Posts

कशासाठी .. भाषा आणि संस्कृतीसाठी !

  आ पल्याकडे मराठी भाषेचे काय होणार, त्यावर झालेल्या इंग्रजी भाषेच्या अतिक्रमणामुळे काय होणार, मुलांना मातृभाषेतून शिक्षण न मिळाल्यास त्यांच्यावर किती विपरीत परिणाम होतील वगैरेवर बरीच चर्चा होते. आजही काही पालक जाणूनबुजून मुलांना मराठी माध्यमांत शिकण्यासाठी पाठवतात. त्याचवेळी त्यांचे इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व कमी होणार नाही याचीही काळजी घेतात. भविष्यकाळात मराठी भाषा टिकेल का यावर आजही चर्चा होतात. जगभरातील बाकीच्या भाषा सुरक्षित आहेत आणि फक्त माराही भाषेवर गंडांतर आले आहे असे अजिबात नाही. या संदर्भात काल वाचलेली बातमी महत्वाची वाटली. ती आहे इटलीमधील. त्या देशाने चॅट जीपीटीवर बंदी घातली या बातमीपेक्षाही महत्वाची ! इटालियन भाषेवर इंग्रजी आणि इतर परकीय भाषांचे अतिक्रमण होत आहे., त्यामुळे इटालियन भाषेला धोका निर्माण झाला आहे. जनतेने आणि खासगी संस्थांनी पत्रव्यवहार करताना परकीय भाषा किंवा प्रामुख्याने इंग्रजी शब्दांचा वापर केल्यास सरकार त्यांना भलभक्कम दंड करण्याच्या विचारात आहे. पंतप्रधान मेलॉनी यांच्या पक्षाने तास प्रस्ताव तयार केला आहे. हा दंड एक लाख युरो किंवा १०८७५० डॉलर्स इतका असू...

राजकारण महत्वाचे की लोकांचे प्रश्न ?

  स माजमाध्यमांचा अतिरेक व्हायला लागल्यापासून बातम्यांचे / पत्रकारितेचे जग पार घुसळून निघाले आहे. कोणती बातमी खरी, कोणती खोटी हे कळायला मार्गच उरत नाही. टीव्ही वृत्तवाहिन्या अगदी दोनचार वर्षांपूर्वीपर्यंत ज्या संयत पद्धतीने काम करत होत्या त्याही आता भरकटत चालल्या आहेत असे वाटत आहे . नुकताच हर्षदा स्वकुळ यांच्या एका व्हिडिओमध्ये ‘कोणास काय म्हणाले जर्नालिझम’ असा शब्दप्रयोग ऐकला आणि तंतोतंत पटला. आधी इंग्रजी व हिंदी वृत्तवाहिन्या या राजकारण आणि राजकारण्यांच्या आहारी गेल्या होत्या , आता मराठी वृत्तवाहिन्याही त्याच मार्गाने चालल्या आहेत. महाराष्ट्रातले राजकारण एवढ्या खालच्या पातळीवर गेले आहे की काल एका कार्यक्रमात बोलताना राज ठाकरे यांनी जी प्रतिक्रिया दिली होती, ती सामान्य माणसाची प्रतिक्रिया असू शकते. ते म्हणाले होते, ”आताचे महाराष्ट्राचे राजकारण बघता, त्यात मी मिसफिट आहे, असे वाटते. आजच्यासारखी महाराष्ट्राची परिस्थिती मी कधीच पाहिली नाही. त्यामुळे या सगळ्याचा वीट आला आहे. ज्या महाराष्ट्राने देशाचे प्रबोधन केले, त्यावर ही वेळ आली आहे. राज्यात २० वर्षांपूर्वी निकोप राजकारण होते. आता ज...

उत्तम माणसाचा सन्मान !

