Posts

समाजमाध्यमांवरील निर्बंध प्रभावी ठरतील?

   ऑस्ट्रेलियाने १६ वर्षाच्या खालील मुलांसाठी सोशल मीडिया बॅन लागू केला आहे. त्याबाबत जगभर चर्चा झाली. या निर्णयाला   तेथील स्थानिक न्यायालयांमध्ये आव्हान देण्यात आले आहे. या बंदीनंतर कायकाय समस्या निर्माण झाल्या, मुलांवर किती परिणाम झाला हे अजून स्पष्ट व्हायचे आहे. तरी ही बंदी ऐतिहासिक ठरली आहे हे निश्चित.    युरोपीय महा संघातील   देशांमध्ये अशा प्रकार ची बंदी आपण आणू शकतो का याचा विचार चालू आहे. नुक ता च फ्रान्सने त्यांच्या कनिष्ठ सभागृहामध्ये अशा प्रकारे १६ वर्षांखालील मुलांसाठी बंदी घालण्याचा ठराव संमत केला आहे. खरे म्हणजे फ्रान्सने डेन्मार्क, ग्रीस आणि स्पेन या देशांनाही याबाबतची विचारणा केली होती. परंतु या तीन देशांनी अजून तरी तसा ठराव केलेला नाही. युरोपीय महासंघाच्या देशांनी युरोपियन आयोगाच्या प्रमुख यांना सल्ला देण्यासाठी एक  सल्लागार मंडळ  नेमण्याचे ठरवले आहे. २०२५ च्या   शेवटी हे  मंडळ स्थापन होणार होते, परंतु अद्यापपर्यंत त री ते स्थापन झालेले नाही. या वर्षाच्या सुरुवातीला ते होईल अशी अपेक्षा आहे. युरोपियन संसदेने अशा प्र...

धोनीला पर्याय आहे का?

'तुम्ही निवृत्त का होत नाही' यापेक्षा 'तुम्ही निवृत्त का होत आहात' असे लोकांनी विचारले तर ते अधिक चांगले, असे विख्यात क्रिकेटपटू विजय मर्चंट नेहमी म्हणत असत. अलीकडच्या काळात याचा जास्त प्रत्यय यायला लागला आहे. फक्त क्रिकेटपुरते बोलायचे तर विराट कोहली, रोहित शर्मा आणि आता महेंद्रसिंग धोनी या तिघांबद्दलही हे प्रश्न वारंवार विचारले जाऊ लागले आहेत. गेल्या काही महिन्यात विराट कोहली आणि रोहित शर्मा यांची कामगिरी अपेक्षेपेक्षा खूप कमी दर्जाची होत आहे. मधूनच एखादी उत्तम खेळी केली की जणू 'माझ्यात अजून दम आहे' असे हे खेळाडू सांगतात. पण नंतर पुढचे अनेक डाव ते असफल होतात. खेळाडू मोठा असला तरी त्याची निवृत्ती कधी न कधीतरी होणारच हे गृहीत धरले पाहिजे . भारतीय क्रिकेट नियमक मंडळ किंवा तुमच्या आमच्यासारखे सामान्य क्रिकेटप्रेमी यांच्यापेक्षाही या खेळाडूंनी त्याची जाणीव जास्त ठेवली पाहिजे. पण ते प्रत्यक्षात होताना दिसत नाही. त्याचे उदाहरण म्हणजे हे तीनही खेळाडू असे म्हणायला हवे.  या तिघातही महेंद्रसिंग धोनी हा 'चेन्नई सुपर किंग्ज' (सीएसके) संघाचा आधारस्तंभ. ...

सर्वांना जोडणारा दुवा

Image
    महाराष्ट्रात अनेक सामाजिक संस्था विविध स्तरांवर काम करत आहेत. समाजाचे भले व्हावे यासाठी समविचारी लोकांच्या मदतीने चांगल्या कामाचे जाळे उभारत आहेत. पुण्यातील 'दुवा' ही अशीच एक संस्था. तिच्या कामाचा हा परिचय. अधिकाधिक लोक त्यात सहभागी होतील आणि हा 'दुवा' बळकट करतील अशी अपेक्षा आहे.            जगात अनादि काळापासून ‘आहे रे’ आणि ‘नाही रे’ असा भेद दिसून येतो. माणूस जसा सुसंस्कृत व्हायला लागला तसं त्याला ही दरी जाणवायला लागली आणि त्यातून या २ वर्गांना जोडण्याचे प्रयत्न सुरू झाले. पुण्यात काम करणारी ‘दुवा’ नावाची एक संस्थाही याच दृष्टीकोनातून निर्माण झाली.           ‘आहे रे’ गटाकडे संसाधनांची विपुलता असते तर ‘नाही रे’ गट किमान गरजा पुरवण्यासाठी धडपडत असतो. त्यातून दुवा संस्थेच्या संचालिका अर्चना गोगटे यांना असं वाटून गेलं की जिथे आहे तिथून, जिथे नाही तिथे जाण्यासाठी एखादा ‘दुवा’ साधता येईल का? सधन घरातली वापरण्यायोग्य अशी भांडी, कपडे, खेळणी, पुस्तकं ज्यांना पाहिजे आहे त्यांच्यापर्यंत पोचवता येतील का? आहे...

