Posts

विश्वाची नवलकथा !

चं द्रयान -३ चंद्रावर उतरल्यावर आपण काही दिवसांतच सूर्याचा आभास करण्यासाठी आदित्य एल वन या नावाने मोहीम हाती घेतली. या दोन्ही घटनांबद्दल भारतात प्रचंड प्रमाणात जल्लोष झाला, आनंद व्यक्त झाला. इस्रोच्या कामगिरीबद्दल कमालीचा अभिमान प्रत्येक भारतीयाला वाटला. जगभरात इस्रोचे कौतुक झाले, ही जगाची मोहर तेवढीच महत्वाची होती. केवळ या विषयापुरते नव्हे तर एकूणच विश्व कसे आहे, परग्रह कसे आहेत, आकाशगंगा म्हणजे काय, हे विश्व कसे निर्माण झाले, त्यात कसकसे बदल झाले, अजूनही आपल्याला हे विश्व नीटसे कळले नाही – ते कधी कळणार, या साऱ्या पसाऱ्यात पृथ्वी एका सूक्ष्म कणाएवढी आहे, मग या पृथ्वीचे पुढे काय होणार, म्हणजेच पर्यायाने मानवजातीचे (आणि अन्य ग्रहांवर जीव असलेच तर त्यांचे काय होईल) यांसारखे असंख्य प्रश्न आपल्याला पडलेले असतात. त्याची संपूर्ण उत्तरे अजून कोणालाही मिळालेली नाहीत. त्यामुळे आपली उत्सुकता अधिक वाढायला मदत झाली आहे. मानव विज्ञानात प्रगती करत आहे, आता सारे कळेल असे वाटत असतानाच नवे विश्व समोर येते आणि मग हा सारा पसारा आहे तरी किती असे विचार पुन्हा आपल्या मनात येतात. …. विश्वाच्या निर्मितीवर, त्...

वाढते प्रदूषण .. आता तरी जाग येईल?

  प्र दूषणाने आरोग्यावर परिणाम होतो हे आपल्याला माहीत आहे, पण तो नेमका किती होतो याबाबतची मते प्रत्येकाची वेगवेगळी असतील. शिकागो विद्यापीठाने केलेल्या Energy Policy Institute (EPIC) ताज्या पाहणीत या प्रदूषणाची तीव्रता पुन्हा एकदा लोकांसमोर आली आहे. बांगलादेश, भारत, पाकिस्तान, चीन, इंडोनेशिया आणि नायजेरिया या देशांमधील लोकांचे आयुष्य प्रदूषणामुळे किमान आठ वर्षांनी कमी होत आहे, असा हा अहवाल सांगतो. हे प्रदूषण प्रामुख्याने कशामुळे होते? वाहनांमधून निघणारा धूर आणि इंधनाचे ज्वलन यांमधून ते सर्वाधिक होते. वर उल्लेख केलेल्या देशांमध्येच नव्हे तर जगभरात प्रत्येकाचे आयुष्य साधारणपणे सव्वादोन वर्षांनी कमी होते आहे. म्हणजेच एरवी ते जितके जगू शकले असते त्यापेक्षा सव्वादोन वर्षे आधी ते मृत्युमुखी पडत आहेत. इंग्रजीत ज्याला particulate matter म्हणतात (म्हणजेच PM2.5) त्या घटकांमुळे हे प्रदूषण होते. त्याची व्याख्या पुढीलप्रमाणे होते. – PM2.5 pollution is caused by any liquid or solid particle floating in the air that is 2.5 microns or smaller in diameter, allowing it to bypass the body’s natural de...

विशेष मुलींचे विशेष ‘घरकुल’

