Posts

विशेष मुलींचे विशेष ‘घरकुल’

  घरकुल’ च्या संकेतस्थळावरील पहिलेच वाक्य या प्रश्नाची भयाणता दर्शवते. कोणत्याही आर्थिक, सामाजिक स्तरातले पती – पत्नी असोत, त्यांना आपले मूल कोण्याही व्यंगाशिवाय, कोणत्याही त्रासाशिवाय जन्माला यावे असे वाटत असते. तसे कोणत्याही आजाराविना ते मूल जन्माला आले की जे समाधान, आनंद मिळत राहते त्याचे शब्दात वर्णन करता येण्यासारखे नसते. ‘घरकुल’चे संकेतस्थळ सांगते की भारतात दोन टक्के लोकसंख्येला हे सुख मिळत नाही. तो आनंद उपभोगता येत नाही. भारताची लोकसंख्या लक्षात घेतली तर ही संख्या किती असेल याची कल्पनाच केलेली बरी.  या  Mental Retardation चे अनेक प्रकार आहेत, अनेक कमी अधिक परिणाम आहेत, हा प्रकार बरा होण्याची शक्यता, ती व्यक्ती त्यातून बऱ्यापैकी सावरण्याची शक्यता अथवा तसे सावरणे शक्य नसेल तर आहे त्या परिस्थितीत त्या व्यक्तीचे (व कुटुंबातील इतरांचेही) जगणे जरा तरी सुसह्य व्हावे यसाठीचे प्रयत्न हा सगळा प्रकार खूप गुंतागुंतीचा आहे. या आजाराच्या लोकाना केवळ सहानुभूती नको असते, हवा असतो तो किमान सन्मानजनक जगण्यासाठी एक मदतीचा हात, योग्य वैद्यकीय आणि कौटुंबिक  मार्गदर्शन. अनेक कुटुंब...

आज Cyber Wellness गरजेचे

  ब र्‍याच सायबर गुन्ह्यांमध्ये ही एक मोठी अडचण असते की आपण बळी पडत असतो किंवा पडणार असतो पण तेंव्हा हे कोणाशीही शेअर करताना आपल्याला संकोच वाटत असतो. अगदी जवळच्या माणसाला सांगणं पण नको वाटू शकतं, रिपोर्ट करणं embarrassing वाटू शकतं किंवा नेमकं काय करायला पाहिजे, ते नीट लक्षात येत नाही. मग अशा वेळी काय करायचं?    CYBER WELLNESS HELPLINE 7353107353 वर कॉल लावायचा किंवा ह्याच WhatsApp नंबर वर मेसेज करायचा, अगदी बिनदिक्कतपणे! ही मोफत सायबर वेलनेस हेल्पलाईन पूर्ण भारतभर, सोमवार ते शनिवार सकाळी ९  ते संध्याकाळी ६  पर्यन्त उपलब्ध असेल.   सायबर सुरक्षा क्षेत्रात गेल्या दहा वर्षांपासून कार्यरत असलेल्या आणि आत्तापर्यंत लाखो मुलांना व महिलांना सायबर सुरक्षा विषयाचे पद्धतशीर प्रशिक्षण देणाऱ्या Responsible Netism ह्या संस्थेनी ही हेल्पलाईन सुरू केली आहे.   इथे फोन केल्यावर आपल्याला कोणीही जज करणार नाही. परिस्थिती हाताळण्यासाठी काय करायला पाहिजे ते सांगून योग्य ती मदत करणार आहेत. जर काउन्सिलिंगची गरज असेल तर तशी व्यवस्था करणार आहेत.   ह्या क्षेत्रातील तज्ज्ञ...

सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे महत्व अधोरेखित

  मुं बईतल्या ताज्या पावसाने दाणादाण उडविल्यावर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे महत्व अधिक अधोरेखित झाले आहे. रेल्वे, मेट्रो, ‘बेस्ट’ बस ही सार्वजनिक वाहतुकीची साधने आणि त्याबरोबर टॅक्सी, रिक्षा ही त्यांना अत्यंत पूरक पण खासगी मालकीची साधने यावर मुंबई ‘धावते’. मुंबईत जरा जास्त पाऊस पडला के त्या पाण्याचा निचरा होत नाही. परिणामी पूरसदृश परिस्थिती निर्माण होते हे आतापर्यंत अनेक वेळा सिद्ध झालेले आहे. नाल्यांची सफाई नीट होत नाही, शहरातला कचरा कमी होत नाही, ड्रेनेज यंत्रणा जुनी झाल्याने प्रश्न निर्माण होतात. यावर नुसती चर्चा होते. पुढच्या वर्षी परत तेच रडगाणे गायले जाते. त्यातच मुंबईला आडवी पसरायला जागा नसल्याने ती ‘उभी’ वाढत आहे. नवनवे तोवर उभे राहात आहेत. मुंबईत पाणी, वीज व इतर मूलभूत सुविधांवरचा ताण कमालीचा वाढत आहे, आणखी वाढणार आहे. अशा स्थितीत मुंबईकरांचे जीवन अधिक त्रासाचे होणार आहे यात शंका नाही. मुंबईत मेट्रो अलीकडच्या काळात आली, तोपर्यंत रेल्वे आणि रिक्षा, टॅक्सी यावरच सर्वसामान्य माणूस विसंबून होता. ज्यांच्याकडे स्वतःच्या गाड्या आहेत त्यांची गर्दी मुंबईला अधिकाधिक घुसमटवून टाकत आह...

