Posts

समाधी संजीवन ...

Image
(डॉ. आनंदीबाई जोशी यांच्या समाधीचा शोध कसा घेतला आणि ती समाधी प्रत्यक्ष पाहिल्यावर काय भावना मनात आल्या हे नेमके मांडणारा विद्या हर्डीकर सप्रे यांचा हा लेख. ) ब राच वेळ नकाशातून वाट काढत काढत  मी आणि अशोक (माझा नवरा)  एका दफन भूमीच्या दारात पोहोचलो. मला पहाताच समोरची बाई चटपटीतपणे पुढे आली आणि हसतमुखाने विचारती झाली, “ Are  you  here   for  Dr  Joshi ?”   मी चकितच झाले. “ How do you know ?” मी विचारले.. तिन सांगितलं की ,” तू भारतीय  दिसते आहेस. इथे खूप भारतीय येतात डॉ. जोशींच्या समाधीला भेट द्यायला.! खरं तर   या दफन भूमीत सर्वात  जास्त  भेट दिली जाणारी .. सर्वात लोकप्रिय समाधी आहे ही ! “ आणि आमच्या वॉकिंग टूर मध्ये आम्ही या समाधीचाही सामावेश केलाआहे.” हे ऐकून मला अभिमानानं भरून आलं ! त्या स्वागतिकेन मला दफनभूमीचा नकाशा दिला. ‘कार्पेन्टर/ Eighmie  लॉट’ कुठे आहे त्याची खूण  नकाशावर केली आणि तिथे जायचा मार्गही दाखवला.  आमचे  मिशन ‘ए २१६’ सुरु कझाले ! ( Eighmie हे कार्पेन्टर मावशीच्या मा...

डोळस प्रवासवर्णन आणि इतरही …

Image
  प्र वासवर्णन हा काही नवीन लेखनप्रकार नाही. अनेकांनी तो हाताळला आहे, त्यांना ‘जसे दिसले, जसे अनुभवले’ तसे एखादे पर्यटनस्थळ शब्दबद्ध केले आहे. अनेकदा पर्यटनाची ठिकाणे ‘नेहमीची’ म्हणजे काश्मीर, कुलू-मनाली, केरळ वगैरे असली तर नवीन काय पाहणार अथवा नवीन काय लिहिणार असा प्रश्न असतोच. परंतु प्रत्येक पर्यटकाला असे ‘नेहमीचे’ ठिकाण वेगळे दिसू शकते. सर्वसाधारणपणे ज्या भागाला सर्वच भेटी देतात तो भाग टाळून नवीन काही भाग धुंडाळणारे लोकही असतात. ते ‘यशस्वी’ पर्यटन कंपन्यांच्या मागे न लागत, स्वतः जोडीदारासमवेत अथवा कुटुंबियांसमवेत जमेल तसा प्रवास करतात. मोजकीच ठिकाणे पण तपशीलाने बघतात, अनुभवतात आणि आयुष्यात ते क्षण जपून ठेवतात. कधी लिहूनही ठेवतात. प्रत्येकाचेच प्रसिद्ध होते असे नाही. याचा अर्थ त्यांना काही वेगळे सांगण्यासारखे नाही असे अजिबात नाही. नाशिक आणि ठाणे अशी वास्तव्याची ठिकाणे असणाऱ्या सौ. आशा अरुण जोशी या खऱ्या (इतर विषयांबरोबरच) मराठी विषयाच्या शिक्षिका. परंतु मुख्याध्यापिका म्हणून निवृत्त झाल्यावर आधी विविध कारणांमुळे न झालेली भटकंती लेखणीतून कागदावर उतरली. त्या लेखांच्या पुस्तकाचे प्र...

घडताना, घडवताना...

