Posts

गोष्टी पाऊसपाण्याच्या (उत्तरार्ध)

म हाराष्ट्रात पाऊस आणि पाणी, बदलते हवामान, प्रदूषण, निसर्गावर मात करण्याचा माणसाचा हव्यास या सगळ्या कारणांमुळे या संदर्भातील असमतोल वाढत आहे. याचे परिणाम नजीकच्या भविष्यकाळातही जाणवतील. हर्षद तुळपुळे आणि स्पृहा आठल्ये यांनी काढलेल्या ‘गोष्टी पाण्याच्या’ या दिवाळी अंकाला म्हणूनच जास्त महत्व आहे. (पूर्वार्ध https://ashokpanvalkar.com/water-spring-rivers-rain-management-and-drought-in-maharashtra/ इथे वाचायला मिळेल) अंक कोकणावर फोकस करणारा असला तरी तीच तत्वे, निकष सगळ्या राज्याला लागू होतात. त्यामुळे केवळ कोकणचा अंक असे संकुचित दृष्टीने याकडे पाहून चालणार नाही. उदा. ‘गोष्टी नद्यांच्या’ या विभागात डॉ. अजित गोखले यांनी लेख लिहिला आहे. आज केवळ कोकणच नव्हे तर महाराष्ट्रात सर्वत्र आणि भारतात अनेक ठिकाणी नद्यांमध्ये साठलेला गाळ ही गंभीर समस्या होऊन राहिली आहे. यावर उपाययोजना म्हणून गाळ उपसा करण्याची जोरदार मोहीम अनेक ठिकाणी हाती घेतली आहे. गाळ उपसा करून नद्या प्रवाही बनवणे ही आजची मोठी गरज असली तरी त्यात कायकाय काळज्या घेतल्या पाहिजेत त्याचा उहापोह करण्याचा प्रयत्न अशा यादृष्टीने या लेखाकडे पाह...

गोष्टी पाऊसपाण्याच्या (पूर्वार्ध)

यंदा पावसाने ओढ दिल्याने नोव्हेंबर महिन्यातच दुष्काळाची दाहकता जाणवू लागली असून, पुढील उन्हाळा गंभीर असेल, याचे संकेत आतापासूनच मिळू लागले आहेत. गेल्या आठवडय़ात ४० तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केल्यानंतर आता १७८ तालुक्यांमधील ९५९ महसुली मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या मदत व पुनर्वसनविषयक उपसमितीने गुरुवारी (नऊ नोव्हेंबर २०२३) घेतला. त्यामुळे राज्यातील एकूण २१८ तालुक्यांमध्ये म्हणजेच जवळपास निम्म्या महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात यंदा अपुरा पाऊस झाल्यामुळे अनेक विभागांत दुष्काळाच्या झळा बसू लागल्या आहेत. या भागांत दुष्काळ जाहीर करून उपाययोजना करून मदत देण्याची मागणी जोर धरू लागली होती. त्याची दखल घेत राज्य सरकारने गेल्याच आठवडय़ात १६ जिल्ह्यांतील ४० तालुक्यांत दुष्काळी परिस्थिती जाहीर केली होती. नंतर  सत्ताधारी आणि विरोधकांकडून करण्यात येणाऱ्या मागणीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील एकूण २१८ तालुक्यांमधील १२०० पेक्षा अधिक महसुली मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. (बातमी – लोकसत्ता १० नोव्हेंबर २०२३)   राज्यातली ही ताजी स्...

कौतुकास्पद यश

भा रतीय खेळाडूंच्या उत्तम कामगिरीबद्दल त्यांचे कौतुक होते आणि हे यश क्रिकेटशिवाय इतर खेळांमधील आहे ही बाब खूप सुखावून जाणारी आहे. नुकत्याच संपलेल्या १९ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने २८ सुवर्ण, ३८ रौप्य आणि ४१ ब्राँझ पदकांसह विक्रमी १०७ पदकांची कमाई केली. याबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. या यशात क्रिकेट संघाचाही वाटा असला तरी तो एकूण स्पर्धेच्या तुलनेत इवलासा होता हे महत्वाचे आहे. नेमबाजी, घोडेस्वारी, टेनिस, स्क्वाश, अॅथलेटिक्स, तिरंदाजी, हॉकी, कबड्डी, बॅडमिंटन, रोविंग, सेलिंग , वुशू, गोल्फ, बॉक्सिंग, ब्रीज, टेबल टेनिस, कुस्ती, रोलर स्केटिंग, सपक टेकरा … यापैकी प्रत्येक खेळात भारताने पदक मिळवले. २००२ नंतर भारताची कामगिरी चढत्या क्रमाने होत आहे. अपवाद २०१४चा. २००२मध्ये ३६ पदके होती, २००६ मध्ये ५३, २०१० मध्ये ६५, २०१४ मध्ये ५७, २०१८मध्ये ७० आणि आता शंभरीपार १०७ ! फक्त क्रिकेटपटूंचे कौतुक करण्याची सवय असणाऱ्या भारताला हा अलीकडच्या काळातला सर्वात मोठा सुखद धक्का म्हणायला हवा. प्रत्येक खेळाडूचे अभिनंदन. ! भारताने अगदी शेवटच्या दिवसापर्यंत सर्वोत्तम कामगिरी केली. सुवर्णपदकांच...