आवश्यक असे ‘संगीत पुनर्विकास’

Image
काही वर्षांपासून ‘पुनर्विकास’ हा शब्द मुंबईतच नव्हे तर देशभरातील महानगरांमध्ये खूप महत्वाचा ठरला आहे. मोडकळीस आलेल्या अथवा जुन्या झालेल्या इमारतींचा पुनर्विकास मुंबईत ज्या वेगाने होत आहे ते पाहता जागांचे / घरांचे संपूर्ण चित्र बदलून जाणार आहे. आधीची छोटी घरे आकाराने मोठी होत आहेत. कुटुंबांची सोय होत आहे, पण ज्यांच्याकडे महानगरात घर नाही, त्यांना ते घेणे अधिकाधिक कठीण होणार आहे. कारण नवीन जागांच्या किमती त्यांच्या आवाक्याबाहेर आहेत. बहुतांश नवीन घरांमध्ये कुटुंबे एकत्र आली आणि त्याच वेळी बऱ्याच घरांमध्ये विभागलीही. जागांच्या किमतीमुळे कुटुंबात वाद झाले, भाऊ भाऊ एकमेकांविरुद्ध उभे राहिले. अनेक कुटुंबांची वाताहत झाली. गृहनिर्माण सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांची विश्वसार्हता धोक्यात येण्याचे प्रकार घडले. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. त्यांनी पुनर्विकासात काही विशिष्ट लोकांना झुकते माप दिले आणि इतर लोकांना ते बघत राहण्याशिवाय पर्याय नव्हता. शेवटी आपण बरे की आपले घर बरे असे ठरवून गप्प बसावे लागले, असेही प्रकार घडले. विकासक नावाच्या व्यक्तीचा आणि त्याच्या पाठीशी असणाऱ्या प्रचंड मोठ्याआर...

अमेरिकेच्या बे एरियात निघाली वारी

Image
  आपण केवळ पायाने चालतो तो प्रवास होतो हृदयाने चालतो ती यात्रा होते पण देहभान हरपून जेव्हा चालतो तेव्हा ती होते वारी। दरवर्षी वारकऱ्यांनी सामुदायिकरित्या आषाढी एकादशीच्या आधी आळंदी ते पंढरपूर अशी केलेली पदयात्रा म्हणजे वारी. वारी महाराष्ट्राचे धार्मिक, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वैभव आहे. वारकर्‍यांची माऊलीवर असलेली अतूट भक्ती, अमाप श्रद्धा आणि त्याच्या दर्शनासी केलेला दृढ निर्धार, चिकाटी, अथक परिश्रम, ऊन – पाऊस – वारा यांची तमा न बाळगता अविरत पायी वाटचाल करण्याची सिद्धता. आषाढी वारीचे आपणा सर्वांनाच नेहमी कुतुहल असते. कसे हे वारकरी उन्हातान्हात एवढे मैलोनमैल चालत असतील? कुठे राहात असतील? काय खात असतील? आणि मग जशा वारीच्या बातम्या यायला लागतात तसे आपणही एकदातरी हा अनुभव नक्की घ्यावा ही सुप्त इच्छाही मनात जागी होते. अमेरिकेतील बे एरियातील काही  मंडळी ह्या वर्षी पंढरपूरच्या वारीला निघणार होती. त्यानिमित्त झालेल्या एका कार्यक्रमातच प्रथमच बे एरिया मधे होणाऱ्या वारीची बीजं रुजली.  MMBA   चे अध्यक्ष  भास्कर रानडे  आणि  वीणाताई उत्तरवार  ह्यांना ही कल्पन...