अर्थसाक्षरतेबद्दल शाळांचे सकारात्मक पाऊल

Image
आजच्या शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांना व्यवसायाभिमुख शिक्षण मिळत नाही असे म्हटले जाते. इयत्ता दहावी, बारावीनंतर अथवा पदवी शिक्षणानंतर तो विद्यार्थी किंवा ती विद्यार्थिनी नोकरी मिळवण्यासाठी अथवा स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी सक्षम आहे का किंवा होते का असा प्रश्न अनेक वेळेला विचारला जातो. केवळ पदवीधर आहे म्हणजे नोकरी करण्यासाठी पुरेसे आहे असे नाही. पदवीचे शिक्षण घेतानाच किंबहुना त्याही आधी शालेय जीवनात अर्थसाक्षरता जर समजली तर किती चांगला परिणाम होऊ शकतो याची उदाहरणे आपल्यासमोर आहेत. सध्याच्या राजकीय आणि गुन्हेगारी विषयक बातम्यांच्या रगड्यात या संदर्भातली सकारात्मक बातमी वाचायला मिळाली की बरे वाटते आज दि. नऊ फेब्रुवारी २०२५ च्या 'हिंदुस्तान टाइम्स'मध्ये नीरज पंडित यांनी विद्यार्थ्यांना अर्थसाक्षर बनवण्याच्या दृष्टीने मुंबई महापालिकेच्या शाळांसह अन्य खाजगी शाळांमध्ये कसे प्रयत्न चालू आहेत याची बातमी दिली आहे.  नुकतेच खारच्या लीलावती बाई पोद्दार हायस्कूलमध्ये इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांनी विविध देशांमध्ये आर्थिक धोरणे कशी तयार होतात, आपल्या घरातले रोजचे / महि...

शिक्षण क्षेत्रातले प्रयत्न अपुरेच?

  काही दिवसापूर्वी केंद्रीय शिक्षण खात्याने घेतलेल्या एका निर्णयाबद्दल बरीच चर्चा झाली होती.  इयत्ता पाचवी आणि आठवी या इयत्तेत जर विद्यार्थी नापास झाले तर त्यांना पुढच्या इयत्तेत न ढकलण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याची ही बातमी होती. विद्यार्थ्यांवर परीक्षेचा ताण नको आणि आठवीपर्यंत त्यांना विनाताण शिकता यावे यासाठी आठवीपर्यंत परीक्षेत उत्तीर्ण करण्याचा निर्णय पूर्वी घेण्यात आला होता. तो बदलल्यानंतर त्यावर टीका झाली आणि परत विद्यार्थ्यांवरचा मानसिक बोजा वाढेल, तणाव वाढेल असे म्हटले गेले होते. पण यातही नाण्याच्या दोन बाजू आहेत. ज्या विद्यार्थ्यांना आठवीपर्यंत जाऊन सुद्धा नीट लिहिता वाचता येत नाही अथवा जे अभ्यासात काहीच प्रगती करू शकत नाहीत त्या विद्यार्थ्यांचे नववीत गेल्यानंतर काय हाल होतील याचाही विचार केला गेला पाहिजे.  यात संदर्भात आज दिनांक २३ जानेवारीला 'द इकॉनॉमिक टाइम्स' या वृत्तपत्रात आलेल्या बातमीकडे पाहिले पाहिजे असे मला वाटते . जानेवारी महिना संपत आला की विद्यार्थी आणि पालकांनाही वेध लागतात ते दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षेचे. यातली दहावीची ...

आगळेवेगळे जंगल पिक

Image
मी नेहमी असे मानतो की एखाद्या पत्रकाराने पूर्ण पान लेख लिहून जे सांगायचा प्रयत्न केलेला असतो ते एखादा छायाचित्रकार एका छायाचित्रातून आपल्याला जे हवे ते अधिक ठळकपणे सांगतो. एक फोटो कमाल करतो. अनेकदा एखाद्या बातमीचे शीर्षक इतके चांगले असते की त्यामुळे बातमी चांगल्या पद्धतीने लक्षात येते. तसेच छायाचित्रकाराचे आहे. गेल्या काही वर्षांत मोबाईल क्रांतीमुळे जवळपास प्रत्येकजण छायाचित्रकार झाला / झाली, हे खरे असले तरी प्रत्येकाला उत्तम फोटो काढता येतेच असे नाही. त्यातही रोजच्या जीवनाशी निगडित फोटो काढणे, निसर्गात जाऊन सूर्योदय / सूर्यास्त किंवा उत्तम देखाव्याचे फोटो काढणे आणि जंगलात जाऊन वन्य प्राण्यांचे फोटो काढणे या प्रत्येक क्षेत्रात होत असलेल्या छायाचित्रणात कमालीचा फरक आहे. ते स्वाभाविकही आहे. यात सर्वात कठीण काम आहे ते जंगलात जाऊन वन्य प्राण्यांचे फोटो काढणे. आपण प्राण्यांच्या अधिवासात जात आहोत त्यामुळे त्यांचे नियम पाळून फोटो काढायचे, हे लक्षात ठेवावे लागते. एखाद्या फोटोसाठी प्रसंगी अनेक तास वाट पाहावी लागते तर कधी थोड्या वेळात काही चांगले फोटो मिळू जातात. पण असे क्वचित होते. तरीही ‘नॉर्...