घटत्या जन्मसंख्येचा असाही फटका !
को णताही लहानमोठा उद्योगधंदा असो, ग्राहकांना नेमके काय हवे आहे, ग्राहकांची गरज काय आहे, हे पाहणे नेहमीच गरजेचे असते. न खपणारी उत्पादने कोणीच काढत नाही. उलट उत्पादनांमध्ये सतत सुधारणा करून ग्राहकाला ती अधिकाधिक उपयोगी कशी होतील आणि पर्यायाने उत्पादनांचा खप कसा वाढेल, पर्यायाने आपला नफा कसा वाढेल हेच पाहिले जाते. त्यात काहीच चूक नाही. (अलीकडे जाहिरात तंत्राचा वापर करून ग्राहकांना गरज नसलेली उत्पादनेही माथी मारली जातात हा भाग वेगळा). प्रत्येक कंपनी ठराविक अंतराने हे करत असते. अगदीच काही नाही, तरी काही वेळा उत्पादनाचे वेष्टन बदलून, उत्पादनांच्या नावापुढे प्लस किंवा सुपर वगैरे शब्द वापरून उत्पादन अधिक ‘सशक्त’ झालेले भासवले जाते. हे सशक्ततेचे प्रमाण कमीजास्त असते. परंतु, एखादी कंपनी जेव्हा आपले लोकप्रिय उत्पादन कमी करून वेगळ्या उत्पादनावर लक्ष केंद्रित करते तेव्हा त्याची दखल वेगळ्या अर्थाने घ्यावी लागते. समाजात घडत असलेल्या बदलाची दखल कंपन्यांही घ्यावी लागते ती अशी ! काल या संदर्भातील एक बातमी वाचली. ती होती जपानमधून. लहान मुलांसाठी नॅपी (लंगोट) बनवणाऱ्या जपानी कंपनीने या उत्पादन...