राजकीय नाती दुरावत चालली …

  अजितदादा पवार आज ना उद्या धाडसी पाऊल उचलणार हे गेल्या काही महिन्यांच्या त्यांच्या हालचालींवरून दिसत होते. ते त्यांनी दोन जुलै २०२३ रोजी उचलले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आठ आमदारांसह त्यांचा शपथविधी झाला तेव्हा डबल इंजिन सरकारला आणखी एक इंजिन मिळाले. आता यात कोणत्या इंजिनची ‘पॉवर’ जास्त, कोणाची कमी हा प्रश्न या घडीला बिनबुडाचा आहे. एकनाथ शिंदे यांची शिवसेना, देवेंद्र फडणवीस यांचा भारतीय जनता पक्ष आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष हे तिघे एकत्रितपणे महाराष्ट्राचा विकास खूपच वेगाने करणार आहेत, हे बघून राज्यातील मतदार पावसाने सुखावतो तसा सुखावला आहे असे काही जणांना वाटायला लागले आहे, असे दिसते. शरद पवार यांनी आता वयाच्या ८३ व्या वर्षी पुन्हा मैदानात उतरून नव्याने पक्षबांधणी करण्याचा निर्धार केला आहे. त्याचवेळी अजितदादांच्या ‘मी राष्ट्रवादी पक्षातच आहे’, या दाव्यावर कोणताही न्यायालयीन लढा न देण्याचा निर्णयही घेतला आहे. या सगळ्यात खरी अडचण आहे ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आणि त्यांच्यावर विसंबून मूळ शिवसेना सोडून नव्या राजकीय समझोत्यात सामील झालेल्या आमदारांची. उद्या त्यांन...

कर्करोगावर मात करताना…

  क र्करोग अथवा अन्य कोणताही गंभीर आजार झाला तर आधीच शारीरिक व्याधीने त्रस्त झालेला रुग्ण मानसिकदृष्ट्या खचण्याची शक्यता असते. अशा वेळेस डॉक्टर, कुटुंब, मित्रमंडळी यांचा पाठिंबा फार आवश्यक असतो. तो मिळाला तर रुग्ण  अर्धा बरा होतो. अशा आजारात होणारा खर्च हा अवाढव्य असतो आणि जीवाची शाश्वती नसतानाही बँक खाते रिकामे करणारा असतो. त्यामुळे येणारे ताणतणाव आजारात भरच घालत असतात. वैद्यकीय विमा घेतला असला तरी तो पुरतो असे नाही. त्यामुळे आज समाजात बहुतांश लोकांना आजार झाल्यावर आर्थिक समस्या भेडसावत असल्याने पुरेसे व आवश्यक उपचार घेता येत नाहीत. परिणामी आजार कायम राहतो किंवा कदाचित त्यांना जीवही गमवावा लागतो. ती व्यक्ती घरातील कमावणारी एकमेव व्यक्ती असली तर कुटुंबाचे हाल होतात ते वेगळेच. मध्यंतरी ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये डॉ. सुलोचना गवांदे यांनी कर्करोग, त्याबाबतचे समज -गैरसमज, उपचार, कर्करोगातून बाहेर आलेल्या रुग्णांचे अनुभव सांगणारी लेखमालिका लिहिली होती. ती बऱ्याच वाचकांनी वाचल्याने समाजात जागृतीचे चांगले काम झाले. त्या लेखांचे नंतर ‘पॉप्युलर प्रकाशन’ने पुस्तक काढले. आता त्याचे इंग्रजी...

श्वासविज्ञान सोप्या शब्दांत ..

  प्र त्येक सजीव प्राण्यामध्ये सर्वात महत्वाचा घटक कोणता? त्याचा श्वास ! श्वास चालू आहे तोपर्यंत शरीराला अर्थ आहे. अन्यथा निर्जीव शरीराला काहीही अर्थ नाही. शरीरातील प्रत्येक अवयवावर उपचार करणारे डॉक्टर आहेत, रुग्णालये आहेत. श्वास हा शरीराचा अवयव नाही, तरीही सर्वात महत्वाचा आहे. अशा श्वासाबद्दल जेवढा विचार व्हायला हवा तेवढा होत नाही. किंबहुना या ‘आपोआप’ चालणाऱ्या प्रक्रियेकडे आपले लक्षच जात नाही. एकदम आजारी पडलो अथवा (कोविडसारख्या) आजारात श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला तर याकडे आपले लक्ष जाते. नाहीतर नाकाने घ्या अथवा तोंडाने घ्या श्वास तो श्वासच, त्यात काय, असा विचार आपण करतो. खूप सर्दी झाल्यावर नाक चोंदते तेव्हा आपोआप तोंडाने श्वास घेतला जातो हे खरे असले तरी तोंडाने श्वास घेणे हे काही खरे नाही. श्वास या विषयावर सखोल अभ्यास करावा, शेकडो डॉक्टरना / विविध क्षेत्रातील लोकांना भेटून माहिती गोळा करावी आणि हा अभ्यास पुस्तकरूपाने लोकांसमोर आणावा हे काम पत्रकार जेम्स नेस्टर यांनी केले. किमान दहा वर्षे त्याचा पूर्ण अभ्यास त्यांनी केला. त्यातूनच ‘Breath  – The New  science  ...