चेहेरे आणि मुखवटे …
आ पल्याला एखाद्या बँकेने कर्ज नाकारले तर आपण काय करतो? दुसऱ्या बँकेकडे जातो. त्या बँकेनेही दिले नाही तर आणखी वेगळी बँक बघतो. पण ‘तुम्ही कर्ज नाकारलेत, आता मीच माझी बँक काढतो’, असे कोणी म्हणते का ? तीन दशकांपूर्वी अवघे २५ वय असणाऱ्या विश्वास जयदेव ठाकूर या नाशिकच्या तरुणाने हेच उत्तर दिले. आणि दोन वर्षांतच बँक काढलीही. ती आज ‘विश्वास सहकारी बँक’ या नावाने प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रात सहकारी बँक आणि एकूणच सहकार क्षेत्र, त्याचे अर्थकारण, त्याबरोबर येणारे राजकारण, त्यातून काही सहकारी बँकांची वा संस्थांची (पर्यायाने सामान्य खातेदारांची) झालेली वाताहत या सगळ्यापासून विश्वास बँक दूर राहिली आणि केवळ ग्राहकहित लक्षात घेऊन सुरु करण्यात आलेली ही बँक आज आर्थिकदृष्ट्या भक्कम स्तरावर ताठ मानेने उभी आहे. काही सहकारी बँकांच्या नेत्यांनी प्रत्यक्ष / अप्रत्यक्षरीत्या बँक चालवता चालवता राज्य पातळीवर राजकारणही केले. मग काही वेळा ते राजकारण बँकांना गाळात घालणारेही ठरले. विश्वास ठाकूर यांनीही राजकारणात काही वर्षे काढली, पण बँकेचा ‘उपयोग’ त्यासाठी करणे कटाक्षाने टाळले. आज ते सक्रिय राजकारणात नाहीत....