... ...आणि अमेरिका जागी झाली !
अमेरिकेत सध्या काही भागात तापमान कमालीचे वाढत आहे. अनेक ठिकाणी वणवे पेटले आहेत. त्यावर कसे नियंत्रण ठेवायचे हे कळत नाहीये. अनेकांची घरे त्यात उध्वस्त झाली, वनजमीन तर पार जाळून खाक झाली. कॅलिफोर्निया पार्क भागात सध्या साडेतीन लाख एकरमध्ये हा वणवा पसरलेला आहे. अतिउष्णतेमुळे अमेरिकेत असे वणवे पेटणे ही आता बातमी राहिलेली नाही. बदलत्या हवामानामुळे होणारे हे दुष्परिणाम याच नव्हे तर अन्य देशांनाही कुठे घेऊन जाणार आहेत हा अत्यंत काळजीचा विषय आहे. या वणव्यांबरोबरच अमेरिकेत सध्या चर्चा आहे ती या वणव्यासारख्या पसरलेल्या बातमीची. सध्याचे जग 'सतत ऑनलाईन' असण्याचे जग आहे. त्यामुळे जगाच्या कानाकोपऱ्यात जरा कुठे खुट्ट झाले की सगळ्यांना कळायला वेळ लागत नाही. आणि मी जी बातमी म्हणतो आहे ती तर जो बायडेन यांनी अध्यक्षपदाच्या शर्यतीतून माघार घेण्याची. अमेरिका शनिवार - रविवार काम करत नाही. सगळे सुटीच्या मूडमध्ये असतात. त्यातही रविवारी दुपारी बातम्या बघितल्या जातीलच असे नाही. बायडेन यांनी माघारीची घोषणा करण्यासाठी हीच वेळ निवडली आणि सगळे जण 'जागे' झाले. पुढच्या तीनपाच मिनिटात ही बातमी अमेरिक