पोस्ट्स

... ...आणि अमेरिका जागी झाली !

इमेज
अमेरिकेत सध्या काही भागात तापमान कमालीचे वाढत आहे. अनेक ठिकाणी वणवे पेटले आहेत. त्यावर कसे नियंत्रण ठेवायचे हे कळत नाहीये. अनेकांची घरे त्यात उध्वस्त झाली, वनजमीन तर पार जाळून खाक झाली.  कॅलिफोर्निया पार्क भागात  सध्या साडेतीन लाख एकरमध्ये हा वणवा पसरलेला आहे. अतिउष्णतेमुळे अमेरिकेत असे वणवे पेटणे ही आता बातमी राहिलेली नाही. बदलत्या हवामानामुळे होणारे हे दुष्परिणाम याच नव्हे तर अन्य देशांनाही कुठे घेऊन जाणार आहेत हा अत्यंत काळजीचा विषय आहे. या वणव्यांबरोबरच अमेरिकेत सध्या चर्चा आहे ती या वणव्यासारख्या पसरलेल्या बातमीची. सध्याचे जग 'सतत ऑनलाईन' असण्याचे जग आहे. त्यामुळे जगाच्या कानाकोपऱ्यात जरा कुठे खुट्ट झाले की सगळ्यांना कळायला वेळ लागत नाही. आणि मी जी बातमी म्हणतो आहे ती तर जो बायडेन यांनी अध्यक्षपदाच्या शर्यतीतून माघार घेण्याची. अमेरिका शनिवार - रविवार काम करत नाही. सगळे सुटीच्या मूडमध्ये असतात. त्यातही रविवारी दुपारी बातम्या बघितल्या जातीलच असे नाही. बायडेन यांनी माघारीची घोषणा करण्यासाठी हीच वेळ निवडली आणि सगळे जण 'जागे' झाले. पुढच्या तीनपाच मिनिटात ही बातमी अमेरिक

त्या दोघांमधला 'दुवा'

इमेज
  महाराष्ट्रात अनेक सामाजिक संस्था विविध स्तरांवर काम करत आहेत. समाजाचे भले व्हावे यासाठी समविचारी लोकांच्या मदतीने चांगल्या कामाचे जाळे उभारत आहेत. पुण्यातील 'दुवा' ही अशीच एक संस्था. तिच्या कामाचा हा परिचय. अधिकाधिक लोक त्यात सहभागी होतील आणि हा 'दुवा' बळकट करतील अशी अपेक्षा आहे.            जगात अनादि काळापासून ‘आहे रे’ आणि ‘नाही रे’ असा भेद दिसून येतो. माणूस जसा सुसंस्कृत व्हायला लागला तसं त्याला ही दरी जाणवायला लागली आणि त्यातून या २ वर्गांना जोडण्याचे प्रयत्न सुरू झाले. पुण्यात काम करणारी ‘दुवा’ नावाची एक संस्थाही याच दृष्टीकोनातून निर्माण झाली.           ‘आहे रे’ गटाकडे संसाधनांची विपुलता असते तर ‘नाही रे’ गट किमान गरजा पुरवण्यासाठी धडपडत असतो. त्यातून दुवा संस्थेच्या संचालिका अर्चना गोगटे यांना असं वाटून गेलं की जिथे आहे तिथून, जिथे नाही तिथे जाण्यासाठी एखादा ‘दुवा’ साधता येईल का? सधन घरातली वापरण्यायोग्य अशी भांडी, कपडे, खेळणी, पुस्तकं ज्यांना पाहिजे आहे त्यांच्यापर्यंत पोचवता येतील का? आहे रे गटालाही अशा स्वरूपाचे समाजाचे देणे देण्याची इच्छा असते पण वैयक्तिक स्

कमला हॅरिस याना निधी मिळाला, मतांचे काय?

