान आहे. बबन डिसोजा आणि राणी पाटील   बबन डिसोजा यांचा जन्म ३ सप्टेंबर १९२४ रोजी गणेश चतुर्थीला, मालवण तालुक्यातील कट्टा य

अमेरिकेत बोलबाला Influencers चा !

इमेज
  अमेरिकेत सध्या अध्यक्षीय निवडणुकीची धामधूम सुरू आहे. डेमोक्रॅटिक पक्षाकडून आपण परत एकदा निवडणूक लढवावी अशी विद्यमान अध्यक्ष जो बायडेन यांची कितीही इच्छा असली तरी ते शक्य झाले नाही. त्याची कारणे सर्वश्रुत आहेत. त्यांच्या जागेवर उपाध्यक्ष कमला हॅरिस यांची निवड उमेदवार म्हणून झाली आणि डेमोक्रॅटिक पक्षाच्या मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. माजी अध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प  यांनी या निवडणुकीत आधी आघाडी घेतली होती, पण आता सध्या तरी अल्पमताने का असेना कमला हॅरिस आघाडीवर आहेत. अजूनही नोव्हेंबरमध्ये नक्की कोण निवडून येतील हे सांगणे कठीण आहे. कमला हॅरिस यांच्या उमेदवारीवर शिकागो येथे गेले चार दिवस सुरू असलेल्या अधिवेशनात शिक्कामोर्तब झाले. हॅरिस यांच्या समर्थनार्थ स्वतः जो बायडेन, बराक व मिशेल ओबामा, हिलरी क्लिंटन यांच्यासह अनेक दिग्गज नेते या अधिवेशनात येऊन गेले. अमेरिकेत राहणारे पण मतदानाचा अधिकार नसलेले लोकही ही भाषणे ऐकत आहेत. कारण ही निवडणूक कदाचित त्यांचेही भविष्य ठरवणार आहे.    हॅरिस आणि त्यांची टीम डेमोक्रॅटिक पक्षाचे जुने मतदार, तरुण मतदार आणि कु

एका लायब्ररीचा मृत्यू ...

इमेज
  तो साधारण १९८७-८८ चा काळ असावा. आमच्या सोसायटीत दर १५ दिवसांनी एक गृहस्थ ग्रंथपेटी घेऊन यायचे. पंधरा दिवसांपूर्वी दिलेले पुस्तक बदलून वाचकांनी नवीन पुस्तक घ्यावे, ते वाचावे यासाठी. त्यासाठी ते वाचकांकडून अल्प अशी मासिक फी घेत असत. त्यांचे नाव श्री मधू भट होते. ही ग्रंथपेटी केवळ 'व्यवसाय' म्हणून ते चालवत नव्हते. ते स्वतः उत्तम पुस्तके वाचत असत आणि ग्रंथपेटीत उत्तमोत्तम पुस्तकेच असावीत याकडे त्यांचा कटाक्ष असे. वाचकांनाही त्यांची आवडनिवड ओळखून विविध पुस्तके सुचवत असत. त्या सुमारास मी इंदिरा गांधी यांच्यावरील एक लेख अनुवादित केला होता. रविवार पुरवणीत पूर्ण आठ कॉलम म्हणजे पूर्ण पानभर (हो, त्या वेळेस मटामध्ये पूर्ण पानभर लेख प्रकाशित होत होते) आणि उरलेला पान  दोनवर असा तो प्रसिद्ध झाला होता. तीनच दिवसांनी श्री भट यांनी तो अनुवाद आवडल्याचे पत्र घरच्या पत्त्यावर पाठवले होते. मी ते अजून जपून ठेवले आहे. कालांतराने त्यांनी ही फिरती लायब्ररी बंद केली, पण त्यांचे साहित्यप्रेम काही कमी झाले नव्हते. लायब्ररी बंद झाल्याची चुटपुट मात्र अनेकांना लागली होती.  आता साल आठवत नाही, पण नंतर काही वर

प्रकल्पांची खर्चवाढ टाळता येईल का ?

इमेज
मुंबईतील वांद्रे वर्सोवा सी लिंक प्रकल्पाचा खर्च ६७८८ कोटी रुपयांनी वाढला आणि प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आणखी ५०८ दिवसांची मुदतवाढ मिळाली ही सौरभ कुलश्रेष्ठ यांनी 'हिंदुस्थान टाइम्स'मध्ये दिलेली बातमी वाचून खेद वाटला असला तरी अजिबात आश्चर्य वाटले नाही. हा खर्च आता ११,३३२ कोटींवरून १८,१२० कोटींवर गेला आहे. वांद्रे वर्सोवा सी लिंक रस्ता हा मरीन लाईन्स ते कांदिवली अशा रस्त्याचा एक भाग आहे. मुंबईतील वाहतूक सुरळीत करण्याच्या प्रयत्नातील एक भाग म्हणून याकडे पाहता येईल.  वांद्रे वरळी सी लिंक २००९मध्ये पूर्ण झाल्यावर तेव्हाच्या काँग्रेस - राष्ट्रवादी सरकारने वरळी ते नरिमन पॉईंट आणि वांद्रे वर्सोवा असे दोन मार्ग उभारण्याचे ठरवले, परंतु दोन्ही पक्षातील मतभेदांमुळे पुढे काहीच झाले नाही. २०११ मध्ये वांद्रे वर्सोवा मार्ग मंजूर करण्यात आला. पण प्रत्यक्षात काम सुरु झाले नव्हते. २०१७मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने हा प्रकल्प मार्गी लावण्याचे ठरवले आणि एमएसआरडीसीला ७५०८ कोटींचा हा प्रकल्प पूर्ण करण्यास सांगितले. वर्षभरातच खर्चाचा आकडा वाढून ११,३३२ कोटींवर गेला. तोच आता सात वर्षांनी वाढून १