पर्यावरणाच्या रक्षणासाठी कायमस्वरूपी काम

काल एक ऑक्टोबर रोजी अनेक राजकीय नेते हातात लहान मोठा झाडू घेऊन रस्ता अथवा त्या लगतचा भाग साफ करताना आपण पाहिले. हे कृत्य स्वच्छतेचा संदेश देणारी प्रतीकात्मक कृती होती हे मान्य करायला हवे. त्यांनी रोज हे काम करणे अपेक्षितही नाही. परंतु, स्वच्छता ही एका दिवसाची गोष्ट नाही. एक दिवस साजरा झाला की दुसऱ्या दिवसापासून परत सगळे सुरळीत होते हे आपण अनेकदा पाहिले. राजकीय / सामाजिक क्षेत्रातील मोठ्या लोकांच्या जयंती / पुण्यतिथी या दिवशी  त्यांची आठवण जागवली जाते, पण त्यांची शिकवण बाकीचे ३६४ दिवस किती लोक लक्षात ठेवतात हा प्रश्नच आहे. स्वच्छता असो, जयंती / पुण्यतिथी असो वा अन्य सामाजिक उपक्रम असोत, त्यात सातत्य नसले की मूळ अपेक्षित काम होऊ शकत नाही. या पार्श्वभूमीवर एक ऑक्टोबरलाच हिंदुस्थान टाइम्स या इंग्रजी दैनिकात नीरज पंडित यांनी दिलेली बातमी लक्षवेधी वाटली. ती होती वृक्ष लागवडीची. वृक्षारोपणाचेही ‘इव्हेंट’ आपल्याकडे होतात. रोप लावतानाचे फोटो छापून येतात. नंतर त्या रोपांचे काय होते, किती जागवली जातात आणि किती अदृश्य होतात ते कळतही नाही. परंतु मी ज्या बातमीबद्दल बोलतो ती बातमी वेगळी आहे. ...

ग्रंथ संयुक्त अरब अमिरातीच्या दारी....

Image
सा धारण पंधरा वर्षांपूर्वी आजच्याइतका समाजमाध्यमांचा प्रभाव नव्हता. वाचनसंस्कृती चांगल्यापैकी अस्तित्वात होती. आज अस्तंगत झाली असे मला सुचवायचे नाही, पण विविध वाचनालयांमधली वाचकांची घटती संख्या आणि घटलेली पुस्तकविक्री पाहता असे अनुमान काढता येते. समाजमाध्यमे, कोविड, ऑनलाईन वाचन यामुळे पुस्तक हातात धरून वाचणारे वाचक कमी झाले. हे वाचन वाढावे म्हणून पुस्तके वाचकांना घरी देण्याचेही उपक्रम सुरु झाले. त्यांनाही चांगला प्रतिसाद मिळाला. कुसुमाग्रज प्रतिष्ठान, नाशिक या संस्थेचे विश्वस्त श्री. विनायक रानडे यांनी एकच ध्यास घेतला आणि तो म्हणजे वाचकांना त्यांच्या घराजवळ उत्तम वाचनीय पुस्तके उपलब्ध करून देण्याचा! त्यातूनच २००९ ला अशा वाचन प्रेमींसाठी ‘ग्रंथ तुमच्या दारी ‘ या योजनेचा उगम झाला. भारतात ह्या योजनेत १०० पुस्तकांची एक पेटी असते, जी साधारण ३५ वाचकांच्या समूहासाठी असते. भारताबाहेर या योजनेत सोयीनुसार बदल झाले. मूळ ध्येय पुस्तकवाचन अधिकाधिक व्हावे, अधिकाधिक वाचक या योजनेशी जोडले जावेत हे असल्याने ‘ग्रंथ तुमच्या दारी ‘ योजना अनेक घरांपर्यंत पोचली. मराठी भाषक जगभरात जवळपास प्रत्येक देशात आहेत...