Image
  This is the story of of a tribal village Dahe which is 100 km from Mumbai. The village never  people used to defecate in open. NGO Keshvshrushti helping them to live life with dignity. I approached the Dawoodi Bohra community to build toilets for the village. Accepting my request, they built 11 toilets to make the village open defecation free. Happy that the present and future generations in Dahe village will hopefully live a healthy and happy life. ज्येष्ठ पोलिस अधिकारी एसीपी अविनाश धर्माधिकारी यांची ही ताजी ट्विटर पोस्ट. हे काम करणे कोणा पोलिस अधिकाऱ्याचे काम आहे का असा प्रश्न सकृतदर्शनी पडू शकेल. परंतु रोजच्या धकाधकीच्या कामाबरोबरच अशी समाजोपयोगी कामे करणे हा अविनाश यांचा स्वभावधर्म आहे हे त्यांना ओळखणाऱ्या प्रत्येकाला माहीत आहे. त्यांची ओळख झाली ती पु. ल. देशपांडे यांचे पुतणे जयंत देशपांडे यांच्यामुळे. मुंबईत कालिना विभागाचे एसीपी असताना अविनाश धर्माधिकारी याना २७ फेब्रुवारीला मराठी भाषा दिनानिमित्त विलेपार्ले उपनगरात एक कार्यक्रम करायचा होता. त्या निमित्ताने निमंत्रण दे...

आरोग्य अधिक जपायला हवे !

Image
  को णत्याही अर्थसंकल्पाने प्रत्येकाचे समाधान होणे अशक्य असते हे एकदा समजून घेतले की राज्याच्या आणि देशाच्या अर्थसंकल्पाकडे पाहणे सोपे जाते. अर्थसंकल्प तयार करताना अर्थमंत्री / मुख्यमंत्र्याना पूर्ण राज्याचा विचार करावा लागतो. म्हणूनच प्रत्येक घटकाकडे पुरेसे लक्ष देणे शक्य नसते. असे असले तरी काही बाबी खटकतातच. शुक्रवारी महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. त्यानंतर आलेल्या प्रतिक्रियाही अशाच प्रकारच्या होत्या. अर्थसंकल्पात कायकाय योजना आहेत, त्यासाठी किती खर्च होणार आहे हे अर्थमंत्र्यांनी सांगितले असले तरी आधीच्या योजनांवरील अंमलबजावणी आणि झालेला कमी /जास्त खर्च याचाही आढावा सविस्तरपणे हवा होता. [caption id="attachment_3432" align="alignright" width="1448"] चित्र - सुमंत बिवलकर[/caption] ज्या विभागाबाबत अधिक चर्चा व्हायला हवी, तो विभाग म्हणजे आरोग्य विभाग. कोरोना आल्यावर आपल्या वैद्यकीय क्षेत्रातील त्रुटी अधिक ठळकपणे दिसल्या. प्रमुख शहरांमधील निवडक खासगी आणि सरकारी रुग्णालये कोरोनाशी दोन हात करण्यासाठी काहीशी सज्ज हो...

ऐतिहासिक निकाल

Image
  अखेर पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले. उत्तर प्रदेश, पंजाब, मणिपूर, उत्तराखंड, गोवा या राज्यांच्या निवडणुकांकडे २०२४च्या लोकसभा निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून पाहिले जात होते. यात पंजाब सोडून बाकी सर्व राज्ये भारतीय जनता पक्षाने जिंकली आहेत. अजून अंतिम आकडेवारी आली नसली तरी उत्तर प्रदेशात  भाजपने जवळपास ५० जागा  गमावल्या आहेत. पंजाबमध्ये भाजपला आधी तीनच जागा होत्या, त्यातली एक कमी झाली आहे. शेतकरी आंदोलनामुळे पंजाबमध्ये भाजपला यश मिळणे मुळातच कठीण हते. पंतप्रधानांनी पंजाबची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून शेतकऱ्यांनी आक्षेप घेतलेले वादग्रस्त कायदे मागे घेतले खरे, परंतु त्याचा काहीही फायदा भाजपाला  झालेला नाही. गोव्यात मात्र सात जास्त जागा मिळवून भाजप सत्तेच्या जवळ आले आहे.     उत्तर प्रदेशातला विजय भाजपसाठी स्वागतार्ह असला तरी २०१७चे चित्र बदलले आहे, अखिलेश सिंग यांनी सव्वाशेच्या आसपास जागा मिळवल्या आहेत, बहुजन समाज पक्ष आणि काँग्रेस हे पक्ष नावालाच उरले आहेत. ही बदलती परिस्थिती भाजपने लक्षात घ्यायला हवी आणि आधीच्या चुका टाळायला हव्यात. १९८५ नंतर प...