इमेज
  अमेरिकेचे सध्याचे अध्यक्ष जो बायडेन यांनी आणखी  चार महिन्यांनी होणाऱ्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेऊन आता २४ तास उलटून गेले आहेत. माघार घेतानाच त्यांनी डेमोक्रॅटिक पक्षाच्या नवीन उमेदवार म्हणून सध्याच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस यांना पाठिंबा दिला. अर्थात म्हणून त्या आपोआप उमेदवार झाल्या नाहीत. ऑगस्ट महिन्यात डेमोक्रॅटिक पक्षाचे अधिवेशन आहे. त्यावेळी पक्षाच्या उमेदवाराची निवड अधिकृतपणे जाहीर होईल. परंतु, गेल्या २४ तासात कमला हॅरिस यांनी निधी संकलनाचा विक्रम नोंदवला आहे. २४ तासांत लहानमोठ्या देणगीदारांनी त्यांना आठ कोटी डॉलर्सपेक्षा अधिक रकमेच्या देणग्या दिल्या आहेत. यात आतापर्यंत या पक्षाला अजिबात देणगी न देणाऱ्यांचाही समावेश आहे हे लक्षात घ्यायला हवे.  कमला हॅरिस याना आतापर्यंत ११०० डेमोक्रॅटिक प्रतिनिधींनी पाठिंबा दिला आहे. म्हणजे अर्धी लढाई त्यांनी जिंकली आहे. पुढचा टप्पा उमेदवारी मिळविण्यापुरता तरी सोपा वाटतो आहे.  हॅरिस यांनी २०२० मध्येच पक्षाच्या उमेदवारीसाठी प्रयत्न केले होते. ते अयशस्वी झाले. पण या निमित्ताने त्या देशभर फिरल्या. अमेरिकन लोकांना त्यांची ओळख झाली. त्यांची ए

मनोरंजन नव्हे, प्रबोधन !

इमेज
मुं बईतील लोकल रेल्वे सेवा ही बहुसंख्य लोकांसाठी अत्यावश्यक सेवा आहे. मुंबईत राहणाऱ्या आणि पुढे अगदी कर्जत, कसारा, पश्चिम रेल्वेवर पालघरपर्यंत राहणारे लोक पोट भरण्यासाठी मुंबईत येताना प्रामुख्याने या लोकलचा वापर करतात. मेट्रोचे जाळे वाढत असले तरी ते अजून सर्वसमावेशक झालेले नाही. अन्य सार्वजनिक वाहतूक सेवा म्हणाव्या अशा प्रभावी नाहीत. अशा वेळेस लोकलशिवाय पर्यायच नसतो. दिवसेंदिवस वाढणारी गर्दी, त्यांना अपुऱ्या पडणाऱ्या गाड्या, अतिताणामुळे यंत्रणेचे वारंवार कोलमडणे यासारख्या अडचणींवर मात करून सर्व प्रवासी प्रवास करत असतात. प्रवासाचा कालावधी कमी असेल तर भाग वेगळा, परंतु जास्त असेल तर अडचणीही जास्त. गाडीत शिरायला मिळाले तर भाग्य असे म्हणायची पाळी काही वेळेस येते. अशा गर्दीत डब्यात शिरून भजनांमध्ये दंग व्हायचे आणि नकळत इतरांनाही सहभागी करून घ्यायचे हे तसे दिव्य काम. बरे, सगळ्यांनाच ती भजने ‘आवडतील’ अशातला भाग नाही. अनेक जण घरगुती कारणांमुळे, कार्यालयीन कामाच्या तणावामुळे, आर्थिक परिस्थितीमुळे त्रासलेले असतात. अशा वेळेस त्यांना डब्यातून प्रवास करताना शांतता हवी असते. त्यामुळे ती मंडळी या भजना

स्वतःचे वेगळे विश्व निर्माण करणारा कलाकार !

इमेज
आ षाढी एकादशी आली की ‘महाराष्ट्र टाइम्स’चे वाचक त्या दिवशीच्या अंकाची वाट बघतात. बातम्यांसाठी नव्हे तर गेली काही वर्षे दोन पाने भरतील इतक्या आकाराचे (आमच्या भाषेत ‘पॅनो ‘) विठ्ठल राखुमाईचे अप्रतिम चित्र पाहायला. कोणतेही वर्तमानपत्र घरात आल्यावर अर्ध्या दिवसांत ‘शिळे’ होते हे खरे असले तरी विठ्ठल राखुमाईचे अप्रतिम चित्र जपून ठेवणारे असंख्य वाचक आहेत हे लक्षात घ्यायला हवे. हे चित्र काढणारा कलाकार आज अवघ्या महाराष्ट्रात / देशात प्रसिद्ध आहे. त्याचे नाव रोहन पोरे. विठ्ठल रखुमाईचे ‘पॅनोरमा’  चित्र अनेकजण घरी फ्रेम करून लावतात. काहीजण तर रेल्वे डब्यात हे चित्र लावून विठ्ठल रखुमाईची पूजा करतात. अलीकडेच ‘महाराष्ट्र टाइम्स’ने मायमराठी उत्सव मराठीचा’ या नावाने महोत्सव आयोजित केला होता. त्यात रोहनचा विशेष सहभाग होता. मटामध्ये प्रकाशित झालेल्या निवडक ४० व्यक्तिचित्रांचे प्रदर्शन मुंबईत टाइम्स इमारतीत भारावले होते. त्यावेळी मान्यवरांकडून रोहनचे कौतुक झाले होते. त्याचप्रमाणे वाचकांनीही भरभरून प्रतिसाद दिला होता. रोहनने काढलेले  २०२४चे चित्र मुद्दाम इथे देत आहे. रोजच्या अंकात, रविवार पुरवणीत आणि दिवाळ