Image
  साधारण  १६ वर्षांपूर्वी रूढार्थाने निवृत्त झालेले, नंतरही या ना त्या प्रकारे शिक्षण क्षेत्राशी संबंधित असलेले श्री. अरुण जोशी आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. आशा जोशी यांच्या पुस्तकांचे प्रकाशन गेल्या आठवड्यात ठाण्यात झाले. यापैकी जोशी सरांच्या पुस्तकाला मी प्रस्तावना लिहिली आहे. ती इथे मुद्दाम देत आहे. सरांच्या कारकीर्दीचा आढावा घ्यायचा असेल तर पुस्तक विकत घेऊन वाचणे आवश्यक आहे. सरांचे पुस्तक ‘घडताना, घडवताना …’ या नावाने आहे. त्यांची स्वतःची जडणघडण कशी झाली आणि नंतर जवळपास साडेपाच दशके त्यांनी अनेक शिक्षक, विद्यार्थी याना कसे घडवले याची ही संघर्षमय कथा आहे. शि क्षणसम्राट आणि त्यांची अर्थशक्ती , शिक्षणाचा खालावलेला दर्जा, शिक्षकांवरील शिक्षणेतर कामे, इंग्रजीला प्रमाणाबाहेर आलेले महत्व व त्यामुळे मराठी शाळांचा होत असलेला ऱ्हास, संस्थाचालकांची बदलती आर्थिक गणिते व त्यामुळे शिक्षण सामान्य माणसाच्या हाताबाहेर जाण्याची भीती, ज्ञानाधिष्ठितऐवजी मार्काधिष्ठीत होणारा अभ्यास, एसएससी बोर्डाची CBSE , ICSE  व इतर बोर्डांशी सामना करताना होणारी दमछाक, परीक्षांचे निकाल ल...

घटत्या जन्मसंख्येचा असाही फटका !

  को णताही लहानमोठा उद्योगधंदा असो, ग्राहकांना नेमके काय हवे आहे, ग्राहकांची गरज काय आहे, हे पाहणे नेहमीच गरजेचे असते. न खपणारी उत्पादने कोणीच काढत नाही. उलट उत्पादनांमध्ये सतत सुधारणा करून ग्राहकाला ती अधिकाधिक उपयोगी कशी होतील आणि पर्यायाने उत्पादनांचा खप कसा वाढेल, पर्यायाने आपला नफा कसा वाढेल  हेच पाहिले जाते. त्यात काहीच चूक नाही. (अलीकडे जाहिरात तंत्राचा वापर करून ग्राहकांना गरज नसलेली उत्पादनेही माथी मारली जातात हा भाग वेगळा). प्रत्येक कंपनी ठराविक अंतराने हे करत असते. अगदीच काही नाही, तरी काही वेळा उत्पादनाचे वेष्टन बदलून, उत्पादनांच्या नावापुढे प्लस किंवा सुपर वगैरे शब्द वापरून उत्पादन अधिक ‘सशक्त’ झालेले भासवले जाते. हे सशक्ततेचे प्रमाण कमीजास्त असते. परंतु, एखादी कंपनी जेव्हा आपले लोकप्रिय उत्पादन कमी करून वेगळ्या उत्पादनावर लक्ष केंद्रित करते तेव्हा त्याची दखल वेगळ्या अर्थाने घ्यावी लागते. समाजात घडत असलेल्या बदलाची दखल कंपन्यांही घ्यावी लागते ती अशी ! काल या संदर्भातील एक बातमी वाचली. ती होती जपानमधून. लहान मुलांसाठी नॅपी (लंगोट) बनवणाऱ्या जपानी कंपनीने या उत्पादन...

दिव्यांगांची राजकीय दखल कधी?

Image
अनेक भाषिक / इंग्रजी वर्तमानपत्राच्या शनिवार / रविवारच्या पुरवण्या वाचनीय असतात. भरमसाठ संख्येने वाढलेली टीव्ही चॅनेल्स आणि त्यांच्या जोडीला आलेली OTT यामुळे कन्टेन्टमध्ये वैविध्य आले असले आणि त्यांना लाखो प्रेक्षक लाभत असले तरी वर्तमानपत्रांच्या पुरवण्या स्वतःचे अस्तित्व केवळ टिकवून आहेत असे नव्हे तर आपला चांगला दर्जा राखून आहेत. या दोन दिवसांत अनेक विषय तपशीलाने वाचायला मिळतात आणि वेगवेगळी मतमतांतरेही कळतात. रविवारी २४ मार्चच्या अंकात नीरजा देवधर यांनी ‘मिड डे’ या दैनिकात लिहिलेला लेख एका वेगळ्या आणि दुर्लक्षित विषयावर आहे. दिव्यांग व्यक्तींना एरवीही जगण्यासाठी अनेक संघर्ष करावे लागतात. मूलभूत सोयी मिळण्यासाठी राजकीय / सामाजिक यंत्रणेला साकडे घालावे लागते. त्यातून वाट काढत अनेक दिव्यांग अनेक क्षेत्रात चमकत असतात, परंतु,  राजकीय आणि वैधानिक यंत्रणेने त्यांना जवळ केले आहे का? यावर पत्रकार नीरजा देवधर यांनी अनेक उदाहरणे देऊन ‘नाही’ असे उत्तर दिले आहे. हा लेख कोणत्याही संवेदनशील व्यक्तीला अस्वस्थ करून जाईल यात शंका नाही.   लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. विविध राजकीय पक्ष उमे...