नाशिकमध्ये वेगळा प्रयोग

 कोरोनामुळे वर्तमानपत्रांच्या जगामध्ये बरीच उलथापालथ झाली. सुरुवातीच्या काळात वृत्तपत्रांचे वितरण बंद असणे, नंतर टप्प्याटप्प्याने ते सुरु होणे, वाचकांना ती ऑनलाईन वाचण्याची सवय लागणे, परिणामी आज कोरोना काढता पाय घेत असल्याचे संकेत मिळत असतानाही वृत्तपत्रांचे वितरण कोरोनापूर्व काळाइतके १०० टक्के न होणे अशा अनेक समस्या आजही भेडसावत आहेत. मधल्या काळात अनेक पत्रकारांनी वैयक्तिक पातळीवर ऑनलाईन चा आधार घेण्याचा प्रयत्न केला. ९० टक्के लोक त्यांच्या website चे रूपांतर व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी करण्यात अयशस्वी ठरले. जे यशस्वी ठरले ते तगले. त्यातील एक महत्वाची website म्हणजे https://indiadarpanlive.com. नाशिक जिल्हा आणि आसपासच्या बातम्यांना प्राधान्य द्यायचा प्राथमिक हेतू असला तरी आधी महाराष्ट्र, नंतर हळूहळू देशाच्या पातळीवरच्या बातम्या दिसायला लागल्या. हजारो वाचक Whatsapp ग्रुपच्या माध्यमातून जोडले गेले. टेलिग्राम, फेसबुक आणि You Tube च्या माध्यमातून जोडले गेले. आतापर्यंत जवळपास सव्वातीन कोटी लोकांनी या website चा लाभ घेतला हे फक्त सव्वा वर्षाच्या काळात झाले. 'आमचे प्रिंट माध्यमच खरे, ऑनलाई...

पहिल्या पानावरच्या लताबाई ...

Image
 महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सकाळ आणि लोकमत यांनी लता मंगेशकर यांच्या निधनाचे वृत्तांकन पहिल्या पानावर कसे केले हे इथे मुद्दाम शेअर करत आहे. सर्वानी पूर्ण अंकात भरपूर मजकूर दिला आहे. सर्वच अंक वेगवेगळ्या अर्थाने संग्रही  ठेवण्यासारखे झाले आहेत. 'मटा'च्या पहिल्या पानावर रोहन पोरे या अत्यंत गुणी माणसाने काढलेले लतादीदींच्या चित्र लक्ष वेधूनच घेते असे नाही, तर कायम स्मरणात राहते. 'सकाळ'मध्ये राम देशमुख यांनी लताबाईंचे चित्र काढले आहे.  (07/02/2022)

वर्तमानपत्रांमधले बजेट

Image
 अर्थसंकल्प लोकसभेत सादर झाल्यावर दुसऱ्या दिवशीचे वर्तमानपत्र कसे निघते हा माझा नेहमीच औत्सुक्याचा विषय राहिलेला आहे. म्हणून मंगळवारी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केल्यावर आजच्या वर्तमानपत्रांनी  पहिल्या पानावर त्याचे कसे वर्णन केले आहे ते मला आवश्यक वाटले. 'महाराष्ट्र टाइम्स'ने 'आभासातुनी 'अर्थ' मिळावा' असे शीर्षक दिले आहे आणि ही बातमी देताना असे म्हटले आहे की, ''दोन वर्षापासून कोरोनाच्या संकटामुळे ओढवलेल्या आर्थिक अरिष्टाशी झुंजणाऱ्या सर्वसामान्यांना फारसा दिलासा न देता २५  वर्षानंतरच्या 'अमृत' काळाकडे डोळे लावत आभासातून अर्थ मिळवणारा सन २०२२-२३ चा अर्थसंकल्प मंगळवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत मांडला.''  'महाराष्ट्र टाइम्स'ने आतील पानांमध्ये विषयानुरूप विविध तज्ञांचे लेख आहेत. त्यांनी मात्र शिक्षण वगळता बाकी सर्व क्षेत्रांना किमान साडेतीन ते जास्तीत जास्त नऊ असे गुण दिले आहेत. शिक्षण क्षेत्रासाठी शरद जावडेकर यांनी दहापैकी केवळ दोन गुण दिले आहेत. तसेच महिला आणि बालकल्याण या क्षेत्रासा...

