आरोग्य अधिक जपायला हवे !
को णत्याही अर्थसंकल्पाने प्रत्येकाचे समाधान होणे अशक्य असते हे एकदा समजून घेतले की राज्याच्या आणि देशाच्या अर्थसंकल्पाकडे पाहणे सोपे जाते. अर्थसंकल्प तयार करताना अर्थमंत्री / मुख्यमंत्र्याना पूर्ण राज्याचा विचार करावा लागतो. म्हणूनच प्रत्येक घटकाकडे पुरेसे लक्ष देणे शक्य नसते. असे असले तरी काही बाबी खटकतातच. शुक्रवारी महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. त्यानंतर आलेल्या प्रतिक्रियाही अशाच प्रकारच्या होत्या. अर्थसंकल्पात कायकाय योजना आहेत, त्यासाठी किती खर्च होणार आहे हे अर्थमंत्र्यांनी सांगितले असले तरी आधीच्या योजनांवरील अंमलबजावणी आणि झालेला कमी /जास्त खर्च याचाही आढावा सविस्तरपणे हवा होता. [caption id="attachment_3432" align="alignright" width="1448"] चित्र - सुमंत बिवलकर[/caption] ज्या विभागाबाबत अधिक चर्चा व्हायला हवी, तो विभाग म्हणजे आरोग्य विभाग. कोरोना आल्यावर आपल्या वैद्यकीय क्षेत्रातील त्रुटी अधिक ठळकपणे दिसल्या. प्रमुख शहरांमधील निवडक खासगी आणि सरकारी रुग्णालये कोरोनाशी दोन हात करण्यासाठी काहीशी सज्ज हो...