विश्वाची नवलकथा !

चं द्रयान -३ चंद्रावर उतरल्यावर आपण काही दिवसांतच सूर्याचा आभास करण्यासाठी आदित्य एल वन या नावाने मोहीम हाती घेतली. या दोन्ही घटनांबद्दल भारतात प्रचंड प्रमाणात जल्लोष झाला, आनंद व्यक्त झाला. इस्रोच्या कामगिरीबद्दल कमालीचा अभिमान प्रत्येक भारतीयाला वाटला. जगभरात इस्रोचे कौतुक झाले, ही जगाची मोहर तेवढीच महत्वाची होती. केवळ या विषयापुरते नव्हे तर एकूणच विश्व कसे आहे, परग्रह कसे आहेत, आकाशगंगा म्हणजे काय, हे विश्व कसे निर्माण झाले, त्यात कसकसे बदल झाले, अजूनही आपल्याला हे विश्व नीटसे कळले नाही – ते कधी कळणार, या साऱ्या पसाऱ्यात पृथ्वी एका सूक्ष्म कणाएवढी आहे, मग या पृथ्वीचे पुढे काय होणार, म्हणजेच पर्यायाने मानवजातीचे (आणि अन्य ग्रहांवर जीव असलेच तर त्यांचे काय होईल) यांसारखे असंख्य प्रश्न आपल्याला पडलेले असतात. त्याची संपूर्ण उत्तरे अजून कोणालाही मिळालेली नाहीत. त्यामुळे आपली उत्सुकता अधिक वाढायला मदत झाली आहे. मानव विज्ञानात प्रगती करत आहे, आता सारे कळेल असे वाटत असतानाच नवे विश्व समोर येते आणि मग हा सारा पसारा आहे तरी किती असे विचार पुन्हा आपल्या मनात येतात. …. विश्वाच्या निर्मितीवर, त्...

वाढते प्रदूषण .. आता तरी जाग येईल?

  प्र दूषणाने आरोग्यावर परिणाम होतो हे आपल्याला माहीत आहे, पण तो नेमका किती होतो याबाबतची मते प्रत्येकाची वेगवेगळी असतील. शिकागो विद्यापीठाने केलेल्या Energy Policy Institute (EPIC) ताज्या पाहणीत या प्रदूषणाची तीव्रता पुन्हा एकदा लोकांसमोर आली आहे. बांगलादेश, भारत, पाकिस्तान, चीन, इंडोनेशिया आणि नायजेरिया या देशांमधील लोकांचे आयुष्य प्रदूषणामुळे किमान आठ वर्षांनी कमी होत आहे, असा हा अहवाल सांगतो. हे प्रदूषण प्रामुख्याने कशामुळे होते? वाहनांमधून निघणारा धूर आणि इंधनाचे ज्वलन यांमधून ते सर्वाधिक होते. वर उल्लेख केलेल्या देशांमध्येच नव्हे तर जगभरात प्रत्येकाचे आयुष्य साधारणपणे सव्वादोन वर्षांनी कमी होते आहे. म्हणजेच एरवी ते जितके जगू शकले असते त्यापेक्षा सव्वादोन वर्षे आधी ते मृत्युमुखी पडत आहेत. इंग्रजीत ज्याला particulate matter म्हणतात (म्हणजेच PM2.5) त्या घटकांमुळे हे प्रदूषण होते. त्याची व्याख्या पुढीलप्रमाणे होते. – PM2.5 pollution is caused by any liquid or solid particle floating in the air that is 2.5 microns or smaller in diameter, allowing it to bypass the body’s natural de...

विशेष मुलींचे विशेष ‘घरकुल’