चिऊताईसाठी मुंबईत घर

 मुंबई, चेन्नई, कोलकाता या शहरांमध्ये औद्योगिकीकरण, शहरीकरण आणि विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत आहे, तसेच मोबाइल टॉवरचे जाळे वाढतेय, ग्रीन झोन नष्ट होत आहेत. मोठमोठ्या टॉवरच्या काचेच्या भिंतींमुळे चिमण्यांना तसेच इतर छोटया पक्ष्यांना घर करण्यासाठी जागाच उरली नाही. त्यामुळे चिमण्या व इतर छोटे पक्षी स्थलांतरित होत आहेत. पर्यावरणाच्या दृष्टीने हे घातक आहे. त्यामुळे त्यांचे संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी 'स्पॅरोज शेल्टर' ही संस्था काम करत असून, संस्थेने आतापर्यंत ठिकठिकाणी कृत्रिम घरटी बसवत चिमणी संवर्धनाला हातभार लावला आहे. महाविद्यालयीन मित्रांनी पर्यावरण रक्षणासाठी स्पॅरोज शेल्टर या संस्थेची स्थापना केली. संस्थेचे अध्यक्ष प्रमोद माने यांच्या नेतृत्वाखाली काम सुरु आहे. बिघडत चाललेले निसर्गचक्र पूर्ववत करण्यासाठी निसर्गसंवर्धन आणि संरक्षण हे स्पॅरोज शेल्टरचे ध्येय आहे. गेल्या १३ वर्षापासून चिमण्यांसह इतर छोट्या पक्ष्यांची कृत्रिम घरटी शास्त्रीय पद्धतीने तयार केली जात आहेत. राणीची बाग. कलिना संकुल, शिवाजी पार्क, फाइव्ह गार्डन, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, महाराष्ट्...

मनाचिये गुंती, गुंफियेला शेला ...

Image
  ए खादी व्यक्ती का लिहिती होते? लिखाण करायला आवडते म्हणून? स्वतःचे मत व्यक्त करावेसे वाटून ते प्रत्यक्षात आणायचे म्हणून? आपल्या नावावर पुस्तक असावे म्हणून? लोकांना उपदेश करायचा म्हणून? काहीतरी नवीन सांगावे म्हणून? वेळ जात नाही म्हणून? ... की आपण आपले लिहीत जावे, कोणाला आवडो अथवा न आवडो, कोणी कौतुक करो वा न करो, स्वान्तसुखाय लिहीत जावे, स्वतःचे विचार मोकळेपणी मांडत जावे...या भावना ठेवून? आपण लिहावे, घरच्यांनी वाचावे, मित्रमंडळींनी वाचावे, वाटलेच तर त्यांच्या मित्रपरिवाराने वाचावे आणि आपला विचार त्या लोकांपर्यंत पोचावा. त्यांना आनंद झाला तर ठीक, न झाला तरी ठीक, पण आपण प्रांजळपणे लिहीत जायचे , हलक्याफुलक्या शब्दांत, कधी प्रेमळपणे, कधी कठोर शब्दांत ..... यासाठी? हा शेवटचा विचार फार कमी लोक मनात आणतात. या थोड्या लोकांमध्ये सौ. मुग्धा मंदार फडके यांचे नाव येते. (विख्यात लेखक अंबरीश मिश्र यांच्या भाषेत मुग्धाबाई !)   त्यांना भरपूर वेळ होता, म्हणून भरपूर लेखन करता आले, असे म्हणणे त्यांच्यावर अन्याय करण्यासारखे होईल. कारण निवेदिका, सूत्रसंचालिका (मराठी, हिंदी वाद्यवृंद, शास्त्रीय संगी...