जाहल्या काही चुका अन् ...

Image
  महाराष्ट्रात सध्या निवडणुकीच्या बातम्या आणि अनेक नेत्यांच्या तोंडातून निघणारे 'सुविचार' ऐकणे / पाहणे टाळायचे असेल तर 'यू ट्यूब' हा एक उत्तम पर्याय आहे. असंख्य उत्तम चॅनल्स / पॉडकास्ट इथे पाहायला / ऐकायला मिळतात. त्यातलेच एक म्हणजे 'स्मृतिगंध'. याचा गंध सर्वदूर पसरला आहेच. त्यांनी  'काचे पलिकडचे किस्से' या नावाने  नवीन कार्यक्रम सुरू केला आहे. राजेंद्र पाटणकर आणि किशोर सोमण ही दोन नावे घेतली की रेडिओ आठवतो आणि त्या माध्यमाशी निगडित असणाऱ्या असंख्य आठवणीही जाग्या होतात. रेडिओवर कार्यक्रम करताना काहीवेळा काय गमतीजमती होतात या विषयावर हे दोघे बोलले. जेव्हा लाईव्ह कार्यक्रम असतो तेव्हा निवेदकाच्या हातून चुका होण्याची शक्यता असते आणि त्यातून अर्थाचा अनर्थ होऊ शकतो. या संदर्भातल्या काही आठवणी, आकाशवाणीतले वातावरण, दिग्गज कलाकार स्टुडिओमध्ये आल्यावर त्यांचे आलेले अनुभव अशा गप्पा पहिल्या भागात ऐकायला मिळाल्या. अर्थात फक्त या चुका म्हणजे रेडियो नव्हे, त्यामुळे पुढील काही भागांत विविध कार्यक्रम / कलाकार यांच्या हृद्य आठवणी ऐकायला अधिक आवडेल.    मर...

बुरा ना मानो, होली है …

  लो कसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यावर आता देशातील राजकारणाला खरा वेग आला आहे. राजकीय विचारधारा, निष्ठा वगैरे बाबी भूतकाळात जमा झाल्याने तिकीटवाटप होईपर्यंत कोणते नेते कुठे पळ काढतील हे सांगता येणे कठीण झाले आहे. एक पक्ष सोडला की दुसऱ्या पक्षात कोणतेही तिकीट वा पद किमान एक वर्षभर मिळणार नाही अशी अट घातली तर बहुदा एकही पक्षांतर होणार नाही. परंतु कोणताही पक्ष हे पाळणार नाही. कारण ते कोणत्याही पक्षाला सोयीचे नाही हे उघड आहे. ‘मी अमुक एका पक्षाच्या विचारधारेने प्रभावित होऊन त्या पक्षात जात आहे, कोणत्याही पदाच्या आमिषाने नाही,” असे सांगणारे नेते पक्षांतरानंतर काही तासांतच लोकसभेचे तिकीट अथवा राज्यसभा पदरात पाडून घेतात हेही आता नवीन राहिलेले नाही. याला महाराष्ट्रही अपवाद राहिलेला नाही. हे गेल्या साधारण दोन दशकांच्या राजकारणातून आपल्याला दिसले आहेच. गेल्या चार वर्षांत तर ही प्रक्रिया फारच वेगाने झाली आहे. आणि लोकसभा निवडणूक पार पाडल्यावर आणि विधानसभा निवडणुकीआधी आणखी किती वेगाने होईल याची फक्त कल्पनाच केलेली बरी ! भारतीय जनता पक्ष नेतृत्व करत असलेली राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि काँग्रेस नेत...

कसोटी क्रिकेटच्या भल्यासाठी ...