  घरकुल’ च्या संकेतस्थळावरील पहिलेच वाक्य या प्रश्नाची भयाणता दर्शवते. कोणत्याही आर्थिक, सामाजिक स्तरातले पती – पत्नी असोत, त्यांना आपले मूल कोण्याही व्यंगाशिवाय, कोणत्याही त्रासाशिवाय जन्माला यावे असे वाटत असते. तसे कोणत्याही आजाराविना ते मूल जन्माला आले की जे समाधान, आनंद मिळत राहते त्याचे शब्दात वर्णन करता येण्यासारखे नसते. ‘घरकुल’चे संकेतस्थळ सांगते की भारतात दोन टक्के लोकसंख्येला हे सुख मिळत नाही. तो आनंद उपभोगता येत नाही. भारताची लोकसंख्या लक्षात घेतली तर ही संख्या किती असेल याची कल्पनाच केलेली बरी.  या  Mental Retardation चे अनेक प्रकार आहेत, अनेक कमी अधिक परिणाम आहेत, हा प्रकार बरा होण्याची शक्यता, ती व्यक्ती त्यातून बऱ्यापैकी सावरण्याची शक्यता अथवा तसे सावरणे शक्य नसेल तर आहे त्या परिस्थितीत त्या व्यक्तीचे (व कुटुंबातील इतरांचेही) जगणे जरा तरी सुसह्य व्हावे यसाठीचे प्रयत्न हा सगळा प्रकार खूप गुंतागुंतीचा आहे. या आजाराच्या लोकाना केवळ सहानुभूती नको असते, हवा असतो तो किमान सन्मानजनक जगण्यासाठी एक मदतीचा हात, योग्य वैद्यकीय आणि कौटुंबिक  मार्गदर्शन. अनेक कुटुंब...

आज Cyber Wellness गरजेचे

  ब र्‍याच सायबर गुन्ह्यांमध्ये ही एक मोठी अडचण असते की आपण बळी पडत असतो किंवा पडणार असतो पण तेंव्हा हे कोणाशीही शेअर करताना आपल्याला संकोच वाटत असतो. अगदी जवळच्या माणसाला सांगणं पण नको वाटू शकतं, रिपोर्ट करणं embarrassing वाटू शकतं किंवा नेमकं काय करायला पाहिजे, ते नीट लक्षात येत नाही. मग अशा वेळी काय करायचं?    CYBER WELLNESS HELPLINE 7353107353 वर कॉल लावायचा किंवा ह्याच WhatsApp नंबर वर मेसेज करायचा, अगदी बिनदिक्कतपणे! ही मोफत सायबर वेलनेस हेल्पलाईन पूर्ण भारतभर, सोमवार ते शनिवार सकाळी ९  ते संध्याकाळी ६  पर्यन्त उपलब्ध असेल.   सायबर सुरक्षा क्षेत्रात गेल्या दहा वर्षांपासून कार्यरत असलेल्या आणि आत्तापर्यंत लाखो मुलांना व महिलांना सायबर सुरक्षा विषयाचे पद्धतशीर प्रशिक्षण देणाऱ्या Responsible Netism ह्या संस्थेनी ही हेल्पलाईन सुरू केली आहे.   इथे फोन केल्यावर आपल्याला कोणीही जज करणार नाही. परिस्थिती हाताळण्यासाठी काय करायला पाहिजे ते सांगून योग्य ती मदत करणार आहेत. जर काउन्सिलिंगची गरज असेल तर तशी व्यवस्था करणार आहेत.   ह्या क्षेत्रातील तज्ज्ञ...

सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे महत्व अधोरेखित

  मुं बईतल्या ताज्या पावसाने दाणादाण उडविल्यावर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे महत्व अधिक अधोरेखित झाले आहे. रेल्वे, मेट्रो, ‘बेस्ट’ बस ही सार्वजनिक वाहतुकीची साधने आणि त्याबरोबर टॅक्सी, रिक्षा ही त्यांना अत्यंत पूरक पण खासगी मालकीची साधने यावर मुंबई ‘धावते’. मुंबईत जरा जास्त पाऊस पडला के त्या पाण्याचा निचरा होत नाही. परिणामी पूरसदृश परिस्थिती निर्माण होते हे आतापर्यंत अनेक वेळा सिद्ध झालेले आहे. नाल्यांची सफाई नीट होत नाही, शहरातला कचरा कमी होत नाही, ड्रेनेज यंत्रणा जुनी झाल्याने प्रश्न निर्माण होतात. यावर नुसती चर्चा होते. पुढच्या वर्षी परत तेच रडगाणे गायले जाते. त्यातच मुंबईला आडवी पसरायला जागा नसल्याने ती ‘उभी’ वाढत आहे. नवनवे तोवर उभे राहात आहेत. मुंबईत पाणी, वीज व इतर मूलभूत सुविधांवरचा ताण कमालीचा वाढत आहे, आणखी वाढणार आहे. अशा स्थितीत मुंबईकरांचे जीवन अधिक त्रासाचे होणार आहे यात शंका नाही. मुंबईत मेट्रो अलीकडच्या काळात आली, तोपर्यंत रेल्वे आणि रिक्षा, टॅक्सी यावरच सर्वसामान्य माणूस विसंबून होता. ज्यांच्याकडे स्वतःच्या गाड्या आहेत त्यांची गर्दी मुंबईला अधिकाधिक घुसमटवून टाकत आह...