  घरकुल’ च्या संकेतस्थळावरील पहिलेच वाक्य या प्रश्नाची भयाणता दर्शवते. कोणत्याही आर्थिक, सामाजिक स्तरातले पती – पत्नी असोत, त्यांना आपले मूल कोण्याही व्यंगाशिवाय, कोणत्याही त्रासाशिवाय जन्माला यावे असे वाटत असते. तसे कोणत्याही आजाराविना ते मूल जन्माला आले की जे समाधान, आनंद मिळत राहते त्याचे शब्दात वर्णन करता येण्यासारखे नसते. ‘घरकुल’चे संकेतस्थळ सांगते की भारतात दोन टक्के लोकसंख्येला हे सुख मिळत नाही. तो आनंद उपभोगता येत नाही. भारताची लोकसंख्या लक्षात घेतली तर ही संख्या किती असेल याची कल्पनाच केलेली बरी.  या  Mental Retardation चे अनेक प्रकार आहेत, अनेक कमी अधिक परिणाम आहेत, हा प्रकार बरा होण्याची शक्यता, ती व्यक्ती त्यातून बऱ्यापैकी सावरण्याची शक्यता अथवा तसे सावरणे शक्य नसेल तर आहे त्या परिस्थितीत त्या व्यक्तीचे (व कुटुंबातील इतरांचेही) जगणे जरा तरी सुसह्य व्हावे यसाठीचे प्रयत्न हा सगळा प्रकार खूप गुंतागुंतीचा आहे. या आजाराच्या लोकाना केवळ सहानुभूती नको असते, हवा असतो तो किमान सन्मानजनक जगण्यासाठी एक मदतीचा हात, योग्य वैद्यकीय आणि कौटुंबिक  मार्गदर्शन. अनेक कुटुंब...

आज Cyber Wellness गरजेचे

  ब र्‍याच सायबर गुन्ह्यांमध्ये ही एक मोठी अडचण असते की आपण बळी पडत असतो किंवा पडणार असतो पण तेंव्हा हे कोणाशीही शेअर करताना आपल्याला संकोच वाटत असतो. अगदी जवळच्या माणसाला सांगणं पण नको वाटू शकतं, रिपोर्ट करणं embarrassing वाटू शकतं किंवा नेमकं काय करायला पाहिजे, ते नीट लक्षात येत नाही. मग अशा वेळी काय करायचं?    CYBER WELLNESS HELPLINE 7353107353 वर कॉल लावायचा किंवा ह्याच WhatsApp नंबर वर मेसेज करायचा, अगदी बिनदिक्कतपणे! ही मोफत सायबर वेलनेस हेल्पलाईन पूर्ण भारतभर, सोमवार ते शनिवार सकाळी ९  ते संध्याकाळी ६  पर्यन्त उपलब्ध असेल.   सायबर सुरक्षा क्षेत्रात गेल्या दहा वर्षांपासून कार्यरत असलेल्या आणि आत्तापर्यंत लाखो मुलांना व महिलांना सायबर सुरक्षा विषयाचे पद्धतशीर प्रशिक्षण देणाऱ्या Responsible Netism ह्या संस्थेनी ही हेल्पलाईन सुरू केली आहे.   इथे फोन केल्यावर आपल्याला कोणीही जज करणार नाही. परिस्थिती हाताळण्यासाठी काय करायला पाहिजे ते सांगून योग्य ती मदत करणार आहेत. जर काउन्सिलिंगची गरज असेल तर तशी व्यवस्था करणार आहेत.   ह्या क्षेत्रातील तज्ज्ञ...

सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे महत्व अधोरेखित

  मुं बईतल्या ताज्या पावसाने दाणादाण उडविल्यावर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे महत्व अधिक अधोरेखित झाले आहे. रेल्वे, मेट्रो, ‘बेस्ट’ बस ही सार्वजनिक वाहतुकीची साधने आणि त्याबरोबर टॅक्सी, रिक्षा ही त्यांना अत्यंत पूरक पण खासगी मालकीची साधने यावर मुंबई ‘धावते’. मुंबईत जरा जास्त पाऊस पडला के त्या पाण्याचा निचरा होत नाही. परिणामी पूरसदृश परिस्थिती निर्माण होते हे आतापर्यंत अनेक वेळा सिद्ध झालेले आहे. नाल्यांची सफाई नीट होत नाही, शहरातला कचरा कमी होत नाही, ड्रेनेज यंत्रणा जुनी झाल्याने प्रश्न निर्माण होतात. यावर नुसती चर्चा होते. पुढच्या वर्षी परत तेच रडगाणे गायले जाते. त्यातच मुंबईला आडवी पसरायला जागा नसल्याने ती ‘उभी’ वाढत आहे. नवनवे तोवर उभे राहात आहेत. मुंबईत पाणी, वीज व इतर मूलभूत सुविधांवरचा ताण कमालीचा वाढत आहे, आणखी वाढणार आहे. अशा स्थितीत मुंबईकरांचे जीवन अधिक त्रासाचे होणार आहे यात शंका नाही. मुंबईत मेट्रो अलीकडच्या काळात आली, तोपर्यंत रेल्वे आणि रिक्षा, टॅक्सी यावरच सर्वसामान्य माणूस विसंबून होता. ज्यांच्याकडे स्वतःच्या गाड्या आहेत त्यांची गर्दी मुंबईला अधिकाधिक घुसमटवून टाकत आह...