Image
भा रताने इंग्लंडविरुद्धची चौथी कसोटी जिंकून मालिका खिशात टाकली. आता पाचवी आणि शेवटची कसोटी सात मार्च रोजी सुरु होईल. चौथ्या कसोटीत जसप्रीत बुमराह या आपल्या सर्वात उत्तम वेगवान खेळाडूला विश्रांती देण्यात आली होती. तरी रविचंद्रन आश्विन ,  रवींद्र जडेजा आणि नवोदित आकाश दीप यांनी बुमराहची उणीव भासू दिली नाही. रांचीमध्ये नवा समर्थ यष्टीरक्षक फलंदाज ध्रुव जुरेलच्या रूपाने आपल्याला मिळाला. जुरेलने यष्टिरक्षण आणि फलंदाजी या दोन्ही बाबींमध्ये जी चमक दाखवली ती निश्चितच सुखावह होती.   गेल्या काही कसोटी सामन्यांचा इतिहास पाहिला तर कसोटी पाचव्या दिवसापर्यंत जातेच असे नाही. याचा दोष सर्वस्वी खेळपट्टीला देऊन चालणार नाही. काही अंशी खेळपट्टी, काही अंशी उत्तम गोलंदाजी आणि काही अंशी ढेपाळलेली फलंदाजी यास जबाबदार आहे असे दिसते. पाच दिवसांची कसोटी हेच खरे क्रिकेट असे नेहमी म्हटले जाते. ते खरेच आहे. परंतु अलीकडची परिस्थिती पाहिली तर झटपट क्रिकेट व त्यात मिळणाऱ्या पैशांवर डोळा ठेवून कसोटी क्रिकेट न खेळात टी 20 च्या आयपीएल मध्ये खेळण्याकडे जास्त लक्ष दिले जाते. हे दिसून आले आहे. कसोटी क्रिकेट खेळणारे...

RNEP ही NEP इतकीच महत्वाची !

Image
Responsible Netism 1st National Cyber Psychology Conference 2017 Theme:  Living Life 2.0: Coming together to Interface our Online and Offline Lives. Date:  January 20-21, 2017 | Mumbai 2nd Conference 2018 – Theme:  Building Cyber Hygiene Culture. Date: January 18-19, 2018 | Mumbai 3rd  Conference 2019 – Theme: Child Online Protection Date: January 8, 2019 – Run-up event at Kolhapur, January 18, 2019 – Run-up event at Aurangabad, January 23, 2019 – Main event at Mumbai 4th Conference 2020 – Theme:  Child Online Protection.   Date:  January 23-24, 2020 | Pune 5th Conference 2021 – Theme:  Coping With Technology, New Education Policy And New Normal Date:  January 23, 2021 | 6th Conference 2022 – Theme:  India Fights Cyber Violence against Women and Children Date:  January 22, 2022 | 6th Conference 2023 – Theme:  Cyber Wellness: Ensuring Mental Well-being in Cyberspace Date:  Saturday, January 21, 2023 | 8th Conference 2024 –...

युपीआय क्रांती कुठपर्यंत?

गे ल्याच महिन्यातील गोष्ट. एका कामानिमित्त एका सहकारी बँकेत गेलो होतो. बँकेची ही शाखा तळमजल्यावरचीच होती आणि ज्येष्ठ नागरिकांनाही बँकेत व्यवहार करताना काही अडचण येणार नाही, याची काळजी घेणारी होती. एक साधारण ७५-८० वर्षे वयोगटातील आजी शाखेत आल्या आणि कशा कोणास ठाऊक पायरीला अडकून एकदम पडल्या. उपस्थित सगळा कर्मचारी वर्ग त्यांच्या मदतीला धावला. त्यांना खुर्चीवर बसवले. सुदैवाने कुठेच काहीच गंभीर दुखापत नव्हती. आजींसह सगळ्यांनीच सुटकेचा निःश्वास सोडला. मदतीसाठी नेहमीच तत्पर असणाऱ्या त्या बँकेच्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना विचारले, ‘अहो आजी, स्वतः कशाला आलात, आम्हाला फोन करायचा, कोणाला तरी घरी पाठवले असते’. आजींचे उत्तर असे होते, ”अगं हो, पण मलाच राहवेना म्हणून आले. मला माझ्या फोनमध्ये गूगल पे की काय म्हणतात ते टाकून हवे आहे, ते कसे वापरायचे तेही सांग. माझी मुले / नाती सांगतात की आता जास्त रोख पैसे जवळ ठेवू नकोस. त्यापेक्षा मोबाईलवरून पैसे देत जा. मला हे तातडीने हवे होते, म्हणून स्वतः बँकेत आले.’ बँकेतील लोकांना लगेच काय प्रतिक्रिया द्यावी ते कळले नाही, पण त्यांनी आजी...