पर्यटन महत्वाचे, पण …

इमेज
  भा रत हा निसर्गसौंदर्याने नटलेला देश आहे. परदेशातील रम्य ठिकाणे बघायच्या आधी संपूर्ण भारत बघितला तरी परदेशाचे आकर्षण कमी होईल अशी स्थिती आहे. ‘फोर्ब्स’ मासिकाने जगातील सर्वात सुंदर देशांची निवड जाहीर केली होती. त्यात पन्नास देशांमध्ये भारत सातव्या स्थानावर होता. The World Travel and Tourism Council या संस्थेने जाहीर केल्याप्रमाणे २०२१ मध्ये पर्यटन व्यवसायामुळे १३.२ लाख कोटी इतकी प्रचंड रक्कम उभी राहिली. ही रक्कम भारताच्या ठोकळ राष्ट्रीय उत्पन्नाच्या ५.८ टक्के आहे. या व्यवसायामुळे सव्वा तीन कोटी लोकांना रोजगार मिळाला. आता हे सारे आकडे आणखी वाढले असतील. साधारण तीन वर्षांपूर्वी सुमारे ६२ लाख परदेशी पर्यटकांनी भारताला पर्यटनासाठी पसंती दिली होती. . गेल्या तीन वर्षांत हाही आकडा वाढलेला असेल हे निश्चित. भारतात भारतीय लोकांकडून होणाऱ्या पर्यटनाचे आकडे मिळाले तर यावर अधिक प्रकाश पडेल. लहानमोठ्या ट्रॅव्हल कंपन्या पर्यटकांना विविध ठिकाणी नेट असतातच, परंतु त्यांचा आधार न घेता, त्यांच्या चौकटीत न अडकता स्वतःचे नियोजन स्वतःच करून फिरायला जाणाऱ्यांचीही संख्या लक्षणीय आहे. थोडक्यात, पर्यटन हा विषय

समाजमाध्यमांवरचा वैधानिक इशारा काय कामाचा ?

इमेज
  स माजमाध्यमांचा अतिवापर ही बाब फक्त भारतापुरती काळजीची बाब उरलेली नाही. ती समस्या जगभरची आहे. अगदी लहान वयापासून मुलांचे या समाजमाध्यमांच्या आहारी जाणे त्यांच्या मानसिक / शारीरिक / सामाजिक वाढीसाठी हानिकारक ठरत आहे, हे अनेक वेळा सिद्ध झाले आहे. मुले समाजमाध्यमांपासून दूर राहावीत म्हणून आधी पालकांनी प्रयत्न करायला हवेत. परंतु तेच मुलांच्या हाती फार लवकर मोबाईल सोपवत असल्याचे बघायला मिळते. मोबाईल अथवा समाजमाध्यमे आजच्या काळात पूर्णतः बाजूला करता येणार नाहीत हे खरे असले तरी त्याचा अतिवापर धोक्याचा ठरत आहे हे दिसतेच आहे. अमेरिकेच्या सर्जन जनरल यांनी वर्षभरापूर्वी जाहीर इशारा दिला होता आणि मुलांकडून समाजमाध्यमांचा अतिवापर होणार नाही याची काळजी घेण्यास सांगितले होते. परंतु परिस्थिती सुधारली नाहीच. आता सर्जन जनरल डॉ विवेक मूर्ती यांनी सोमवारी अमेरिकेच्या न्यू यॉर्क टाइम्समध्ये एक लेख लिहून पुन्हा जाहीर इशारा दिला आहे. आता या संदर्भातली आणीबाणीची परिस्थिती आहे, असे त्यांनी म्हटले आहे. तरुण मुलांचे मानसिक आरोग्य वेळीच सुधारा असे सांगताना समाजमाध्यमांवर ठळकपणे (सिगारेटच्या पाकिटावर असतो तसा) व