आवश्यक असे ‘संगीत पुनर्विकास’

Image
काही वर्षांपासून ‘पुनर्विकास’ हा शब्द मुंबईतच नव्हे तर देशभरातील महानगरांमध्ये खूप महत्वाचा ठरला आहे. मोडकळीस आलेल्या अथवा जुन्या झालेल्या इमारतींचा पुनर्विकास मुंबईत ज्या वेगाने होत आहे ते पाहता जागांचे / घरांचे संपूर्ण चित्र बदलून जाणार आहे. आधीची छोटी घरे आकाराने मोठी होत आहेत. कुटुंबांची सोय होत आहे, पण ज्यांच्याकडे महानगरात घर नाही, त्यांना ते घेणे अधिकाधिक कठीण होणार आहे. कारण नवीन जागांच्या किमती त्यांच्या आवाक्याबाहेर आहेत. बहुतांश नवीन घरांमध्ये कुटुंबे एकत्र आली आणि त्याच वेळी बऱ्याच घरांमध्ये विभागलीही. जागांच्या किमतीमुळे कुटुंबात वाद झाले, भाऊ भाऊ एकमेकांविरुद्ध उभे राहिले. अनेक कुटुंबांची वाताहत झाली. गृहनिर्माण सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांची विश्वसार्हता धोक्यात येण्याचे प्रकार घडले. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. त्यांनी पुनर्विकासात काही विशिष्ट लोकांना झुकते माप दिले आणि इतर लोकांना ते बघत राहण्याशिवाय पर्याय नव्हता. शेवटी आपण बरे की आपले घर बरे असे ठरवून गप्प बसावे लागले, असेही प्रकार घडले. विकासक नावाच्या व्यक्तीचा आणि त्याच्या पाठीशी असणाऱ्या प्रचंड मोठ्याआर...

अमेरिकेच्या बे एरियात निघाली वारी

Image
  आपण केवळ पायाने चालतो तो प्रवास होतो हृदयाने चालतो ती यात्रा होते पण देहभान हरपून जेव्हा चालतो तेव्हा ती होते वारी। दरवर्षी वारकऱ्यांनी सामुदायिकरित्या आषाढी एकादशीच्या आधी आळंदी ते पंढरपूर अशी केलेली पदयात्रा म्हणजे वारी. वारी महाराष्ट्राचे धार्मिक, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वैभव आहे. वारकर्‍यांची माऊलीवर असलेली अतूट भक्ती, अमाप श्रद्धा आणि त्याच्या दर्शनासी केलेला दृढ निर्धार, चिकाटी, अथक परिश्रम, ऊन – पाऊस – वारा यांची तमा न बाळगता अविरत पायी वाटचाल करण्याची सिद्धता. आषाढी वारीचे आपणा सर्वांनाच नेहमी कुतुहल असते. कसे हे वारकरी उन्हातान्हात एवढे मैलोनमैल चालत असतील? कुठे राहात असतील? काय खात असतील? आणि मग जशा वारीच्या बातम्या यायला लागतात तसे आपणही एकदातरी हा अनुभव नक्की घ्यावा ही सुप्त इच्छाही मनात जागी होते. अमेरिकेतील बे एरियातील काही  मंडळी ह्या वर्षी पंढरपूरच्या वारीला निघणार होती. त्यानिमित्त झालेल्या एका कार्यक्रमातच प्रथमच बे एरिया मधे होणाऱ्या वारीची बीजं रुजली.  MMBA   चे अध्यक्ष  भास्कर रानडे  आणि  वीणाताई उत्तरवार  ह्यांना ही कल्पन...